दहावी-बारावीनंतर काय करायचं, हा प्रश्न आता पूर्वीपेक्षा वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. आता पूर्वीपेक्षा इतके पर्याय उपलब्ध आहेत की त्यातून नेमकं काय निवडायचं याबाबत द्विधा मन:स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या संधींची माहिती-
कृषीव्यवसाय व्यवस्थापक
भारताच्या एकूण सकल उत्पादनात शेतीचा वाटा साधारणत: २५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान आहे. अजूनही ६० ते ६५ टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी शेतीवर अवलंबून असते. कृषी मालावर आधारित अनेक उद्योग देश-विदेशात कार्यरत आहे. या उद्योगाच्या विकास आणि वाढीमध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम केलेल्या मनुष्यबळाचा मोठा हातभार लागतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी/अन्न प्रक्रिया/ कृषी व्यवस्थापन/ ग्रामीण अर्थकारण या क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यप्राप्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहे.
या अभ्यासक्रमामध्ये सर्वसाधारणत: व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय संवादकौशल्य, कृषी व्यापार आणि ग्रामीण विपणन, पुरवठा-साखळी व्यवस्थापन, कृषीमाल भाव जोखीम व्यवस्थापन, कृषी-वित्तपुरवठा व्यवस्थापन, बि-बियाणे तंत्रज्ञान आणि औद्योगिक वापर, कीटनाशके आणि कीड नियंत्रण व्यवस्थापन, आयात-निर्यात कार्यपद्धती, कापणीपश्चात निर्मिती व्यवस्थापन, बाजार परिस्थितीचे संशोधन, धोरण आणि व्यूहात्मक व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, ग्रामीण वित्तपुरवठा, उद्योजकता विकास, कृषी सहकारी संस्थांचे व्यवस्थापन, विक्री आणि वितरण व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय विपणन, सेवा व्यवस्थापन, एकात्मिक विपणन, संवाद प्रक्रिया, मनुष्यबळ विकास, कामगार कायदे, कार्यान्वयन व्यवस्थापन, ई-कॉमर्स, व्यवस्थापनातील आधुनिक प्रवाह, कृषीजन्य उत्पादनातील आंतरराष्ट्रीय व्यापार संधी, ब्रँड व्यवस्थापन, ग्रामीण बँका, विमा व्यवस्थापन, औद्योगिक संबंध आणि कामगार कल्याण आदी विषयांचा समावेश असतो.
संधी कुठे मिळेल?
कृषी प्रक्रिया उद्योग, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी उपकरणे निर्मिती, कृषी-सहकारी संस्था, कृषी वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनी आणि बँक, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, कुक्कुट पालन आणि मत्सव्यवसाय संस्था, गोडे तेल निर्मिती उद्योग, बी, खते, कीटनाशके निर्मिती उद्योग, गुजरात को-ऑपेरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, आयटीसी, मेट्रो कॅश एण्ड करी, एनडीडीबी, येस बँक, मदर डेअरी फ्रुट एॅण्ड व्हिजिटेबल लिमिटेड, आयडीबीआय बँक, टीसीएस, केफ कॉफी डे, अल्टेक बायोटेक, अवन्ती फीड्स, कोका कोला, बायोकॉन, बॅरिस्टा, कोरोमंडल फर्टलिायझर, गॉडफ्रे फिलिप्स, गूडरिक ग्रुप, हस्तून एॅग्रो, हिमालयन हेल्थ केअर, केरळ काजू विकास महामंडळ, मोनसॅनोटो नागार्जुन ग्रुप, महिको, नेल्लरा ग्रुप ऑफ कंपनीज-दुबई, पॅरी एॅग्रो, ओलॅम इंटरनॅशनल- सिंगापूर, ओरिगा कमोडिटिज, पेप्सिको, हिल्टन दुता रेस्टॅरिआ-इंडोनेशिआ, सनराइज इन्डस्ट्रिज नेपाळ, झुआवरी इंडस्ट्रीज, यात्रा फर्टलिायझर्स, डब्ल्युटीसी-आर्यलंड आदी संस्थांमध्ये उत्तमोत्तम संधी प्राप्त झाल्या आहेत. सध्या सर्वसाधारण पॅकेज वार्षकि आठ ते साडआडे लाख रुपये दिले जाते.
संस्था आणि अभ्यासक्रम :
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबाद
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट/कालावधी- दोन वष्रे/अर्हता- ५० टक्के गुणांसह कृषी किंवा संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येतो. मात्र या विद्यार्थ्यांस कृषी/ खाद्यान्न/ ग्रामीण क्षेत्र या विषयात तीव्र स्वरूपाची आवड असावी. याअनुषगांने त्यास एक विशिष्ट अर्ज ऑनलाइन भरून द्यावा लागतो. हा अर्ज संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जातो. निवड-कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CAT) / मुलाखत/ समूह चच्रेद्वारे.
पत्ता : पीजीपी (एबीएम ऑफिस), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॅम्पस, वस्त्रपूर, अहमदाबाद-३८००१५, दूरध्वनी-०७९-६६४२४६८८, फॅक्स-६६३२६८९६
ईमेल : pgpabm@iimahd.ernet.in
वेबसाइट : www. iimahd.ernet.in
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट :
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एॅग्रिबिझिनेस मॅनेजमेंट (कालावधी- दोन वष्रे) आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅगिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट/कालावधी- एक वष्रे. अर्हता- कृषी आणि तत्सम विषयातील पदवीधर किंवा कृषी व्यवसाय, एनजीओ, सहकारी संस्था, कृषी संस्थामध्ये कार्यरत असणारे कोणत्याही विषयातील पदवीधर आणि कृषी उद्योजक.
पत्ता : डायरेक्टर जनरल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद-५०० ००३०, तेलंगाणा, दूरध्वनी-०४०-२४०१६७०२, फॅक्स-२४०१५३८८
वेबसाइट : http://www.manage.gove.in
ईमेल : dgmanage@manage.gov.in
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ प्लान्टेशन मॅनेजमेंट
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट-एॅग्री बिझिनेस अँड प्लॅन्टेशन मॅनेजमेंट (कालावधी-दोन र्वष) हा निवासी पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. अर्हता-कृषी किंवा फलोद्यान किंवा पशुवैद्यक किंवा फॉरेस्ट्री किंवा सेरिकल्चरसह कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक. प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ मॅनेजमेन्टमार्फत घेण्यात येणारी कॉमन अॅडमिशन टेस्ट -सीएटी किंवा मॅनेजमेन्ट एॅप्टिटय़ूड टेस्ट -एमएटी, किंवा कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट-सीएमएटी या परीक्षा देऊन योग्य गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. कृषी-उद्योग क्षेत्रातील नव्या उदयोन्मुख प्रवाहांशी सुसंगत असा सिलॅबस आहे.
पत्ता : इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ प्लान्टेशन मॅनेजमेंट, ज्ञान भारती कॅम्पस, पोस्ट ऑफिस मालाथल्ली बेंगलुरु-५६००५६,
दूरध्वनी, ०८०-५६००५६,
०८०-२३२१२७६७,
ईमेल : admissions_iipmb@vsnl.net किंवा admissions@iipmb.edu.in
वेबसाइट : http://www.iipmb.edu.in
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमधील महाविद्यालयांमध्ये बीबीए इन अॅग्री हा अभ्यासक्रम सुरू करुण्यात आला आहे. कालावधी- चार वष्रे/ अर्हता- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ इंग्रजी या विषयांसह १२वी उत्तीर्ण जीवशास्त्र किंवा गणित विषय न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येतो. मात्र अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरविलेला जीवशास्त्र किंवा गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
काही महाविद्यालये-
- डी वाय पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी पुणे-४११०४४
- राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, वििलगडन कॉलेज परिसर, सांगली ४१६४१५
- कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता-संगमनेर, जिल्हा-अहमदनगर
- कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी, ता-राहता, जि-अहमदनगर
- कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सरस्वती नगर मुंबई आग्रा रोड, पंचवटी नाशिक-४२२००३
- कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, शारदानगर, बारामती-४११ ०१५
- कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, प्लॉट क्रमांक, पी-७, अतिरिक्त एमआयडीसी, हरंगूळ, बार्शी रोड, लातूर-४१३५१२, वेबसाइट : maha-agriadmission.in/ http://www.macer.org
एमबीए (कृषी)/ अर्हता-बीएस्सी-कृषी/ बीबीए-कृषी/ बीएस्सी-कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ बीएस्सी- कृषी जैवतंत्रज्ञान/ बीएस्सी-उद्यानविद्या/ बीएस्सी-वनशास्त्र/ बी.एफएस्सी-फिशरिज/ बी.टेक -अन्नतंत्रज्ञान
गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर अॅण्ड डेव्हलपमेंट-
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट /कालावधी- दोन वष्रे/ अर्हता- कृषी/ अन्नतंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी / मत्स्यशास्त्र/ उद्यानविद्या/ अन्न प्रक्रिया/ वनशास्त्र/ यातील पदवी किंवा कृषी, अन्नप्रक्रिया उद्योगामधील दोन वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही विषयातील पदवी.
