स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक महत्त्वाची चित्रकर्ती म्हणजे अमृता शेरगिल. युरोपियन, हंगेरियन शैलीचा एक अप्रतिम मिलाफ त्यांनी भारतीय चित्रशैलीसोबत घडवून आणला. अजिंठय़ातील भारतीय चित्रशैलीमधून आपल्याला ती प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. आजही अनेक चित्रकारांवर त्यांच्या शैलीचा प्रभाव पाहायला मिळतो. अवघ्या
२८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेली सुमारे दोनशेहून अधिक चित्रे आज राष्ट्रीय ठेवा म्हणून मान्यता पावली आहेत.