पाऊस किती हा डोळी.. रे तुझी आठवण ओली

पावसाच्या.. झिरझिरत्या पडद्याआडून..
झाडाची अनावृत्त सावली

आसवांचे ओले थेंब.. बसून फांदीवर. पाखरांसारखे

रात्रभर मस्ती.. पहाटे पहाटे..
पावसाचा डोळा लागलाय

गडद अंधार.. धुवाधार पाऊस..
चमकते भीती अधुन-मधून

भिजुन भिजुन चिंब.. तळ्यात प्रतिबिंब.
ओलेत्या पाण्याचे

तो थांबत थांबत कोसळतोय..
नदीचा जीव जाईल बेहोशीत म्हणून
श्रावण ओल्या रानगंधाचे अत्तर
प्रश्नाची वाट बघतेय उत्तर..

कुणा प्रियेच्या डोळ्यांमधल्या धारा भूमी जिरवे
रुततो नांगर काळजात, पण प्रेम उगवते हिरवे..

काटा रुते पावसाळी जिव्हारी
पाटात पाणी मुके धावते
गावास वेढून पापांध छाया
देवीस बलिदान ना पावते..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छायाचित्र : साकेत गुडी