पत्ता : विद्यानगरी, कालीना, सांताक्रुझ (पूर्व)
मुंबई – ४०००९८,
०२२-२६५३०२५८/ २६५३०२६३
ईमेल : http://www.giced.edu.in
वेबसाइट : garware@giced.mu.ac.in
मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझिनेस. अर्हता-कृषी/ कृषी अभियांत्रिकी/ कृषी रसायने/ दुग्धशास्त्र- तंत्रज्ञान/ फिशरिज/ खाद्यान्न शास्त्र/ वनशास्त्र/ गृहविज्ञान/ पशुवैद्यकीय/ फलोद्यान यांपकी कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे.
पत्ता : ३३/१, छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, ऑक्ट्राय नाक्याजवळ, बालेवाडी, पुणे-४११०४५, दूरध्वनी-०२०६६२८९६००
ईमेल : ्info@mitcon.edu.in
वेबसाइट : www. mitcon.edu.in
आनंद अॅग्रिकल्चर युनिव्हर्सटिी
एमबीए इन इंटरनॅशनल अॅग्री बिझिनेस. कालावधी- दोन वष्रे/ अर्हता-कृषी व्यवस्थापन/ पशु वैद्यकीय/ कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान/ अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान/ वनशास्त्र/ कृषी जैवतंत्रज्ञान/ फिशरिज/ फलोद्यान या विषयातील पदवी.
पत्ता : िप्रसिपाल, इंटरनॅशनल एॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट, आनंद-३८८११०, टेलेफॅक्स-०२६९२-२६४०५२
ईमेल : iabmi@aau.in
वेबसाइट : http://www.aau.in
वुई स्कूल
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन अॅग्री-बिझिनेस मॅनेजमेंट. कालावधी- ११ महिने/ पार्ट टाइम. अर्हता- कला/ वाणिज्य/ विज्ञान/ औषधी निर्माणशास्त्र/ अभियांत्रिकी/ वैद्यकीय/ कृषी/ संगणकीयशास्त्र/ व्यवस्थापन शाखेतील पदवी.
पत्ता : वुई स्कूल, प्रिन्सिपल एल. एन. वेिलगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट एॅण्ड रिसर्च, लक्ष्मी नॅप्पो रोड, माटुंगा जिमखान्याच्या विरुद्ध दिशेला, मुंबई-४०० ०१९, दूरध्वनी- ०२२-६५२७२९७६
ईमेल : pgdmdlp@welingkarmail.org वेबसाइट : www.welingkaronline.org
नवं शिका
शॉर्ट टर्म कोर्स इन सायबर क्राइम अॅण्ड सायबर फोरेन्सिक.
हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फम्रेशन टेक्नालॉजी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आला आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. कालावधी- चार महिने. अर्हता- इलेक्ट्रानिक्स विषयात आयटीआय/ पदविका/बीई किंवा एम.एस्सी
पत्ता : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ४३१००४, दूरध्वनी- ०२४०-२९८२०२१
वेबसाइट : aurangabad@nielit.gove.in
ईमेल : dir-aurangabad@nielit.gove.in
कौशल्यपूर्ण समाजासाठी
आपल्या पंतप्रधानांनी कौशल्य भारत, कुशल भारतचा नारा दिला आहे. विविध क्षेत्रांमध्ये तांत्रिक कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. सध्या चांगल्या कारागीर आणि तंत्रज्ञाची फार चणचण भासू लागली आहे. एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे अशी स्थिती. ही विसंगती दूर व्हावी आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य भारतचा उपक्रम राबवला जात आहे. पुढील काही अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांमध्ये संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक असे तंत्रकौशल्य निर्मितीस उपयुक्त ठरू शकतात. मात्र तंत्रकुशलता मिळवल्यावर त्याचा वापर उत्कृष्टरीत्या करता आला पाहिजे, अन्यथा असे कितीही अभ्यासक्रम केले तर आणखी एक अभ्यासक्रम या समाधानापलीकडे त्याचे मोल उरत नाही, ही बाब लक्षात ठेवायला हवी.
सीसीटीव्ही तंत्रज्ञ
दक्षिण मुंबईत नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र लावण्यात आले. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ही यंत्रणा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. यापुढे प्रत्येक स्मार्ट शहरे आणि स्मार्ट घरांच्या उभारणीत सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतील. कोणतीही यंत्रणा जेव्हा लागते वा कार्यान्वित होते तेव्हा त्याची देखभाल दुरुस्ती या बाबी येतातच. त्या करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. यापुढच्या काळात सीसीटीव्ही वापर मोठय़ा प्रमाणावर वाढणार हे लक्षात घेऊन सीसीटीव्हीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करून ठेवल्यास ते उपयुक्त ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मार्फत सीसीटीव्ही बिझनेस हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अल्प कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम उद्योजकता विकास प्रकल्पांतर्गत नियमितरीत्या आयोजित केला जातो. या प्रशिक्षणात सीसीटीव्ही यंत्रणेची मूलभूत तत्त्वे, यंत्रणा लावण्याची कार्यपद्धती, तांत्रिक बाबी, व्यवसायाची शक्यता, प्रकल्प अहवाल आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय हा व्यवसाय करण्यासाठी कर्जाची उपलब्धता याविषयीही माहिती दिली जाते. खादी व ग्रामोद्योग आयोग ही संस्था केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या प्रशिक्षणास दहावी वा बारावी उत्तीर्ण उमेदवारास प्रवेश मिळू शकतो.
पत्ता : सी. बी. कोरा इन्स्टिटय़ूट, िशपोली गाव, गावदेवी मदानजवळ, महापालिका शाळेसमोर, िशपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, दूरध्वनी – ०२२-२८९८११०५
शासकीय तंत्रनिकेतन मुंबई, येथे तीन महिने कालावधीचा सीसीटीव्ही फायर अलार्म सिक्युरिटी सिस्टीम हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
पत्ता : ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
संकेतस्थळ : http://www.gpmumbai.ac.in
ई-मेल : communitypolytechincmumbai @gmail.com
फोर व्हीलर पेट्रोल कार मेन्टेनन्स
एका सर्वेक्षणानुसार मुंबईच्या रस्त्यावर दररोज तीनशेच्या आसपास नव्या चारचाकी गाडय़ा येतात. पूर्वी लोकांकडे एक गाडी असायची आता दोनपेक्षा अधिक गाडय़ा असतात. देशात चारचाकी वाहनांचे उत्पादन वाढत आहे. त्याचबरोबर लोकांची गरजही वाढत आहे. क्रयशक्तीत झालेली वाढ आणि बँकांकडून सुलभतेने मिळणारे कर्ज यामुळे चारचाकी वाहनांच्या खरेदीस चालना मिळाली आहे. या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या देखभाल दुरस्तीत वाढ होत आहे. त्यासाठी या विषयातील तंत्रकुशल उमेदवारांची निकड मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन खादी आणि ग्रामोद्योग या शासकीय संस्थेने फोर व्हीलर पेट्रोल कार मेन्टेनन्स हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रीमिअर, मारुती, हय़ुंदाई, टाटा आदी आधुनिक चारचाकी वाहनांचे देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये इंजिन दुरुस्ती, अॅक्सल क्लच, सस्पेंशन, गिअर बॉक्स, ब्रेक आणि या वाहनांच्या इतर भागांच्या दुरस्तीच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण पंधरा दिवसांचे आहे. इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. किमान दहावी उत्तीर्ण आणि १६ वष्रे वय असलेल्या उमेदवारांना या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळू शकतो.
प्रशिक्षणाचे ठिकाण :
- नियमित बॅच – जी-२, क्रमांक ५ एॅव्हेन्यू, बिझनेस पार्क, दुर्गाडी चौक,
- कल्याण (पश्चिम)- ४२१३०१.
- शनिवार-रविवार बॅच – ३०/३१, डिव्हाइन शेरेटॉन प्लाझा, जैन मंदिराजवळ,
- भाईंदर (पश्चिम), मुंबई – ४०११०५.
