स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com

आजकालच्या तरुणांच्या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइट्स त्यांच्या जगण्याचा अपरिहार्य भाग असतात. त्यांचं प्रेम, भांडण, रडणं, रुसवे फुगवे हे सगळंच या साइट्सवरच होत असतं. त्यांच्या दृष्टीने सध्याची अडचणीची गोष्ट म्हणजे अनफ्रेण्ड हे स्टेट्स असलेल्या आणि आता त्यांच्या डिजिटल कुटुंबाचा भाग नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यांनी कायमचं डिलीट केलं तरी सोशल मीडियावरचा ‘मेमरी’ज चा विभाग त्यांना तसं करू देत नाही. काहींना आपल्या जुन्या प्रेम प्रकरणांमधून मुव्ह ऑन व्हायचं असतं तर काहींना एकेकाळचे जीवाभावाचे आता ओळखीतही नको असतात. मात्र अनेकांचे डिजिटल फुटप्रिंट त्यांचा पिच्छा पुरवतात. त्यापासून स्वत:ला  कसं वाचवायचं याची चर्चा करूया.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

वय वर्षे १८ ते ३० दरम्यान आपल्याला आयुष्यात अनेक नवीन माणसं भेटतात असं म्हटलं जातं. यापैकी अनेकजण आपल्याला आपल्या शैक्षणिक, कार्यालयीन आणि कामासंदर्भातील प्रवासादरम्यान भेटतात. त्यापैकी मोजके लोक मित्र परिवारामध्ये कायमचे जोडले जातात. तर काही काळाच्या ओघात बाजूला होतात. यामध्ये कॉलेज जीवनातील दुरावलेल्या प्रेमापासून ते अगदी कॉलेजमध्ये एकाच बेंचवर बसलेल्या मित्रापर्यंत अनेक जण असतात. अशा लोकांसोबत अनेकदा  एकमेकांना टॅग केलेले फोटो, पोस्ट किंवा चेकइन्स असतात. ब्रेकअप किंवा कोणत्याही मदभेदांमुळे दुरावल्या गेलेल्या प्रियकर/प्रेयसीपासून ते मित्रांपर्यंत अनेकजण आधीच ब्लॉक लिस्टमध्ये गेलेले असतात. तरीही फेसबुक मेमरीज या लोकांची वारंवार आठवण करून देतात. डिजिटल क्रांतीआधी अशी नको असणारी माणसं आयुष्यातून कायमची आणि खरोखरच निघून जायची. आता मात्र तसं होतं नाही. त्यातही फेसबुकवरील मेमरीजच्या पर्यायामुळे या कटू- गोड (त्यातही जुनं प्रेम प्रकरण असेल तर कटूच जास्त) आठवणींवरच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढल्या जातात. नकोशा वाटणाऱ्या मेमरीजमधून डोकावणाऱ्या या टॅगिंग, चेकइन्सच्या आठवणींना तांत्रिक भाषेत डिजिटल फुटप्रिंट असे म्हणतात.

सोशल नेटवर्किंग साइट्स हा असा फळा आहे ज्यावर लिहिलेला शब्द कधीच पुसता येत नाही. या मेमरीजचा सर्वाधिक फटका नातं संपल्यानंतर बसतो. मग ते नातं प्रेमाचं असो, मैत्रीचं असो, किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये जवळ आलेल्या मात्र आता संपर्कातही नसलेल्या लोकांसोबतचं असो. आजच्या जगात फेसबुक चेकइन्स, इन्स्टाग्राम रिल्स, स्नॅपचॅटबरोबरच वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेकजण नाती, प्रेम, जोडीदार आणि जवळच्या व्यक्तींबद्दल जरा जास्तच सोशल झाल्याचं चित्र आहे. तरुण वयात अखंड प्रेमात बुडालेली आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर मुक्तपणे वावरणारी अनेक जोडपी प्रेमाच्या ऐन उमेदीच्या काळात एकमेकांबरोबरची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशा पद्धतीने जवळजवळ रोज एकमेकांबद्दलच्या भावनांचा सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मारा करणाऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण त्यामुळे ब्रेकअपनंतर या जोडीदाराच्या आठवणींमधून बाहेर येणे अनेकांना कठीण जाताना दिसत आहे. हा भूतकाळ अनेकांच्या मुव्हऑन झालेल्या आयुष्यात फेसबुक मेमरीजच्या रूपात पुन्हा पुन्हा डोकवून पाहत आहे. हे केवळ प्रेमात असलेल्यांसोबतच होतं असं नाही तर जुन्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप आणि कधीकाळी जीवाभावाचे असलेले आणि आता केवळ ओळखीचे राहिलेले मित्र असं सगळ्याच नात्यांबद्दल लागू होताना दिसत आहे. म्हणजे या डिजिटल फुटप्रिंटचा पॅटर्नही आता ठरलेला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

