01vbसाहित्य :
२ वाटय़ा ज्वारीचे पीठ,
२ वाटय़ा पाणी,
१ मोठा कांदा- उभा पातळ चिरून,
१/२ चमचा जिरे
१/४ चमचा हिंग
१/४ चमचा हळद,
१ चमचा मिरची पेस्ट,
१/४ वाटी चिरलेली कोथिंबीर,
तेल,
चवीपुरते मीठ,

lp23कृती :
१) पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, जिरे, हिंग आणि हळद घालून मिक्स करावे. पाण्याची चव पाहावी. थोडी खारट असली पाहिजे म्हणजे पीठ घातल्यावर मीठ बरोबर लागेल.
२) पाणी उकळले की त्यात पीठ घालून आच बंद करावी. नीट मिक्स करून लगेच झाकण ठेवावे.
३) १० मिनिटांनी मळून घ्यावे. मळताना मिरची पेस्ट, कांदा आणि कोथिंबीर घालावी. लागल्यास पाण्याचा हात लावावा. मोठे गोळे करावेत.
४) दोन प्लास्टिक पेपरला आतून तेल लावून थालीपीठ लाटून घ्यावे. तेल सोडण्यासाठी २-३ भोके पाडावीत.
५) तवा गरम करून तेल घालावे. थालीपीठ टाकून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. झाकण काढून आच थोडी वाढवावी. एक बाजू थोडी गोल्डन ब्राऊन होऊ द्यावी. वरच्या बाजूवर आधीच तेल लावावे आणि कालथ्याने बाजू पालटावी. दुसरी बाजू खरपूस होऊ द्यावी.
दह्यबरोबर किंवा लोण्याबरोबर थालीपीठ सव्‍‌र्ह करावे.

lp25केळ्याची टिक्की

साहित्य :
४ मध्यम कच्ची केळी,
१ इंच आले- किसून,
१/२ चमचा वाटलेली हिरवी मिरची,
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ चमचा धनेजिरे पूड,
१/४ चमचा चाट मसाला,
१/४ चमचा गरम मसाला,
१५-२० बेदाणे,
१/२ वाटी ब्रेड क्रम्ब्ज,
चवीपुरते मीठ,
ब्रेडक्रम्ब्ज बाहेरून कोट करायला.

कृती :
१) प्रत्येक केळ्याचे २ तुकडे करावेत. सालासकट कुकरमध्ये ३ शिट्टय़ा करून शिजवून घ्यावेत. केळी शिजली की साल काढून आतला गर किसून घ्यावा.
२) किसलेल्या केळ्यात आले, मिरची, कोथिंबीर, धनेजिरेपूड, चाट मसाला, गरम मसाला, १/२ वाटी ब्रेड क्रम्ब्ज आणि मीठ घालून मळून घ्यावे.
४) छोटय़ा लिंबाएवढे गोळे करावेत. आतमध्ये १-२ बेदाणे घालून कटलेट तयार करावेत. कटलेटना थोडासा पाण्याचा हात लावून ब्रेड क्रम्ब्जमध्ये घोळवावेत.
गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर सव्‍‌र्ह करावेत.
टीप :
ब्रेड क्रम्ब्ज ब्राऊन ब्रेडपासूनही बनवता येतो. ब्राऊन ब्रेड उन्हात वाळवून मिक्सरमध्ये बारीक करावे.
बेदाण्याऐवजी कुठलेही आंबट गोड चवीचे ड्रायफ्रुट जसे अंजीर, जर्दाळूचा लहान तुकडा इत्यादी वापरू शकतो.

lp24इन्स्टंट रवा इडली

साहित्य :
१ कप जाड रवा,
१ टिस्पून तेल
चिमूटभर मोहोरी
चिमूटभर हिंग
१/२ टिस्पून उडीद डाळ
१/२ ते १ टिस्पून चणाडाळ
४ ते ५ कढीपत्ता पाने,
१/२ टिस्पून किसलेले आले,
१/२ कप आंबट दही- घोटलेले,
१/२ कप पाणी,
चवीपुरते मीठ,
१ टिस्पून इनो फ्रूट सॉल्ट (इनो सोडा).

कृती :
१) मध्यम आचेवर, कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग घालावे. आधी चणाडाळ घालून परतावे आणि थोडा रंग बदलला की उडीद डाळ घालावी. उडीद डाळीचा रंग गुलाबीसर झाला की कढीपत्ता पाने घालावीत आणि किसलेले आले घालावे. त्यावर १ कप जाड रवा घालून २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर भाजावे.
२) भाजलेला रवा एका खोलगट भांडय़ात काढून घ्यावा. दुसऱ्या भांडय़ात घोटलेले दही आणि पाणी मिक्स करून त्याचे घट्टसर ताक बनवावे. रवा थोडा कोमट झाला की त्यात हे ताक घालावे (टीप २). चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे. मिक्स करून १० मिनिटे तसेच ठेवावे. कन्सिस्टन्सी नेहमीच्या इडली पिठाएवढीच असावी, खूप घट्ट किंवा पातळ नसावी.
३) इडली कुकरमध्ये (महत्त्वाची टीप ४) तळाला साधारण दीड इंच पाण्याची पातळी ठेवावी आणि पाणी गरम करण्यास ठेवावे. इडली पात्राला तेलाचा किंचित हात लावून घ्यावा (टीप ३). मिश्रणात इनो सोडा घालून एकाच दिशेने मिक्स करावे आणि मिश्रण इडली पात्रात भरावे.
४) पाण्याला उकळी फुटली की इडली स्टॅण्ड कुकरमध्ये ठेवून १२ ते १५ मिनिटे इडल्या वाफवाव्यात. ८ ते १० मिनिटे वाफ जिरल्यावर कुकर उघडून इडल्या चमच्याच्या टोकाने व्यवस्थित सोडवून घ्याव्यात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप :
वरील पाककृती साधी मसाला इडलीची आहे. जर हवे असल्यास किसलेले गाजर, मटार अशा भाज्याही इडलीत घालू शकतो. वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे भाज्या दिसायला हव्या असतील, तर इडली साच्यात आधी चिरलेल्या किंवा किसलेल्या भाज्या ठेवून वर इडलीचे पीठ घालावे. तसेच इडली पिठात डायरेक्ट भाज्या मिक्स करू शकतो, पण त्यामुळे इडल्यांचा रंग बदलतो.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com