स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना आयोगामार्फत राबवली जाते. त्याविषयी या प्रशिक्षणकाळात माहिती दिली जाते.
पत्ता : सी. बी. कोरा इन्स्टिटय़ूट, िशपोली गाव, गावदेवी मदानजवळ, महापालिका शाळेसमोर, िशपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, दूरध्वनी-०२२-२८१७०७८०.
अॅण्ड्रॉइड अॅप डेव्हलपमेंट
आपले दैनंदिन आयुष्य स्मार्ट करणारे साधन म्हणजे विविध आकार-रंग आणि स्टाइलचे स्मार्टफोन. या स्मार्टफोन्समधील विविध अॅप्स आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहाय्याला येतात. आपले आयुष्य अधिक आनंददायी आणि सोपे करणाऱ्या या अॅप्सची निर्मिती सतत होत असते. लाखो अॅप्सची निर्मिती आतापावेतो झाली आहे. त्यात दिवसागणिक वाढ होत आहे. एखादी भन्नाट कल्पना सुचून असे अॅप्स विकसित होत आहेत. अशी कल्पना तुम्हा-आम्हालाही सुचू शकते. त्यातून एखाद्या नावीन्यपूर्ण अॅपचा जन्मही होऊ शकतो. अॅप्सची निर्मिती हा एक करिअरचा पर्याय निवडता येऊ शकतो. सर्जनशील मन असलेली आणि काही तरी हटके करण्याची क्षमता ठेवणारी कोणतीही व्यक्ती या करिअरकडे वळू शकते. संगकणशास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तींना हे करिअर करणे सोपे जाऊ शकते. पण या क्षेत्रात मनापासून रस असणाऱ्या व्यक्तीही या क्षेत्रात प्रयत्न आणि परिश्रमाने येऊ शकतात. त्या अनुषंगाने मनिपाल ग्लोबल एज्युकेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मनिपालप्रोलर्न या संस्थेने अॅण्ड्रॉइड अॅप डेव्हलपमेंट हा अभ्यासक्रम विकसित केलाय. हा अभ्यासक्रम ऑनलाइन म्हणजेच घरच्या घरी करता येतो. या अभ्यासक्रमात स्वत:च्या अॅपची निर्मिती आणि विकास, संकल्पनेचा विकास, अॅप डिझायिनग, अॅण्ड्रॉइड कार्यप्रणाली, अॅप्ससाठी आवश्यक असणारे विविध डाटोबेसेस, अॅप देण्यासाठी आवश्यक ठरणारे क्लाऊड डाटा सव्र्हर, मल्टिमीडिया सह अॅप्सची निर्मिती, अॅप्सचे लेआऊट, अॅप्सच्या अनुषगांने विविध सेवा, नवे प्रकल्प, बहुविध स्क्रीनची निर्मिती, कनेक्टिव्हिटी अशा या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
संपर्क : http://www.manipalprolearn.com
ई-मेल : info@manipalprolearn.com
फायर आणि इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा
मुंबईस्थित शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेने कौशल्य निर्मितीच्या अनुषंगाने विविध तांत्रिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम संबंधित विषयात प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरतात. या अभ्यासक्रमामध्ये फायर आणि इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. हा अभ्यासक्रम भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बी.एस्सी. पदवी घेतलेले उमेदवार वा दहावीनंतर आयआयटी केलेले उमेदवार करू शकतात. या अभ्यासक्रमात आगीपासून लोकांचे संरक्षण करण्याच्या विविध पद्धती, सुरक्षिततचे उपाय, आगीच्या धोक्याचे विश्लेषण, आग नियंत्रित करण्याविषयीच्या मूलभूत संकल्पना, आगनियंत्रणाची विविध तंत्रे आणि कौशल्य, औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षिततेच्या मूलभूत बाबी, सुरक्षिततेचे विविध उपाय व यंत्रणा, सुरक्षिततेविषयक धोरणे आणि कार्यपद्धती, आणीबाणीच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजना, सुरक्षाविषयक पाहणी व सर्वेक्षण, सुरक्षा व्यवस्थापन कार्यपद्धती, अपघात नियंत्रण कार्यपद्धती, आरोग्यविषयक व्यावसायिक समस्या, सुरक्षिततेसंदर्भातील विविध कायदे, नियम आदी विषयांच्या ढोबळमानाने समावेश केला जातो. याच विषयात एक वर्षांचा अॅडव्हान्स्ड डिप्लोमासुद्धा या संस्थेत करता येतो. हा अभ्यासक्रम अनुभवप्राप्त बारावी विज्ञान शाखेतील उमेदवार, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक शाखेतील बी.ई. पदवीधारक आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह विज्ञान पदवीधारकांना करता येतो.
पत्ता : ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
संकेतस्थळ : http://www.gpmumbai.ac.in
लिफ्ट मेकॅनिक
सर्वत्र सध्या स्मार्ट सिटीजचा बोलबाला आहे. स्मार्ट सिटीजचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे मोठ मोठी गृह संकुले. मुंबईसारख्या शहरात आता ५० मजल्यांपेक्षाही अधिक उंचीची घरे बांधली जात आहेत. या सर्व घरांना अत्याधुनिक लिफ्ट बसवण्यात येतात. या लिफ्ट लावणे, त्यांची नियमित दुरुस्ती आणि देखभाल यासाठी या विषयातील तंत्रकुशल व्यक्तींची गरज सध्याच मोठय़ा प्रमाणावर भासत आहे. पुढील काळात ही गरज आणखी वाढणार आहे. त्या अनुषंगाने या विषयातील ज्ञान मिळवून ठेवल्यास ते या क्षेत्रातील करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या विषयातील प्रशिक्षण मुंबईस्थित शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेने सुरू केले आहे. या संस्थेच्या सामूहिक तंत्रनिकेतन योजनेंतर्गत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून त्यास भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे साहाय्य मिळाले आहे. हा अभ्यासक्रम लिफ्ट मेकॅनिक या नावाने ओळखला जातो. तो तीन महिने कालावधीचा आहे. यामध्ये लिफ्ट यंत्रणेविषयी आवश्यक बाबीचे प्रशिक्षण दिले जाते. दहावी उत्तीर्ण आणि १८ ते ४५ वष्रे वयोगटातील व्यक्तींना हा अभ्यासक्रम करता येतो.
पत्ता : सामूहिक तंत्रनिकेतन, शासकीय तंत्रनिकेतन, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), दूरध्वनी-०२२-२६४७४५८७ मुंबई-४०००५१
संकेतस्थळ : www.gpmumbai.ac.in
ई-मेल : communitypolytechincmumbai @gmail.com
मेरिटाइम कॅटिरग
व्यापारी आणि नागरी सागरी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. ही वाहतूक प्रवासी जहाजांद्वारे केली जाते. यामध्ये शेकडो प्रवाशी आणि जहाजाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ असते. जहाजाचा प्रवास हा रात्रंदिवस अनेक आठवडे चालू राहतो. या प्रवासादरम्यान जहाजावरील कर्मचारी आणि प्रवाशांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था केली जाते. जहाजावर स्वतंत्र आणि अद्ययावत असा कॅटिरग विभाग असतो.
या विभागात काम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. कॅटिरग विषयात अभ्यासक्रम वा प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी ही संधी मिळू शकते. जहाजावरचे जीवन हे भूपृष्ठावरील जीवनापेक्षा थोडे वेगळे असल्याने कॅटरिंगच्या गरजाही वेगळ्या असतात. त्या अनुषंगाने ट्रेिनग शिप रहमान या ठिकाणी सर्टििफकेट कोर्स इन मेरिटाइम कॅटिरग हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे तो उपयुक्त ठरू शकतो. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस हा अभ्यासक्रम करता येतो. या विद्यार्थ्यांस दहावी आणि बारावीमध्ये इंग्रजीत किमान ४० टक्के गुण मिळायला हवेत. अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड चाचणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते. यात उत्तीर्ण झाल्यासच अंतिम निवड केली जाते.