तो आणि ती.. कॉलेजमध्ये प्रत्येकाला हेवा वाटावा असं त्यांचं नातं.. फेसबुकच्या माध्यमातून सर्वांच्याच परिचयाचं. यामध्ये मग सारंच आलं. साईट्सच्या लिंक्सवरील टँगिंग, मिम्सवरील टँगिंग किंवा चेक इन्स, पिकनिकचे फोटो, वाढदिवसाला लिहिलेल्या प्रेमाच्या लांबच लांब पोस्ट्स, व्हॅलेंटाइन्स पोस्ट.. जगाशी ते एकमेकांबरोबरचा प्रत्येक क्षण शेअर करतात. मात्र अचानक या गोड लव्ह स्टोरीत मिठाचा खडा पडतो अन् त्यांचं ब्रेकअप होतं. मुव्ह ऑन होत ही जोडपी सावरतात, पण त्यांची डिजिटल प्रोफाइल त्यांना पुन्हा भूतकाळात घेऊन जाते.  असं मित्रांच्या बाबतीतही घडतं. कॉजेलमध्ये ‘जय-विरू’ची जोडी नंतर दुरावते मात्र फेसबुक मेमरीज त्यांना त्यांची मैत्री विसरू देत नाही.  तेव्हा किती छान होतं आणि आता असं कसं झाला वगैरेसारखे विचार करून उदास होतात.

मित्रांचे तर असे अनेक ग्रुप असतात की ज्यांच्याबरोबर आयुष्यातील एखाद्या विशिष्ट टप्प्यात खूप जवळीक निर्माण होते. त्यांच्याबरोबर खऱ्याखुऱ्या आयुष्यात आणि डिजिटल माध्यमांवरही भरपूर भटकंती वगैरे होते. मात्र अचानक काहीतरी फिस्कटल्याने ग्रुप तुटतो. त्यानंतर एकमेकांना ‘इग्नोर’ करण्याची जणू स्पर्धा सुरू होते. काळाच्या ओघात अशी नाती विसरून आपण नव्याने सुरुवात करू म्हणत जगू लागतो तोच फेसबुक मेमरीज पुन्हा नात्यांच्या त्या ‘डाऊन मेमरी लेन’मध्ये घेऊन जातात. आणि मग त्या आठवणीमुळे होणारा मानसिक त्रास ठरलेलाच. अनेकांच्या दृष्टीने अशी नाती खासगी आयुष्यामध्ये संपल्यात जमा असली की त्यांचा सोशल नेटवर्किंग साइट्सवर कधी काळी मांडलेला बाजार डोकेदुखी ठरु लागतो. एकेकाळी सारं काही गोड गोड वाटणारं हे डिजिटल आयुष्य वर्तमानात कटू आठवणी घेऊन समोर येतं. म्हणजे एखाद्या नात्यात किंवा मैत्रीमध्येही मुव्हऑन झाल्यानंतर हा डिजिटल फुटप्रिंटचा धागा सतत व्यक्तींचा पाठलाग करत असतो आणि ते ही वर्षांनुवर्षे. म्हणूनच आधीसारखं मुव्हऑन होणं डिजिटल युगात अधिक गुंतागुंतीचं होऊन बसलं आहे. कालबाह्य़ नाती पुढील आयुष्यात स्पीड ब्रेकरसारखी समोर येत असल्याने अनेकजण त्रासले आहेत.

डिजिटल फुटप्रिंट म्हणजे..

एखादी कधीच न मिटवता येणारी गोष्ट संज्ञेसाठी मराठीमध्ये ‘काळ्या दगडावरची रेघ’ असा वाक्यप्रचार आहे. डिजिटल फुटप्रिंटची ही अगदी सोपी व्याख्या आहे असं म्हणता येईल. तांत्रिक भाषेत सांगायचं तर इंटरनेटवर तुम्ही करत असलेली प्रत्येक लहानात लहान गोष्ट म्हणजेच अ‍ॅक्टिव्हिटी ही डिजिटल फुटप्रिंटचा भाग असते. तुम्ही भेट दिलेल्या वेबसाईटपासून इंटरनेटवर कुठल्याही पोर्टलवर दिलेली खासगी माहिती, केलेले व्यवहार सर्वकाही डिजिटल फुटप्रिंटचा भाग असतो. सामान्य भाषेत सांगायचे तर इंटरनेटवरील वाचलेला किंवा लिहिलेला प्रत्येक शब्द हा कुठे ना कुठे नोंदला जातो. एका व्यक्तीशी जोडला गेलेला हा डेटाचा साठा म्हणजे तिची डिजिटल फुटप्रिंट.

