mahesh-zagdeस्वत:पासून सुरूवात व्हावी
माणसाच्या विचारप्रक्रियेतच घोळ असल्याने प्रदूषण वाढते आहे. वैचारिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते. तीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण १८० पीपीएम होते. तेव्हा हा ग्रह सगळ्यात स्वच्छ होता. दोन वर्षांपूर्वीचे त्याचे प्रमाण ४०० पीपीएम एवढे असून दरवर्षी ते २ पीपीएमने वाढते आहे. त्या तुलनेत तेव्हा २ टक्के असलेला नागरीकरणाचा वेग आता ५० टक्क्यांवर आला आहे. लोकसंख्येचा स्फोट आणि ऊर्जेचे उत्सर्जन या दोन गोष्टी नियोजन करताना फार महत्त्वाच्या आहेत. जेवढी कॅलरी ऊर्जा जास्त तेवढा कार्बनचा उत्सर्ग जास्त. शहरे असोत वा ग्रामीण भाग, दोन्हीकडे अतिश्रीमंत माणूस हा गरीब आणि मध्यमवर्गीयांपेक्षा १६ पट जास्त प्रदूषण करतो. आपल्या शहरांवर ताण जास्त आहे, कारण आमच्याकडे दरडोई २८ झाडे आहेत. झाडे वाढवण्यासाठी सरकार काय करेल, यापेक्षा आपण काय करू शकतो, याचा विचार झाला पाहिजे. कमीत कमी ऊर्जावापर, चालत कामाच्या ठिकाणी पोहोचता येणे, गाडय़ांपेक्षा सायकलचा पर्याय वाहतुकीसाठी योग्य होईल अशा सुविधा, आहे त्या पर्यावरणाचे जतन-संवर्धन अशा पद्धतीने विचार करून नव्या शहरांचे नियोजन होते आहे. राज्यकर्ते नियोजन करतात, मात्र लोकांनी त्यांना अंमलबजावणीबद्दल धारेवर धरले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. लोकांच्या सहभागाने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग येईल.
– महेश झगडे, आयुक्त
पुणे प्रदेश शहर विकास प्राधिकरण.

vidyadhar-walawalkarनियोजनाअभावी बोजवारा
शहरे झाली म्हणजे प्रगती झाली असा मापदंड मानला जातो. मात्र, शहरीकरण करताना लोकसंख्येच्या वाढीचा वेग लक्षात न घेता केलेल्या नियोजनामुळे साध्या वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. शहरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणापैकी ६० टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते, असे आशियाई देशांच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मात्र, हे प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चोख केली, तर त्याने प्रवास करणाऱ्या व्यक्तीची क्रयशक्ती दहापटीने जास्त वाढेल. एखादा संसर्गजन्य रोगाचा विषाणू आपल्याकडे आला, तर तो आपल्या रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत झपाटय़ाने पसरेल, अशी केविलवाणी अवस्था आहे. आपल्याकडे होणारे हे प्रदूषण आणि आवाज याच्या दुष्परिणामांची जाणीवच आपल्याला नाही. दैनंदिन जीवनात या आवाजांची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर पसरणारी शांतताही आपल्याला सहन होत नाही. आपल्या घरातील टीव्हीच्या आवाजानेही ६० डेसिबलच्या वरची पातळी गाठली आहे. आपल्याला मोठय़ा आवाजात ऐकायला आवडते, असे आपण म्हणतो. पण आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे हे आपल्याला समजत नाही. शहरातील सुविधांचा लाभ घेताना त्याचे दुष्परिणाम होणार नाही ना, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
– विद्याधर वालावलकर,
पर्यावरण दक्षता मंच

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
maharashtra sugar production, 108 lakh ton sugar production
यंदा मुबलक साखर; आतापर्यंत झाले ‘एवढे’ उत्पादन
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट

sujeet-patwardhanवाहतुकीचे नियोजन हवे
शहरातील प्रदूषण हे मुख्यत: वाहतूक व्यवस्थेमुळे होते आहे. वाहनांची गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करताना रस्ते बांधण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढवणे, या पर्यायाचा प्रामुख्याने अवलंब केला जातो. मात्र, रस्ते कितीही वाढवले तरी वाहनांची गर्दी वाढतच राहते. त्यामुळे एवढय़ा वाहनांची गरज आहे का, त्यासाठी वाहतुकीचे अन्य काय पर्याय देता येतील? असा दुसऱ्या बाजूने विचार व्हायला हवा. शहर नियोजन करतानाा मुळात दळणवळण व्यवस्था, त्यासाठी जमिनीचा नेमका वापर, विद्युतपुरवठा, पाणीपुरवठा, जैविक विविधता अशा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. त्या शहरातील पुरातन वास्तू, नदी-नद्यांचे घाट, डोंगरदऱ्या, डोंगर उतार हे परिसर अबाधित ठेवूनच विकास झाला पाहिजे. नदीवरून पूल गेला तर वाहतुकीची सोय होईल, असा व्यावहारिक विचार न करता नदी परिसर जतन करून अन्य काय मार्ग शोधता येईल, अशा पद्धतीने विचार केला पाहिजे.  हे सगळे कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अर्थसंकल्पात आणि पालिकेच्या वार्षिक नियोजनात त्याचा समावेश झाला तरच शहर नियोजन प्रत्यक्षात उतरेल.
– सुजीत पटवर्धन,
पर्यावरण अभ्यासक.

abhay-deshpandeप्रकाश प्रदूषणाचा धोका
गेल्या काही वर्षांमध्ये जल, वायूसोबतच ‘प्रकाश प्रदूषणा’चा धोका निर्माण झाला. पूर्वी दिव्यांचे प्रमाण मर्यादित असताना रात्री पिठूर चांदणे पडायचे. पण आता काही निवडक तारे जेमतेमच दिसतात. आकाशगंगा तर हरवूनच गेली आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास २०५० पर्यंत पिठूर चांदणे पडणारच नाही. आता आकाशाची प्रतवारीही घसरू लागली असून त्याचे मानव, पशुपक्ष्यांच्या दैनंदिन चक्रावरही परिणाम होऊ लागले आहेत. काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यालगतचा रस्ता प्रकाशमान करण्यासाठी दिवे बसविण्यात आले, मात्र त्यामुळे नेहमी ताऱ्यांचा अंदाज घेऊन समुद्रकिनाऱ्यावर प्रजननासाठी येणारी कासवे दिव्यांच्या दिशेने सरकताना दिसू लागली आहेत. अमेरिकेत दिव्याच्या टॉवरवर आदळून तब्बल २.५ कोटी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. पांढऱ्या दिव्यांचा प्रकाश फिल्टर करता येत नसल्याने त्यामुळे जास्त प्रदूषण होते. त्याऐवजी पिवळ्या रंगाचे एलईडी दिवे वापरावेत, अनावश्यक दिवे लावणे टाळल्यामुळेही प्रकाश प्रदूषण कमी करता येईल. अन्यथा, ३०-४० वर्षांमध्ये आपण आकाश हरवून बसू.
– अभय देशपांडे,
प्रकाश प्रदूषणाचे अभ्यासक
response.lokprabha@expressindia.com