संपर्क : ट्रेिनगशिप रहमान, पोस्ट ऑफिस नाव्हा, ता. पनवेल, जि. रायगड-५१०२०६, दूरध्वनी-०२२-२७२१२८००
वेबसाइट : www.tsrahaman.org
ईमेल : booking.cmch@tsrahman.org
अॅडव्हान्स्ड नेटवìकग
संगणकाचे मूलभूत प्रशिक्षण घेतल्यास रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन इंडो-जर्मन टूल रूम या संस्थेने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अल्पमुदतीचे कौशल्यनिर्मिती प्रशिक्षण सुरू केले आहे. ही संस्था भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
१) सर्टििफकेट कोर्स इन अॅडव्हान्स्ड नेटवìकग
या अभ्यासक्रमात विविध सॉफ्टवेअर्स कसे हाताळावेत याविषयी शिकवले जाते. यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पाइंट, नोट पॅड या सॉफ्टेवअर्सचा समावेश आहे. शिवाय िवडो एक्सपीचे व्यवस्थापन आणि देखभाल, संगणक बसविणे, संगणकीय भागांची जोडणी, हाताळणी, सव्र्हर नेटवर्क आणि नेटवìकगसंबंधित वेगवेगळ्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
२) सर्टििफकेट कोर्स इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेन्टेनन्स अँड नेटवìकग
या अभ्यासक्रमात नेटवìकग आणि ऑपरेटिंग कार्यप्रणालीची मूलभूत ओळख, संगणकाशी संबंधित स्मृती (मेमरी), साठवणूक (स्टोअरेज), संगणक हाताळताना निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि त्याचे निराकरण, संगणकाच्या भागांची जोडणी आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. या दोन्ही प्रशिक्षणांना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. या प्रशिक्षणाचा कालावधी प्रत्येकी तीन महिने.
पत्ता : इंडो जर्मन टूल रूम, पी-३१, एमआयडीसी इंडस्ट्रिअल एरिआ, चिखलठाणा, औरंगाबाद ४३१००६, दूरध्वनी-०२४०-२४८६८३२
वेबसाइट : http://www.igtr-aur.org
ई-मेल : gm@igtr.aur.org
स्पा आणि मसाज
आपल्या जीवनशैलीत सतत बदल होत आहेत. अधिक आरामदायी आणि शरीराला सुखावणाऱ्या आणि श्रम करून थकलेल्या शरीराला वेगळ्या प्रकाराचा आराम आणि तजेला देणाऱ्या बाबी लोकांना हव्या असतात. या बाबी स्पामध्ये मिळतात. गेल्या काही वर्षांत स्पा उद्योग/ व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर विस्तारला आहे. स्पामध्ये विविध प्रकारचे मसाज केले जातात. सुगंधी तेले, उटणे यांचा वापर करून शरीर आणि त्वचेला तजेला दिला जातो. मनास प्रसन्नता निर्माण होण्यासाठी विविध सुगंधी तेले आणि उटण्यांचा वापर केला जातो. दैनंदिन ताणतणाव घालण्यासाठी स्पामध्ये जाऊन तेथील विविध साधनांचा वापर करण्याकडे कल वाढत आहे.
या विषयात कौशल्य प्राप्त करून रोजगार-स्वयंरोजगारच्या क्षेत्रात संधी मिळू शकतात. स्पा प्रशिक्षण संस्थांमध्ये साधारणत: अरोमा थेरपी, थाई मसाज, आयुर्वेदिक अभ्यंग, मसाजचे विविध प्रकार, पारंपरिक बांबू मसाज, तळव्यांशी संबंधित मसाज, स्वीडिश मसाज, स्नायूंसाठी मसाज, शरीरात विविध भागांमध्ये होणाऱ्या वेदना निर्मूलनाचे मसाज, वाफ आणि उष्णता प्रक्रिया, चेहऱ्यासाठीचे मसाज, शरीर आणि चेहऱ्यासाठी औषधीयुक्त पॅक, स्पा व्यवस्थापन आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण वेगवेगळ्या घटकांसाठी दोन दिवसांपासून ते पाच दिवसांपर्यंतचे असू शकते. काही संस्थांचे प्रशिक्षण पॅकेज महिना-दीड महिन्याचे असते. त्यामध्ये सर्वच बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. स्वत:च्या व्यवसायासोबतच पंचतारांकित हॉटेल्स, क्लब, पंचतारांकित स्पा केंद्रे कॉर्पोरेटसाठी असलेली खास मसाज केंद्रे आदी ठिकाणी संधी मिळू शकते. प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्थांच्या वेबसाइट
- तुलीप इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ वेलनेस- ६www.tulipindia.net
- कपिल्स सलून अॅण्ड अॅकॅडमी- kapilssalon.com
- प्रिस्टिन सेन्सेस- ptistinesenses/net
- बुटिक- www.butic.com
व्यवसाय कॅटिरगचा
मिटकॉन (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल अॅण्ड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) सेंटर फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अॅण्ड स्किल डेव्हलपमेंट या संस्थेने सर्टििफकेट कोर्स इन कॅटिरग सुरू केला आहे. ही संस्था सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाशी निगडित कौशल्यनिर्मिती कार्यक्रमाला सहकार्य करणारी संस्था आहे.
वाढता कॅटिरग व्यवसाय आणि त्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ या बाबी लक्षात घेऊन या प्रशिक्षणात विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विविध प्रकारचे सूप, चाट मसाला, स्नॅक्स, सामिष अन्नपदार्थ, पंजाबी अन्नपदार्थ, विविध अन्नपदार्थासाठी आवश्यक पोषणमूल्यांची माहिती, वेगवेगळ्या खाद्यपदार्थ निर्मितीची प्रक्रिया, कॅटिरग व्यवस्थापन, मेन्यू नियोजन आणि डेकोरेशन, परवाने आणि नियम, कर्ज आणि सवलती, विपणन, वेळ आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला हे प्रशिक्षण घेता येते. प्रशिक्षणाचा कालावधी दीड महिने.
हे प्रशिक्षण घेतल्यावर संबंधित उमेदवार कँटीन, फास्ट फूड जॉइंट्स, स्नॅक्स सेंटर आदी व्यवसाय सुरू करू शकतात. लग्न, वाढदिवस किंवा इतर छोटय़ामोठय़ा समारंभांमध्ये कॅटिरगची सेवा पुरवू शकतात.
पत्ता : मिटकॉन (महाराष्ट्र इन्डस्ट्रिअल अॅण्ड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) सेंटर फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अॅण्ड स्किल डेव्हलपमेंट, ३३/१, छत्रपती शिवाजी क्रीडा कॉम्प्लेक्स, ऑक्ट्राय नाक्याजवळ, बालेवाडी, पुणे-४११०४५, दूरध्वनी-०२०-६६२८९६४२
वेबसाइट : http://mitcontraining.com
ई-मेल : msdc@miconindia.com
ओळखावया लक्ष्मीची पावले
संपत्ती नियोजन म्हणजेच वेल्थ मॅनेजमेट ही संकल्पना आपल्या देशात चांगली रुजत आहे. वाढते आíथक उत्पन्न हे जसे यासाठी कारणीभूत ठरते आहे तसेच या विषयांच्या अनुषंगाने निर्माण झालेली जाणीवजागृतीसुद्धा महत्त्वाची आहे. पारंपरिक दृष्टीने गुंतवणुकीकडे बघण्याचा कल असलेल्या आपल्या समाजात आता या अनुषंगाने नवी जागृती होत आहे. आलेला पसा हा केवळ न गुंतवता तो सुरक्षितरीत्या कसा वाढेल, त्याची वृद्धी होत असताना कशा रीतीने चलनवाढ आणि महागाईचा फटका बसणार नाही, कोणती गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते, गुंतवणुकीचे विविध प्रकार, त्यातील वैविध्य, गुंतवणुकीचे विविध प्रवाह, गुंतवणुकीची क्लिष्टता आणि सहजता अशा कितीतरी बाबी आज बऱ्याच जणांना समजून घ्याव्याशा वाटतात.
संपत्ती नियोजन हा विषय इतर विषयांसारखाच महत्त्वाचा असल्याचे अनेकांना वाटू लागल्याने या क्षेत्रात करियरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी कमावते तरुण-तरुणी आपल्या गुंतवणुकीसाठी पालकांवर अवलंबून असायची. पण ही परिस्थिती बदलू लागली आहे. आता तरुणाई स्वतंत्रपणे विचार करून कमावते झाल्या झाल्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा विचार करू लागतात. त्यांना हे पर्याय उत्तमरीत्या समजावून सांगण्याची सेवा वेल्थ मॅनेजर, फायनान्शिअल प्लानर देऊ शकतात.
इतरांच्या पशाचे नियोजन करण्याच्या या शास्त्रातील गती आणि कौशल्य या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांनासुद्धा चांगले मानधन वा फी मिळवून देऊ शकते. संपत्ती नियोजनाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात अधिकाधिक कंपन्या उतरत आहेत. जुन्या संस्था या विषयांच्या स्पेशलाइज्ड शाखा उघडताहेत. सध्या आपल्या देशाला एक लाखांच्या आसपास तज्ज्ञ वेल्थ मॅनेजरची गरज असल्याचा या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांचा अंदाज आहे. या क्षेत्रासाठी सध्या आवश्यक तज्ज्ञांची मागणी आणि पुरवठा यामध्ये सध्या निश्चितपणे दरी पडलेली आहे.
