25 May 2020

News Flash

दि. १९ ते २५ जून २०१५

मेष तुमच्या जिद्दी स्वभावाला आधुनिकतेचा एक नवीन कंगोरा लाभल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून उठेल.

| June 19, 2015 01:16 am

01vijayमेष तुमच्या जिद्दी स्वभावाला आधुनिकतेचा एक नवीन कंगोरा लाभल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून उठेल. व्यापार-उद्योगात जमा-खर्चाचे गणित पूर्ण केल्याशिवाय नवीन व्यक्तींशी व्यवहार, उधारी शक्यतो ठेवू नका. नोकरीमध्ये ज्यांना तुमच्याकडून मतलब साध्य करायचा आहे अशा व्यक्ती तुमच्याभोवती गोंडा घोळतील, पण तुम्ही मात्र घाईने त्यांना आश्वासन देऊ नका. बेकार व्यक्तींनी मिळेल ते काम स्वीकारावे. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कलानुसार वागणे भाग पडेल. नवीन जागेचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नये.

वृषभ तुमची रास विचाराने स्थिर प्रवृत्तीची आहे. सहसा ठरविलेली पद्धत किंवा दैनंदिनी यामध्ये बदल करायला तुम्ही तयार हात नाही. व्यापार-उद्योगामध्ये उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता एखादी नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणायचे ठरवाल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना तातडीच्या कामाकरिता तेथे प्रवास करावा लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून साथ मिळू शकेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याचे निराकरण होईल.

मिथुन एखादे स्वप्न किंवा मोठे ध्येय आपल्यापुढे असल्याशिवाय आपण आपली बुद्धिमत्ता आणि शक्ती पणाला लावत नाही, पण आता तुमचा इरादा बुलंद असल्यामुळे तुम्ही मोठय़ा आशेने कामाला लागाल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा तुमचा मानस असेल. त्यासाठी आवश्यक असणारे भांडवलही उपलब्ध होईल. नोकरीमध्ये चांगल्या प्रोजेक्टकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये तुमची एखादी इच्छा सफल झाल्याने घरातील वातावरण उत्साहवर्धक राहील.

कर्क कधी कधी नियोजनबद्ध जीवनाचाही तुम्हाला कंटाळा येतो आणि मग मात्र तुमच्यातली स्वैरबुद्धी जागृत होते. व्यवसाय-उद्योगात थोडेफार पसे हाताशी असल्यामुळे तुमच्या मनाचा वारू उधळलेला असेल. त्यामुळे ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ असा प्रकार असेल. व्यावसायिकांनी मात्र केवळ मोठेपणाच्या नादात नवीन काम स्वीकारू नये. नोकरीमध्ये तुमच्या परोपकारी वृत्तीमुळे ज्याला गरज आहे त्याला मदत करण्याची तुमची तयारी असेल, पण त्याची परतफेड होणार नाही.

सिंह पशाविषयी तुमच्या राशीला बरेच आकर्षण असते आता हे पसे हातात असल्यामुळे तुमचे हात गगनाला भिडले असतील. व्यापार-उद्योगात चांगला फायदा मिळवून देणारे काम तुमच्या वाटय़ाला येईल. त्यातून दीर्घकाळापर्यंत पसे मिळण्याची खात्री वाटल्याने तुम्ही उत्साही वाटाल. बाजरपेठेतील प्रतिष्ठित ठिकाणी ऑफिस घ्यावेसे वाटेल. नोकरीमधल्या कामातून तुमचा अनपेक्षितरीत्या फायदा होईल. मुलांच्या गरजा भागविण्याकरिता मोठी रक्कम उभी करावी लागण्याची शक्यता आहे.

कन्या कोणतेही नवीन प्रयोग करायला तुम्ही तयार नसता, पण आपले वेगळेपण सिद्ध करण्याकरिता प्रयोग तुम्हाला करावासा वाटेल. व्यापार-उद्योगात जाहिरात प्रसिद्ध आाणि तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. हातामध्ये पसे खुळखुळल्यामुळे नवीन गुंतवणूक कराविशी वाटेल. नोकरीमध्ये आपली इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याकरिता अधिकारांचा गरजेपेक्षा जास्त वापर कराल. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाकरिता सर्व जण तुमच्याकडून सल्ल्याची अपेक्षा ठेवतील.

