01vbचायनीज कॉइन्स

साहित्य :
८ ब्रेड स्लाइस
पाउण वाटी गाजराचे बारीक पातळ काप (जुलिअन)
पाउण वाटी फरसबीचे पातळ तिरके काप
१/२ वाटी सिमला मिरची, बारीक चिरून
१/२ वाटी शिजलेल्या नुडल्स
दीड चमचा बारीक चिरलेले लसूण
अर्धा चमचा किसलेले आले
lp32१ ते दीड चमचा तेल
१ चमचा सोया सॉस
चवीपुरते मीठ
थोडे बटर
शेजवान सॉस

कृती :

१) कढईत तेल गरम करावे. त्यात आले आणि लसूण परतावे. नंतर गाजर, फरसबी, सिमला मिरची घालून मोठय़ा आचेवर परतून घ्यावे.
२) अर्धा एक मिनिट परतल्यावर सोया सॉस आणि नुडल्स घालून मिक्स करावे. चवीपुरते मीठ घालून ढवळावे. तयार टॉपिंग बाजूला काढून ठेवावे.
३) ब्रेड स्लाइस गोल आकारात कापून घ्यावेत. त्यासाठी ब्रेड स्लाइसच्या आतील आकाराचा गोल डबा घेऊन त्याने कट करावे.
४) कट केलेले ब्रेड स्लाइस तव्यावर मंद आचेवर बटरवर टोस्ट करावे.
५) टोस्टवर भाज्या आणि नुडल्सचे टॉपिंग ठेवावे. वरून तिखटपणासाठी थोडासा शेजवान सॉस घालावा. लगेच सव्‍‌र्ह करावे.

lp31टेस्टी पावभाजी

साहित्य :

१ वाटी किसलेली कोबी
१ वाटी किसलेले गाजर
१ वाटी बारीक चिरलेली फरसबी
१/२ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची
१ मध्यम बटाटा, उकडलेला
१ चमचा लसूण, बारीक चिरून
१ चमचा पावभाजी मसाला
चवीपुरते मीठ
२ चमचे लोणी

कृती :

१) कोबी, गाजर, फरसबी आणि भोपळी मिरची एकत्र करून कुकरमध्ये वाफवून घ्यावे. वाफवलेल्या भाज्या डावेने चेचून घ्याव्यात.
२) लोणी किंवा तेल गरम करून त्यात लसूण परतावी. त्यात वाफवलेल्या भाज्या घालाव्यात. मिक्स करून पावभाजी मसाला, मीठ आणि बटाटा कुस्करून घालावा. थोडे पाणी घालून गरजेनुसार पातळ ठेवावे. मंद आचेवर शिजू द्यावे.
लादीपाव भाजून पावभाजीबरोबर सव्‍‌र्ह करावी. बरोबर लिंबू आणि बारीक चिरलेला कांदाही द्यावा.

lp33व्हेज क्लब सँडविच

साहित्य :

६ ब्रेड स्लाइस
१ मोठा टोमॅटो, स्लाइस करून
१ मध्यम काकडी, सोलून स्लाइस करावेत
मीठ आणि मिरपूड
२ चमचे मेयॉनीज

व्हेज पॅटीसाठी :
१/२ वाटी गाजराचे तुकडे
१/२ वाटी फरसबीचे तुकडे
१ मध्यम बटाटा
ब्रेड क्रम्ब्ज
१ चमचा बारीक चिरलेले आले-लसूण
१ चमचा तेल
१/४ वाटी चिरलेली कोथिंबीर
२ चिमटी हळद
चवीनुसार मीठ

इतर साहित्य :
चीज स्लाइस किंवा किसलेले चीज
बटर किंवा लोणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती :
१) ब्रेड स्लाइसना दोन्ही बाजूंना लोणी किंवा बटर लावून नॉनस्टीक तव्यावर मंद आचेवर टोस्ट करायला ठेवावे.
२) गाजर आणि फरसबी वाफवून घ्याव्यात. सुरीने त्याचा खिमा करावा. कढईत तेल गरम करून त्यात आधी हळद आणि आले-लसूण परतावे. नंतर कोथिंबीर घालावी. फरसबी आणि गाजराचा खिमा आणि बटाटा कुस्करून घालावा. मीठ घालून मिक्स करावे. दुसऱ्या वाडग्यात काढावे.
३) या मिश्रणात थोडे ब्रेडक्रम्ब्ज घालावे. मिक्स करून मध्यम आकाराच्या चपटय़ा पॅटी बनवाव्यात. ब्रेड क्रम्ब्जमध्ये घोळवून तळून काढाव्यात.
४) एका टोस्टवर थोडे बटर लावावे. त्यावर काकडी आणि टोमॅटो अरेंज करावे. वर मीठ मिरपूड पेरावी. त्यावर दुसरा ब्रेड टोस्ट ठेवावा. त्याला थोडे मेयॉनीज लावावे. वर तळलेली पॅटी ठेवावी. त्यावर चीज स्लाइस किंवा किसलेले चीज घालावे. वरून तिसरा ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच तयार करावे. अशा प्रकारे दुसरे सँडविच तयार करावे.
टोमॅटो केचपबरोबर सव्‍‌र्ह करावे.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com