सध्या आíथक विकासाचा दर हा नकारात्मक दिसत असला तरी नजिकच्या भविष्यात हा दर सकारात्मक होण्याची चिन्हे पुन्हा दिसू लागली असल्याचे भाकित या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करताहेत. भारतातील गुंतवणुकीचा दर हा साधारणत: ३५ ते ३८ टक्क्यांचा आसपास आहे. यापकी केवळ तीन ते पाच टक्के गुंतवणूक ही स्टॉक मार्केटमध्ये केली जाते. त्यामुळे या क्षेत्रातील वृद्धीच्या विविध संधी अद्याप दुर्लक्षित आहेत. वेल्थ मॅनेजमेंट कंपन्या आणि वेल्थ मॅनेजर्स या दुर्लक्षित क्षेत्राकडे वळू शकतात.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेणे जसे आवश्यक आहे, त्याचबरोबर सराव आणि अनुभवसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. ही बाब सातत्यपूर्ण अभ्यासानेच साध्य होऊ शकते. वेल्थ मॅनेजमेंटच्या दृष्टीने विविध प्रॉडक्ट्स (विमा योजना / म्युच्युअल फंड्स /बँकांतील गुंतवणूक / सोने-चांदी आणि इतर मौल्यवान धातूतील गुंतवणूक /कलाक्षेत्रातील गुंतवणूक/ परदेशी मार्केटमधील गुंतवणूक आदी) यांचा अचूक अभ्यास असणे आवश्यक ठरते. ग्राहकांच्या गरजा ओळखून या सर्व प्रॉडक्ट्सची उपयुक्तता निश्चित करण्याचे ज्ञान अशा अभ्यासातूनच मिळू शकते. ग्राहकांच्या माथी कोणतेही प्रॉडक्ट्स मारून उपयोग नाही. यामध्ये केवळ कमिशन मिळणे हाच हेतू साध्य होतो. पण ग्राहकाचे दीर्घ मुदतीमध्ये नुकसानच होते. ही बाब वेल्थ मॅनेमेंटच्या संकल्पनेला छेद देणारी ठरते. आपल्याकडे आतापावेतो असेच घडत आले आहे. उदाहरणार्थ गरज नसताना विमा योजना गंतवणुकीचे साधन म्हणून विकल्या जात होत्या. बहुतेक सर्व विमा योजनांमधून मिळणारे व्याज हे सहा ते साडेसहा टक्के असल्याने ग्राहकांचे नुकसानच झाले आहे. ग्राहकांच्या गरजा, वित्तीय उद्दिष्ट लक्षात न घेता त्यांना कोणतेही प्रॉडक्ट विकण्यारच भर दिल्याने आपल्याकडे वेल्थ मॅनेजमेंटचा विस्तार व विकास म्हणावा त्या गतीने होऊ शकलेला नाही. ही परिस्थिती आता बदलत आहे.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांचा दृष्टिकोन हा स्वत:च्या फायद्यापुरता मर्यादित न ठेवता ग्राहकांच्या परिपूर्ण हिताचा असणे गरजेचे आहे. संपत्तीत वृद्धी आणि चलनवाढीस समर्थपणे तोंड देत सध्याची जीवनशैली पुढेही कायम ठेवण्यासाठी या संपत्तीचा उपयोग कसा होईल याचे सुव्यस्थित मार्ग ग्राहकांना दाखवणे हे वेल्थ मॅनेजरचे कौशल्य ठरते. यासाठी बाजारव्यवस्थेतील चढउतार, या चढउतारांवर होणाऱ्या विविध घटकांचा परिणाम, जागतिक घडामोडींचे होणारे परिणाम, नवे प्रवाह, शासकीय पातळीवरील अर्थविषयक धोरणांचा बाजारावर होणारा परिणाम याचे ज्ञान वेल्थ मॅनेजरला असणे आवश्यक ठरते. उत्तम संवाद कौशल्य, सादरीकरणाचे कौशल्यसुद्धा महत्त्वाचे ठरते.
करिअरच्या संधी
या क्षेत्रातील प्रशिक्षित उमेदवारांना मोठय़ा बँका, ब्रोकरेज हाऊसेस, वेल्थ मॅनेजमेंट कंपन्या, विमा कंपन्या, सनदी लेखापालांच्या कंपन्या इथे संधी मिळू शकते. शिवाय ग्राहकांना व्यक्तिगत सल्ला -सेवा दिला जाऊ शकतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धीच्या अनेक शक्यता आणि संधी दडलेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही वेल्थ मॅनेजर्सना करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारा उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असावा. या उमेदवाराने चार्टर्ड फायनान्शिएल अॅनॅलिस्ट हा अभ्यासक्रम केल्यास उत्तम. अभ्यासक्रम करताना एखाद्या वित्तीय नियोजन संस्थांमध्ये उमेदवारी केल्यास अनुभव आणि कार्यात्मक ज्ञानामध्ये वाढ होऊ शकते. वित्तीय ज्ञानासोबतच व्यवस्थापकीय कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम केल्यास अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. दर्जेदार संस्थेतील पदवी, एमबीए आणि अनुभव या बाबींच्या आधारावर या क्षेत्रातील मानधन/पगार अवलंबून असते. खाजगी क्षेत्रात्तील वित्तीय संस्थांमधील वेल्थ मॅनेजर्स वाìषक १५ लाखांपर्यंतचे वेतन मिळवू शकतात. राष्ट्रीय बँकांमध्ये अशा व्यावसायिकांना वार्षकि आठ ते नऊ लाख वेतन मिळू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशा उमेदवारांना १२ ते १५ लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.
अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था :
१) आयसीआयसीआय डायरेक्ट सेंटर फॉर फायनान्शिएल लìनग
या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत :
- फौंडेशन प्रोग्रॅम फॉर स्टॉक इन्व्हेिस्टग
- बिगिनर्स प्रोग्रॅम ऑन फ्युचर अॅॅण्ड ऑप्शन्स
- टेक्निकल अॅनॅलिसीस
- अॅडव्हान्स्ड डेरिव्हेटिव्हज ट्रेिडग स्ट्रेटेजी
- मार्केट मास्टर
- पर्सनल फायनान्शिएल प्लािनग
- फास्ट ट्रॅक फौंडेशन प्रोग्रॅम ऑन स्टॉक इन्व्हेिस्टग,
- फास्ट ट्रॅक फौंडेशन प्रोग्रॅम ऑन फ्युचर अॅण्ड ऑप्शन्स.
हे अभ्यासक्रम स्टॉक मार्केटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
सपंर्क : श्री सावन नॉलेज पार्क,प्लॉट नंबर- डी-५०७, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, तुभ्रे, नवी मुंबई- ४००७०५, दूरध्वनी : ०२२-४०७०१०००, फॅक्स :४०७०१०२२
वेबसाइट : content.icicidirect.com
ई-मेल : learning@icicisecurities.com
२) बीएसई इन्स्टिटय़ूट
या संस्थेने स्टॉक मार्केटशी संबधित विविध विषयांवर विविध कालावधीचे अभ्यासक्रम सुरूकेले आहेत. हे अभ्यासक्रम गुंतवणूकदारांसोबतच उद्योजक, व्यावसायिक यांना उपयुक्त ठरू शकतात. या अभ्यासक्रमांमध्ये आíथक व गुंतवणुकीचा सल्ला, मागदर्शन, स्टॉक मार्केटमधील चढउतारांचं विश्लेषण अशासारख्या विषयांचा समावेश आहे.