तूळ जे काम पूर्वी तुम्ही कंटाळून पूर्ण केले होते. त्याचाचा उपयोग झाल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. व्यापार-उद्योगात एखाद्या कामासंबंधित प्रतिष्ठित व्यक्तींनी मदत करण्याचे तुम्हाला आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण होण्याची खात्री वाटू लागेल. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत, त्यांना थांबून राहिलेली कामे सुरू होण्याचे संकेत मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची अडचण समजून घेऊन तुम्हाला एखादा चांगला पर्याय देतील. घरामध्ये एखादे छोटे कार्य ठरण्याची किंवा पार पाडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक प्राप्त परिस्थितीमध्ये तडजोड करून कसे यश मिळवायचे हे तुमच्या राशीला चांगले माहीत असते. व्यवसाय किंवा उद्योगात सकृद्दर्शनी सर्व काही चांगले दिसेल, पण तुमच्या दृष्टीने जे काम अत्यंत महत्त्वाचे आहे त्यात तांत्रिक कारणामुळे शर्यत पार करावी लागेल. नोकरीमध्ये ज्या कामामध्ये तुम्ही सहजगत्या सफलता मिळवू शकता त्यामध्ये अडथळे आल्यामुळे तुम्हाला थोडेसे कोडय़ात पडल्यासारखे होईल. घरामध्ये एखाद्या अनपेक्षित प्रश्नामुळे गांगरून गेल्यासारखे वाटेल.

धनू तुमचे विचार कायम बदलत असतात. पण या आठवडय़ात तुम्ही तुमच्या विचारांवर अढळ राहिलात तर चांगलेच होईल. व्यापार-उद्योगात भागीदारी किंवा नवीन मत्रीबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका. नोकरीमध्ये बदल करायचा असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा, सहकाऱ्यांकडून थोडीफार मदत मिळेल. घरामध्ये काही प्रश्न विनाकारण लांबत आले असतील तर त्यामध्ये पुढाकार घेऊन असे प्रश्न हलके कराल. विवाहासंबंधी तरुणांचा थोडासा गोंधळ असेल.

मकर ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे ‘अनंत हस्ते कमलाकराने..’ अशी तुमची परिस्थिती असणार आहे. स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या पुढे एक पाऊल टाकण्याचा तुमचा इरादा असेल. त्यासाठी एखादी वेगळी योजना तयार कराल. नोकरीत तुमच्याकडे एखादे विशेष कौशल्य असेल तर त्याचा उपयोग होईल. व्यक्तिगत जीवनामध्ये बराच काळ तुमच्या मनामध्ये तरळत असलेली एखादी योजना साकार झाल्याने तुम्ही खूश असाल. घरामध्ये एखादी शुभवार्ता कळेल.

कुंभ तुमच्या मनात एखादी नवीन कल्पना तरळत असेल तर त्याच्यासंबंधी आवश्यक असणारी माहिती शोधून काढाल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांची वर्दळ थोडीशी कमी असल्याने तुम्हाला फुरसत मिळेल. व्यावसायिक जागेची आवराआवर, बिले भरणे अशा कामांना तुम्ही प्राधान्य द्याल. नोकरीमध्ये ज्या कामाला चालना मिळत नव्हती त्या कामाला गती देण्यासाठी वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने तुमची निवड करतील. त्याच्या बदल्यात तुम्ही उखादी विशेष सवलत मिळवाल.

मीन तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला बरीच कामे करायची असल्यामुळे आता तुमची धावपळ उडणार आहे. व्यवसाय-उद्योगात जुन्या गिऱ्हाईकांना राम राम ठोकण्याचा निर्णय घ्याल, तर तो चुकीचा ठरेल. पशाची कमतरता नसल्यामुळे काही नवीन प्रयोग करावेसे वाटतील. नोकरीमध्ये नवीन पद्धतीच्या कामामध्ये काही गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. घरामधल्या व्यक्तींच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न कराल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2015 1:16 am

Web Title: astrology 13
Next Stories
1 दि. ५ ते ११ जून २०१५
2 भविष्य- दि. २९ मे ते ४ जून २०१५
3 दि. २२ ते २८ मे २०१५
Just Now!
X