26 October 2020

News Flash

क्लिक

हे काही केवळ ठोसेघर धबधब्याचे छायाचित्र नाही तर त्याच्या पांढऱ्याशुभ्र प्रपाताच्या पाश्र्वभूमीवर दिसणाऱ्या बोनेलिस ईगल या पक्ष्याचे छायाचित्र आहे.

| June 20, 2014 01:01 am


हे काही केवळ ठोसेघर धबधब्याचे छायाचित्र नाही तर त्याच्या पांढऱ्याशुभ्र प्रपाताच्या पाश्र्वभूमीवर दिसणाऱ्या बोनेलिस ईगल या पक्ष्याचे छायाचित्र आहे. हा पक्षी वगळला तर हे छायाचित्र निर्जीव वाटेल. वाइल्ड लाइफ छायाचित्रण करताना केवळ ज्याचे छायाचित्र काढायचे ती विषयवस्तूच फक्त डोळ्यांसमोर न ठेवता त्याबरोबर आजूबाजूचं वातावरण- देखील विचारात घ्यावं. त्यामुळे असा वेगळा फोटो मिळतो. बोनेलिस ईगल हा पक्षी त्या प्रपाताच्या पाश्र्वभूमीवर येताच क्लिक् केल्यामुळे हे छायाचित्र वेगळे ठरले आहे. (छायाचित्रकार : बिभास आमोणकर)


‘’ने वाचकांकडून मागविलेल्या छायाचित्रांतील काही चांगली निवडक छायाचित्रे.
प्रस्तुतच्या छायाचित्रात फूल आणि पक्षी अशी संगती अप्रतिम पद्धतीने टिपली गेली आहे. छायाचित्रणातील सुस्पष्टताही उत्तम आहे. हे छायाचित्र भाग्यश्री पटवर्धन यांनी टिपले आहे.


जेजुरीच्या या छायाचित्रामध्ये उधळलेल्या हळदीच्या पाश्र्वभूमीवर भाविकाचा मूड नेमका टिपला आहे रवी पवार यांनी. हळदीची उधळण ते वातावरण अधिक खुलवते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2014 1:01 am

Web Title: click 7
Next Stories
1 क्लिक
2 क्लिक
3 क्लिक्
Just Now!
X