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॉक मार्केट्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी-एक वर्ष / अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी
- ग्लोबल फायनान्शिअल मार्केट्स प्रोफेशनल-अर्हता-कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण
इतर अभ्यासक्रम :
- बेसिक कोर्स ऑन स्टॉक मार्केट
- फायनान्शिएल मॉडेिलग
- सर्वलेिंस, रिस्क मॅनेजमेंट अॅण्ड सेक्युरिटीज सेटलमेंट
- अॅप्लिकेशन ऑफ बिव्हेरिएल फायनान्स इन इव्हेिस्टग
- फंडामेन्टल अॅनॅलिसीस
- व्हॅल्यूएशन अॅण्ड मॉडेिलग फॉर बँकिंग सेक्टर
- अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम ऑन डेरिव्हेटिव्हज
- अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम ऑन स्टॉक मार्केट
- सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन कमोडिटी अॅण्ड करन्सी मार्केट
- सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन कॅपिटल मार्केट
- अकौंटिंग ऑफ फायनान्शिएल इन्स्ट्रमेंटस अॅण्ड डेरिव्हेटिव्हज
- इक्विटी पोर्टफोलिओ स्ट्रक्चर अॅण्ड स्टॉक अॅनालिसिस
- सर्टििफकेट प्रोग्रॅम इन करन्सी मार्केट
- बेसिक प्रोग्रॅम ऑन डेरिवेटिव्हज. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीप्राप्त व्यक्तीला हा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क : बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड १८ आणि १९ वा माळा, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई,-४००००१
ई-मेल : admissions@bseindia.com, training@bseindia.com,
वेबसाइट : gfmp.bsebti.com
हेल्पलाइन : १८०० २२ ९०३०
३) इन्स्टिटय़ूट ऑफ इन्शुरन्स अॅॅण्ड मॅनेजमेंट
या संस्थेंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ अॅक्चुरिएल सायन्स या संस्थेने द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅक्चुरिएल सायन्स हा दीड वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. विमा गुंतवणूक आणि निवृत्त वेतन नियोजनाशी हा विषय संबंधित आहे.
पत्ता : प्लॉट नंबर ३८/३९, एपीएसएफसी बििल्डग, ग्राऊंड फ्लोअर, फायनान्शिएल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा व्हिलेज, गाचीबाऊली, हैदराबाद- ५०००३२, दूरध्वनी-०४०-२३०००००५, फॅक्स- २३०००२५४
वेबसाइट : http://www.iirmworld.org.in
ई-मेल: email@iirmworld.org.in
४) डी. एस. अॅक्चुरिएल एज्युकेशन सíव्हसेस
या संस्थेने बीएस्सी इन अॅक्चुरिएल सायन्स (अर्हता-कोणत्याही विषयातील १२वी /कालावधी-तीन र्वष) आणि एम एस्सी इन एॅक्चुरिएल सायन्स (अर्हता- बीएस्सी इन एॅक्चुरिएल सायन्स / कालावधी – दोन र्वष) हे दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये जीवन विमा, आरोग्य विमा, सर्वसाधारण विमा, संपत्तीचे मूल्यांकन, धोक्यांचे विश्लेषण, रिस्क मॅनेजमेंट, प्रायसिंग ऑफ सिक्युरिटीज आणि डेरिव्हेटिव्हज अशासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
पत्ता : डी. एस. अॅक्चुरिएल एज्युकेशन सíव्हसेस अॅण्ड द जुहू पाल्रे एज्युकेशन सोसायटी, उत्पल संघवी स्कूल, पूर्व-पश्चिम रोड, जेव्हीपीडी स्कीम, मुंबई- ०२२-३२५०७६५०
वेबसाइट : www.dsacted.com
५) वेिलगकर्स इन्स्टिटय़ूट
या अंतर्गत येणाऱ्या वुई स्कूल या संस्थेने डिप्लोमा इन कमोडिटिज मार्केट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
पत्ता : वेिलगकर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, एल. नाप्पो रोड, माटुंगा (सेंट्रल रेल्वे) मुंबई- ४०००१९, दूरध्वनी-०२२-२४१७८३०० फॅक्स- २४१०५५८५
वेबसाइट : http://www.wellingkar.org
ई-मेल : admissions@welingkar.org
करिअर संशोधनातले
गेल्या काही वर्षांत विज्ञानविषयक संशोधनाला देशात आणि विदेशात महत्त्वाचे स्थान मिळत आहे. जाणीवपूर्वक संशोधन शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे मनासारखे करिअर करता येणे शक्य होत आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन शाखेकडे वळावे यासाठी भारत सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने भारत सरकारने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या स्पेशलाइज्ड संस्थेची स्थापना केली आहे.
जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी-सुविधा-तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेचा विकास या ज्ञानशाखेतील सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून केला जात आहे. या संस्थेचे कॅम्पस पुणे, भोपाळ, थिरुवनंतपूरम, मोहाली, तिरुपती, कोलकता, बेरहमपूर या ठिकाणी आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये संस्थेच्या व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यातील ५० टक्के जागा जेईई – अॅडव्हान्स्ड (JEE-ADVANCED) या परीक्षेतील गुणांवर आधारित, तर उर्वरित ५० टक्के जागा या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना व आयआयएसईआर (IISER) अॅडमिशन टेस्टमधील गुणांवर भरल्या जातात.
या संस्थेचा अभ्यासक्रम बीएस-एमएस या नावाने ओळखला जातो. त्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमास १२वी उत्तीर्ण होणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
प्रवेश प्रक्रिया
प्रवेशासाठी तीन पद्धतीचा अवलंब केला जातो.
(१) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना-२०१६-१७ च्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी थेट अर्ज करू शकतात
(२) आयआयटी जेईई – अॅडव्हान्स्ड (JEE-ADVANCED) परीक्षा – विद्यार्थ्यांस १२ वीमध्ये ६० गुण मिळायला हवे. तो जेईई – अॅडव्हान्स्ड परीक्षेतही विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थाना पहिल्या दहा हजारांत स्थान मिळायला हवे
(३) संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा म्हणजे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्चची (IISER) अॅडमिशन टेस्ट.
या तीनही पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागेल. प्रत्येकासाठी स्वतंत्र फी भरावी लागेल. अर्ज ऑनलाइनच करावा लागतो.
अर्हता :
या परीक्षेस बसण्यासाठी पात्रता : बारावीमध्ये महाराष्ट्राच्या बोर्डातील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांचा किमान कटऑफ ७९.५ टक्के आहे. शारीरिकदृष्टय़ा अपंग आणि नॉन क्रीमीलेअर इतर मागासवर्ग या संवर्गासाठी या कटऑफमध्ये पाच टक्के सवलत देण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवारांसाठी ही किमान अर्हता ५५ टक्के आहे. सर्व कॅम्पससाठी एकच अर्ज भरावा लागतो. विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि त्याने दर्शविलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन वेगवेगळ्या कॅम्पससाठी प्रवेश निश्चित केला जातो.
अर्थसाहाय्य
या अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी युक्त वसतिगृह उपलब्ध करून दिले जाते.
या अभ्यासक्रमात पहिल्या दोन वर्षांत मूलभूत विज्ञान शाखेतील सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय निवड येतो.
आयआयएसईआर (IISER) अॅडमिशन टेस्ट- या परीक्षेद्वारे या संस्थेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने अकरावीपासूनच तयारी करायला हवी. कारण या परीक्षेचा अभ्यासक्रम हा एनसीईआरटीच्या (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेिनग) अकरावी- बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. या पेपरमध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विषयाचे १५ असे एकूण ६० प्रश्न असतात. प्रत्येक अचूक उत्तरास तीन गुण दिले जातात. न सोडवलेल्या उत्तरास शून्य दिले जाते. चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कपात केला जातो. प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात. परीक्षेचा कालावधी-तीन तास. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे केंद्राचा समावेश आहे. बारावी विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांनी गणिताऐवजी जीवशास्त्र आणि जीवशास्त्राऐवजी गणित घेतले असेल त्यांना ही परीक्षा देता येते. मात्र या दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
संपर्क : द चेअरपर्सन, जाइंट अॅडमिशन कमिटी २०१६, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च कोलकता, मोहनपूर-७४१२४६, दूरध्वनी-०३३-६६३४००७७
संकेतस्थळ : www.iiseradmission.in
अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले पोर्टल २५ मेपासून खुले होईल. १२ जूनपर्यंत किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी अर्ज करू शकतील. २० जूनपर्यंत IIT JEE-ADVANCED योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी अर्ज करू शकतील. २२ जून २०१६ पर्यंत IISER admission test योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी अर्ज करू शकतील. ३ जून २०१६ ला IISER admission test घेण्यात येईल. १० जून २०१६ ला IISER admission test चा निकाल घोषित केला जाईल.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स भुवनेश्वर आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स
जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या मूलभूत विज्ञानशाखेत संशोधन अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यासाठी पाच वष्रे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी. अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अॅण्ड रिसर्च, भुवनेश्वर आणि डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स) व मुंबई विद्यापीठाने सुरू केला आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स भुवनेश्वर आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स या दोन्ही संस्था स्वायत्त आहेत. या दोन्ही संस्थांची स्थापना डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीने २००७ साली केली आहे.
