१. शशांक, अनिकेत, मुग्धा, राही, अनिता, सीमा आणि केदार ही सात जण एका रांगेत बसले आहेत. शशांक हा अनिकेत आणि राही यांच्यामध्ये आहे. मुग्धा ही केदार आणि सीमाच्या मध्ये आहे. अनिता ही अनिकेत आणि केदारच्या मध्ये आहे. राही आणि सीमा या दोन्ही टोकांना बसल्या असतील तर, अनिकेत हा कोणाच्या मध्ये येईल?

२. एक स्कूटर ताशी ३० किलोमीटर या वेगाने चालवली जाते. व तीच स्कूटर वाहतुकीच्या खोळंब्यामुळे ताशी १० किलोमीटर वेगाने परत येते. तर तिचा सरासरी ताशी वेग किती?
३. एका मतदारसंघात स्त्रियांचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण ४५ टक्के आहे. मतदारसंघात एकूण १२ लाख मतदार असतील तर त्यापैकी स्त्रियांची संख्या किती?

श्रेयस दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. तो दक्षिणेकडे सरळ चालत ९ किलोमीटर गेला. तिथून डावीकडे वळून त्याने ४ किलोमीटर अंतर कापले. मग पुन्हा एकदा तो डावीकडे वळला आणि १५ किलोमीटर अंतर चालला. त्यानंतर तो पुन्हा एकदा आधीप्रमाणेच वळला आणि १२ किलोमीटर अंतर चालत गेला. तर त्याचे मूळ स्थानापासूनचे नेमके अंतर किती आणि त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

उत्तरे : १) शशांक आणि अनिता २) १० किलोमीटर ३) ५ लाख ४० हजार ४) १० किलोमीटर, पश्चिम