सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष :चंद्र-हर्षलचा नवपंचम योग नावीन्याची कास धरणारा आणि प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात स्थैर्य लाभेल. वरिष्ठांच्या पाठबळाने नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. सहकारी वर्गाकडून चांगल्या सूचना मिळतील. त्यांचा जरूर विचार करावा. जोडीदाराच्या साथीने मोठे निर्णय यशस्वीरीत्या घ्याल. मुलांवर विश्वास दाखवल्याने त्यांचा हुरूप वाढेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आपल्या घशाचे आरोग्य सांभाळा. आहारावर ताबा ठेवावा.
वृषभ : चंद्र-बुधाचा केंद्र योग भावनिक बळ देणारा, वैचारिक स्थैर्य देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. व्यवसायवृद्धीसाठीचे प्रयत्न सफल होतील. सहकारी वर्गाकडून काम चोख करून घ्याल. कामकाजातील अडथळ्यांवर मात करताना जोडीदाराची जास्त प्रमाणात दमणूक होईल. तरीही तो यश खेचून आणेल. मुलांचा आत्मविश्वास बळावेल. कुटुंबात आनंदवार्ता समजेल. रक्तातील दोषयुक्त घटकांचा निचरा होणे महत्त्वाचे! वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मिथुन : चंद्र-हर्षलचा लाभ योग वैचारिक वैविध्य दाखवणारा योग आहे. इतरांपेक्षा वेगळे आणि चाकोरीबाहेरचे विचार मांडाल. नोकरी-व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींकडून लाभदायक बातमी समजेल. हाती घेतलेल्या कामातील अडचणी दूर करताना आशेचा किरण सापडेल. सहकारी वर्गाचे साहाय्य महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. नव्या जोमाने काम सुरू होईल. मुलांसाठी आर्थिक नियोजन कराल. कुटुंब सदस्यांना प्रवास योग संभवतो. प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार संभवतात.
कर्क : चंद्र-शुक्राचा समसप्तम योग उत्साहवर्धक योग आहे. कलात्मकतेला मेहनतीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास पुन्हा एकदा खरा ठरवाल. सहकारी वर्गाच्या बोलण्यावर विसंबून राहू नका. त्याच्या कामाची पोचपावती मागावी लागेल. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जाल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची मेहनत फळास येईल, पण वाट बघावी लागेल. मुलांना आपली मते मांडण्याची संधी द्याल. लहानमोठय़ा गोष्टींचा अतिविचार करणे टाळा. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
सिंह : चंद्र-गुरूचा युतीयोग हा उद्बोधक योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात नव्या उमेदीसह कामाला गती द्याल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठय़ा जबाबदारीची विभागणी कराल. वेळेचे उत्तम नियोजन कराल. जोडीदाराला त्याच्या कामाचे योग्य श्रेय मिळेल. कुटुंबातील सदस्यांना कामानिमित्त प्रवास योग येईल. परिस्थितीची जाण ठेवून काळजी घ्यावी. आपल्या अनुभवाचे धडे मुलांना द्याल. वातविकार बळावेल. व्यायामात सातत्य असावे.
कन्या : चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा कृतिशीलतेला कलात्मक दृष्टी देणारा योग आहे. नव्या संकल्पना अमलात आणण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार कराल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाची व रखडलेली कामे आत्मविश्वासाने पूर्णत्वास न्याल. सहकारी वर्गाला विशेष प्रशिक्षण द्याल. मित्रांना मदत कराल. जोडीदाराच्या व्यस्त दिनक्रमामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतील. सर्दी-पडशावर वेळीच उपाय योजावा. प्राणायाम करावा.
तूळ : चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा स्फूर्तिदायक योग आहे. हाती घेतलेल्या कामाला उत्तेजन मिळेल. आवश्यक ती मदत सहज मिळेल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना शिस्तीचे आणि वेळेचे बंधन पाळावे लागेल. जोडीदाराचा दिनक्रम व्यस्त असल्याने त्याची दमणूक होईल. एकमेकांना सांभाळून घेण्याचे दिवस आहेत. मुलांना त्याच्या जबाबदारीची जाण करून द्यावी लागेल. वातविकार बळावतील. संधिवातासारखे त्रास वाढल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
वृश्चिक : शनी-मंगळाचा समसप्तम योग हा कष्ट, मेहनत आणि उत्साहाचे प्रतीक आहे. नव्या जोमाने कामाला लागाल. नोकरी-व्यवसायात अडचणींची मालिका पार करत पुढे जायचे आहे हे ध्यानात असू द्या. डगमगू नका. मार्ग सापडत जाईल. सहकारी वर्गाची मदत उल्लेखनीय असेल. जोडीदाराच्या कार्यातील नवे पैलू विकसित होतील. त्याच्या कामाला वाव मिळेल. मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्याल. डोकेदुखी आणि पित्त विकारांवर आधीच संयम ठेवावा लागेल. पथ्य पाळणे आवश्यक!
धनू : चंद्र-नेपच्यूनचा युतियोग हा नावीन्याची ओढ लावणारा, आत्मविश्वास वाढवणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात नवे विचार वरिष्ठांपुढे मांडाल. त्यांच्या संमतीने योग्य पाऊल उचलाल. सहकारी वर्गाला नेमक्या सूचना द्याव्या लागतील. गैरसमज टाळावा. मुलांच्या चुकीच्या वागणुकीला खतपाणी घालू नका. त्यांना समजावून सांगा. कुटुंबातील प्रश्नांना मार्ग सापडेल. जोडीदाराच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतल्याने नुकसान टळेल. पोटाचे विकार बळावतील. अपचनामुळे अस्वस्थ व्हाल.
मकर : चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा ऊर्जादायी आणि बलवर्धक योग आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बागळावी. वरिष्ठांचा सल्ला सर्वाच्या हिताचा ठरेल. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना डोक्याचा ताप वाढेल. तांत्रिक अडचणींवर मात करताना अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. जोडीदाराच्या कामांना गती मिळेल. मुलांना आपली मते मांडण्याची संधी दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल. सातत्याने योगाभ्यास करावा.
कुंभ :रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक आणि कीर्तिवर्धक आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध करून दाखवाल. सहकारी वर्गावर विसंबून न राहाता रखडलेली कामे स्वत: मार्गी लावाल. मुलांच्या जडणघडणीत जोडीदाराचा मोठा वाटा असेल. कुटुंबातील सदस्यांचे प्रवास योग संभवतात. सर्दीचा त्रास होईल. मूत्रविकार उद्भवण्याची शक्यता आहे.
मीन : रवी-चंद्राचा केंद्र योग अडचणीतून मार्ग दाखवणारा योग आहे. योग्य निर्णय घेतल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. त्यांच्या समस्यांना वाचा फोडाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या शब्दाला मान मिळेल. मुलांच्या छंदातून सामाजिक कार्यात भर पडेल. मोठे आर्थिक निर्णय लांबणीवर पडतील. नातेवाईकांसाठी मदतीला पुढे व्हाल. श्वसन आणि छातीसंबंधित आजार आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.