या संस्थेत मूलभूत विज्ञान शाखेतील संशोधनासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आधुनिक काळाशी सुसंगत या शाखांमधील संशोधनाचे आव्हान विद्यार्थ्यांना स्वीकारता येणे शक्य व्हावे यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर उच्चश्रेणीच्या संशोधकांची फळी निर्माण व्हावी व त्यांनी मूलभूत आणि उपयोजित विज्ञानशाखेतील संशोधनाची आव्हाने स्वीकारावीत ही उद्दिष्टे हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागे आहे. त्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आपआपल्या क्षेत्रात संशोधन कार्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या किंवा करत असलेल्या संशोधकांना अध्यापनाची जबाबदारी सोपवण्यात येते.
हा अभ्यासक्रम सत्र म्हणजेच सेमेस्टर पद्धतीचा आहे. प्रारंभापासूनच विद्यार्थ्यांना संशोधनकार्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे.
अभ्यासक्रम हा लवचीक आणि नावीन्यपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे सतत मूल्यमापन आणि विश्लेषण केले जाते. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा असून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना संस्थेच्या परिसरातच वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जाते. या परिसरातच अत्याधुनिक व जागतिक स्तरावरील सोयी सुविधा असलेली प्रयोगशाळा, संगणकीय व्यवस्था आणि वाचनालयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे वातावरण शास्त्रीय संशोधन आणि शिक्षणासाठी पोषक असे आहे.
अर्थसाहाय्य :
या अभ्यासक्रमाला निवड झालेल्या सर्व उमेदवांराना भारत सरकारच्या इन्स्पायर शिष्यवृत्ती अंतर्गत दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती व दरवर्षी इतर खर्चासाठी २० हजार रुपये साहाय्य दिले जाते. या अभ्यासक्रमातील जे विद्यार्थी उत्तम गुण मिळवतात त्यांना भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर ट्रेिनग स्कूलमध्ये प्रवेशासाठी थेट मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाते.
नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट :
इंटिग्रेटेड एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट घेतली जाते. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण मिळाले असतील ते या परीक्षेला बसू शकतात. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी किमान गुण ५५ टक्के. ही परीक्षा २८ मे २०१६ रोजी देशभरातील विविध शहरांमध्ये घेण्यात येईल. यात पुणे, मुंबई आणि नागपूरचा समावेश आहे. १७ जून २०१६ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीचा व बहुपर्यायी असेल. यात प्रत्येकी ५० गुणांचे पाच विभाग राहतील. पहिला भाग सर्व उमेदवारांसाठी आवश्यक असा आहे. या भागात निगेटिव्ह गुण नाहीत. उर्वरित चार भाग हे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचे राहतील. यापकी सर्व वा कोणतेही तीन विभाग विद्यार्थी सोडवू शकतात. जे विद्यार्थी सर्व विभाग सोडवतील त्यांना ज्या तीन विभागांत सर्वोच्च गुण मिळतील त्याचा विचार निकालासाठी व गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी केला जातो. विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन व विश्लेषणात्मक क्षमता तपासण्यासाठी प्रश्नांची रचना केली जाते. चारही विषयांच्या विभागात निगेटिव्ह गुण आहेत. काही प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये सर्व अचूक उत्तर दिले जाऊ शकतात. त्यामुळे तशी नोंद उमेदवारांना करावी लागेल.
परीक्षेचा पेपर हा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड ट्रेिनग (NCERT) च्या ११ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहील.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क :
द चीफ कुऑíडनेटर, नेस्ट २०१६, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अॅण्ड रिसर्च, पोस्ट जटनी, जिल्हा-खुर्दा- ७५२०५०, ओरिसा.
संकेतस्थळ : http://www.nestexam.in
ई-मेल : nest@nestexam.in
डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स)
चाळणी परीक्षेद्वारे निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना काऊन्सिलिंगच्या वेळेस चाळणी परीक्षेतील त्यांचे गुण व संस्थेच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिला जातो. मुंबई विद्यापीठ -डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स) या संस्थेतील फी खुल्या संवर्गासाठी प्रति सत्र १७५० रुपये. राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी प्रति सत्र ७५ रुपये. वसतिगृहाचे प्रत्येक सत्राचे भाडे ६०० रुपये आहे.
पहिल्या दोन सत्रांसाठी म्हणजेच पहिल्या वर्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सारखाच असतो. तिसऱ्या सत्रापासून स्पेशलायझेशन अभ्यासक्रमाची सुरुवात होते. स्पेशलायझेशनसाठी घेतलेल्या विषयामुळे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयातील सद्धांतिक आणि प्रायोगिक ज्ञान पक्के होण्यास मदत होते. याशिवाय विद्यार्थ्यांना सायन्स कम्युनिकेशन, हिस्ट्री, फिलासॉफी ऑफ सायन्स, वर्ल्ड लिटरेचर, एन्व्हॉयरन्मेंटल अॅण्ड एनर्जी सायन्स अशा काही विषयांचा अभ्यास करावा लागतो. चौथ्या आणि पाचव्या वर्षांत स्पेशलाइज्ड विषयातील प्रगत अभ्यासक्रम शिकावा लागतो. पाचव्या वर्षांत तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या साहाय्याने संशोधन प्रकल्प पूर्ण करावा लागतो. हा प्रकल्प डॉक्टोरल संशोधन पातळीपर्यंत विकसित होऊ शकतो. सबंध पाचव्या वर्षांत राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये उन्हाळी संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांनी घ्यावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी देश-विदेशातील संशोधकाचा सहभाग असलेल्या चर्चासत्रांचे वा मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाते. पहिले शैक्षणिक सत्र १ ऑगस्ट रोजी सुरू होते. दुसरे सत्र १ जानेवारी रोजी सुरू होते.
संपर्क : मुंबई विद्यापीठ – डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स), हेल्थ सेंटर, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई- ४०००९८
संकेतस्थळ : cbs.ac.in
ई-मेल : info@cbs.ac.in
नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (NISER)
ही संस्था होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूूट, मुंबईशी संलग्नित आहे. या संस्थेमार्फत पदवी प्रदान केली जाते. संस्थेतील इंटिग्रेटेड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एम. एस्सी.नंतर पीएच.डी. प्रवेशासाठी साहाय्यभूत ठरू शकतो. तसेच देश-विदेशातील नामवंत शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये उत्तम दर्जाचे संशोधन कार्य करण्याची संधी मिळू शकते. या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत सर्व शाखांसाठी समान अभ्यासक्रम असतो. दुसऱ्या वर्षांपासून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनच्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय विद्यार्थी काही विषय अभ्यासक्रमाशी निगडित वा इतर शाखांशी निगडित असलेले निवडू शकतात. संस्थेमध्ये विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग देणे आवश्यक ठरते. प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्ररीत्या विश्लेषण केले जाते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी हे विश्लेषण उपयुक्त ठरते.
संपर्क संकेतस्थळ : http://www.niser.ac.in/
ई-मेल : director@niser.ac.in
एकूण जागा
नॅशनल इन्स्टिटय़ूूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (NISER) या संस्थेत १३२ आणि मुंबई विद्यापीठ- डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स) या संस्थेत ४२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. २७ टक्के जागा नॉन क्रिमी लेअर ओबीसी संवर्गासाठी राखीव, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग आणि १५ टक्के जागा अनुसूचित जाती आणि तीन टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येतात.
वस्त्रोद्योग आणि फॅशन व्यवसाय –
वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगारच्या विपुल संधी लक्षात घेऊन अॅपेरल ट्रेिनग अॅण्ड डिझाइन सेंटर (एटीडीसी) या संस्थेने एक वर्ष ते दोन वष्रे कालावधीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
अॅपेरल ट्रेिनग अॅण्ड डिझाइन सेंटर (एटीडीसी)
वस्त्रोद्योगातील तंत्रकुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरले आहेत. शिलाई मशीन चालक, पॅटर्न इंजिनीअर, मशीन तंत्रज्ञ, सर्फेस आर्नामेंटेशन स्पेश्ॉलिस्ट, अॅपेरल प्रॉडक्शन सुपरव्हायझर, क्वॉलिटी कंट्रोलर्स, इंडस्ट्रिअल इंजिनीअर्स अशासारख्या रोजगाराच्या संधी मिळू शकतात. संस्थेच्या वतीने अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार प्रमाणपत्र, पदविका आणि प्रगत पदविका प्रदान केली जाते. त्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळालेली आहे.