असेही बरेच..

या आठवणींचा ज्यांना त्रास होतो अशा व्यक्ती वाढत असल्या तरी काही प्रकरणांमध्ये ‘जैसे थे’ चित्र दिसून येतं. अनेक जुने ग्रुप आणि कॉलेजचं प्रेम लग्नापर्यंत गेलेली जोडपी या आठवणी सोशल नेटवर्किंग साइट्सवरून पुन्हा पुन्हा शेअर करताना दिसतात. अशा मेमरीज एखाद्या ग्रुपबद्दल असतील तर त्या एकाने शेअर केल्यास दिवसभर नोटिफिकेशन्सचा पाऊस पाडण्यासाठी पुरेशा असतात. या आठवणींचे एकाच वेळी दोन पैलू आहेत. संपलेल्या नात्यांमध्ये या आठवणी त्रासदायक ठरतात तर हव्याहव्याशा, पण दूर गेलेल्या नात्यांसाठी त्या स्ट्रेसबस्टर्सही ठरतात. भूतकाळातील नाती वर्तमानातही तशीच टवटवीत असतील तर या मेमरीज त्यांच्यावर नोटीफिकेशन्सचा फवारा मारून ती अधिक तजेलदार बनवतात.

काय कराल?

  • तरुण वयातील प्रेम असेल तर आपण या नात्याबद्दल भविष्यात गांभीर्याने विचार करणार आहोत का हे आधी ठरवून घेणं फायद्याचं ठरू शकतं.
  • आपलं नातं किती घट्ट आहे, त्याचं भविष्य काय आहे याचा विचार करूनच ते सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून जगजाहीर करायचं की नाही हे ठरवावं.
  • अशा ‘नॉट सो शुअर’ प्रकारातील नात्यांबाबत अगदीच गरज असेल तरच  एकमेकांबद्दल सोशल नेटर्किंग साइट्सवर पोस्ट करण्याचा अलिखित नियम पाळावा.
  • जोडीदाराच्या संमतीशिवाय त्याला एखाद्या पोस्टमध्ये टॅग करणं टाळलेलं बरं. किंवा ती पोस्ट मेसेजमधून शेअर करा.
  • व्यक्ती कितीही जवळची असली तरी खासगी फोटो, महत्त्वाची माहिती शक्यतो डिजिटल माध्यमांवरून शेअर करू नका.
  • एखादं नातं फिस्कटलंच तर त्या व्यक्तीबरोबरच्या नको असलेल्या किंवा भविष्यात त्रासदायक ठरू शकतील अशा सगळ्या पोस्ट डिलीट करा. कोणत्याही व्यक्तीच्या प्रोफाइलवर ‘सी फ्रेण्डशीप’ पर्यायामध्ये गेलं तर त्या व्यक्तीसोबत असलेल्या सर्व डिजिटल अ‍ॅक्टिव्हिटीची यादीच उपलब्ध होईल.
  • वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमच्या जोडीदाराच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर नजर ठेवणे टाळा. हे लगेच शक्य नसलं तरी हळूहळू सवय करा.
  • मेसेजस, व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलीट करण्याचा पर्याय या नात्यांच्या गुंत्यातून बाहेर येण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
  • डिजिटल आठवणींमध्ये अडकून राहायचं नसेल तर वर्तमानात स्मार्टफोन वापरताना स्मार्ट पद्धतीने वागा. म्हणजे भविष्यात त्रास होणार नाही.
  • ब्रेकअपनंतर पुढच्या नात्यात शिरताना आधीच्या नात्यासंदर्भातील सर्व गोष्टी जोडीदाराला मोकळेपणे सांगायला हव्यात. डिजिटल माध्यमातून जोडीदाराला भूतकाळ कळल्यास नात्यांमध्ये कटुता येते.
  • नोकरीच्या ठिकाणीही आता व्यक्तीच्या प्रोफाइलवरून त्याचे डिजिटल फुटप्रिंट तपासले जातात. अनेक कंपन्या आता डिजिटल माध्यमावर व्यक्तीचा वावर कसा आहे हे तपासतात. त्यामुळे आता डिजिटल अकाऊण्ट म्हणजे व्यक्तीची व्हच्र्युअल ओळख असते. म्हणूनच सोशल नेटवर्किं ग साइट्सवर पोस्ट करताना सावधगिरी बाळगायला हवी. याचा खासगी तसेच व्यावहारिक जीवनातही बराच फायदा होतो.