प्रगत पदविका अभ्यासक्रम
१) अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन फॅशन डिझाइन, २) अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन अॅपेरल मॅन्युफॅक्चुिरग (दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी एक वर्ष). अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
पदविका अभ्यासक्रम
१) डिप्लोमा इन फॅशन डिझाइन टेक्नॉलॉजी (कालावधी- एक वर्ष), २) डिप्लोमा इन अॅपेरल मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी – माहिला (कालावधी-एक वर्ष), ३) डिप्लोमा इन अॅपेरल क्वालिटी अॅशुरन्स अॅण्ड कॅम्प्लायन्स (कालावधी-एक वर्ष), ४) डिप्लोमा इन निटवेअर मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी (कालावधी-एक वर्ष), ५) डिप्लोमा इन टेक्स्टाइल डिझाइन टेक्नॉलॉजी (कालावधी- एक वर्ष),
अभ्यासक्रम कालावधी- सहा माहिने
१) सर्टििफकेट इन प्रॉडक्शन सुपरव्हिजन अॅण्ड क्वालिटी कंट्रोल (अर्हता- १२ वी ), २) सर्टििफकेट इन अॅपेरल पॅटर्न मेकिंग (अर्हता- १० वी ), ३) सर्टििफकेट इन निटवेअर मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी-फौंडेशन (अर्हता- १२ वी), ४) सर्टििफकेट इन निटवेअर मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी- अॅडव्हान्स्ड (अर्हता- १२ वी), ५) सर्टििफकेट इन अॅपेरल एक्स्पोर्ट र्मकडायजिंग (अर्हता- १२ वी), ६) सर्टििफकेट इन टेक्स्टाइल गार्मेट टेिस्टग अॅण्ड क्वालिटी कंट्रोल (अर्हता- १२ वी). ७) सर्टििफकेट इन अॅपेरल इन एक्स्पोर्ट मर्कँडायजिंग, ८) सर्टििफकेट इन गार्मेट कन्स्ट्रक्शन टेक्निक, अर्हता- आठवी, कालावधी – ४ महिने, ९) सर्टििफकेट इन सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन इन पॅटर्न मेकिंग/ अर्हता- दहावी/ कालावधी -३ महिने, १०) सर्टििफकेट इन सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन इन टेक्स्टाइल डिझायिनग /अर्हता- दहावी/ कालावधी – ३ महिने, ११) सर्टििफकेट इन सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन इन अॅपेरल र्मकडायजिंग/ अर्हता- बारावी/ कालावधी – २ महिने, १२) सर्टििफकेट इन सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन इन फॅशन डिझायिनग /अर्हता- दहावी/ कालावधी – ८ महिने, १३) सर्टििफकेट इन रिटेल सेल्स /अर्हता- दहावी/ कालावधी – ६ महिने)
संस्थेचे स्मार्ट अभ्यासक्रम-
(१) अॅपेल प्रॉडक्ट्स विशेषत: ट्रॉउझर/जॅकेट्स- हा अभ्यासक्रम दोन महिने कालावधीचा आहे. अर्हता- १० वी उत्तीर्ण. (२) इंडस्ट्रिएल सििव्हग मेकॅनिक टेक्निशियन/ कालावधी- ४५ दिवस. अर्हता- आठवी उत्तीर्ण कोणताही उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतो.
पत्ता- (१) नागपूर- प्लॉट नंबर १३, सोमलवार भवन, युको बँकेजवळ, माउंट रोड एक्स्टेंशन, सदर नागपूर-४४००१०, दूरध्वनी-०७१२-६५१७८७९, (२) मुंबई- एफ-२०१, सानपाडा, रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स बििल्डग, सेकंड फ्लोअर, सानपाडा, नवी मुंबई-४००७०५, दूरध्वनी- ०२२-२७७५४४४१, (३) एटीडीसी- एनएचओ, परिधान विकास भवन, प्लॉट नंबर- ५०, इन्स्टिटय़ुशनल एरिया- ४४, गुरगाँव-१२२००३, हरयाणा, दूरध्वनी-०१२४-४६५९५०८, वेबसाइट http://www.atdcindia. co. in, ईमेल- admission@atdcindia. co. in
एमआयटी इन्स्टिटय़ुट ऑफ डिझाइन
एमआयटी (महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड एज्युकेशनल रिसर्च) इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन ही खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची आहे. या संस्थेत बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फॅशन डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्हता-कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. कालावधी चार र्वष. अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी डिझाइन अॅप्टिटय़ूड टेस्ट, स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत बाबींचा समावेश आहे. ही चाळणी परीक्षा पुणे, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, दिल्ली या केंद्रांवर घेण्यात येते.
पत्ता- एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोणी कालभोर, हडपसरच्या बाजूला, पुणे-४१२२०१, दूरध्वनी-०२०- ३०६९३६९५/३०६९३६९६, फॅक्स-३०६९३६०१, ई-मेल-ं admissions@mit. edu. in, वेबसाइट- www. mitid. edu. in
इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाइन अॅण्ड फॅशन मॅनेजमेन्ट-
या संस्थेने चार र्वष कालावधीचा फॅशन डिझाइनमधील अभ्यासक्रम सुरू केला आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम हा मुंबईतील कॅम्पसमध्ये आणि एक वर्षांचा अभ्यासक्रम पॅरीसमध्ये करावा लागतो. कोणत्याही १२वी शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमास संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश मिळू शकतो.
पत्ता- रामा गुलाब अपार्टमेन्ट, सुभाष रोड, विले पाल्रे पूर्व, मुंबई-४०००५७, दूरध्वनी-०२२-२६८२७७७८, वेबसाइट- www. modart-india. net, ईमेल- mumbai@modart-indai. com
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी
या संस्थेमार्फत फॅशन डिझाइन उद्योगाशी निगडित पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेच्या नवी मुंबई कॅम्प्समध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात १) बॅचलर ऑफ डिझाइन इन अॅक्सेसरी डिझाइन. २) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन. ३) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन. ४) बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन. ५) बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्स्टाइल डिझाइन. मुंबई, (अर्हता-उपरोक्त नमूद १ ते ६ अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील १२वीची परीक्षा उत्तीर्ण) या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड मुलाखत आणि समूह चच्रेनंतर केली जाते.
संपर्क – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी प्लॉट क्र. १५, सेक्टर चार, खारघर, नवी मुंबई -४१०२१० दूरध्वनी: ०२२-२७५६५३८६ फॅक्स: २७५६३७५८
जी डी गोयंका युनिव्हर्सटिी-
बीएस्सी – एमएस्सी इन डिझाइन (स्पेशलायझेशन इन कम्युनिकेशन डिझाइन, फॅशन डिझाइन, जेमॉलॉजी अॅण्ड ज्वेलरी डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन)
पत्ता- जी डी गोयंका युनिव्हर्सटिी, जी डी गोयंका एज्युकेशन सिटी, सोहना गुरगांव रोड, साउथ ऑफ दिल्ली, दूरध्वनी- ०१२४-३३१५९००, फॅक्स- ३३१५९७०, वेबसाइट- www. gdgoenkauinversity. com, admissions@gdgoenka. ac. in
डिझायिनग
आयआयटी, मुंबई
२०१५च्या शैक्षणिक सत्रापासून आयआयटी, मुंबई अंतर्गत कार्यरत इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटरने बी. डिझाइन-एम. डिझाइन हा पाच वष्रे कालावधीचा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षेद्वारे मुंबई आयआयटी आणि जबलपूर स्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश देण्यात आला. डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम करण्याचा पर्याय तिसऱ्या वर्षांनंतर उपलब्ध होईल. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी अंडर ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (UCEED) परीक्षा आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटरमध्ये सोबतच अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गौहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता आाणि पुणे येथे घेतली जाईल. ऑनलाइन नोंदणी पोर्टल- www. uceed. in पत्ता- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर, आयआयटी, पवई, मुंबई-४०००७६, दूरध्वनी-२५७६४०६३, २५७६७८०१, फॅक्स- २५७२०३०५/ २५७६७८०३, ईमेल- /uceed@iitb. ac. in office@idc. iitb.ac. in. वेबसाइट- www. idc.iitb.ac.in
या संस्थेमार्फत इंडस्ट्रिअल डिझाइन, व्हिज्युअल डिझाइन, अॅनिमेशन डिझाइन, इंटरअॅक्शन डिझाइन, मोबिलिटी अॅण्ड व्हेइकल डिझाइन या विषयांमध्ये एम. डिझाइन आणि पीचडीसुद्धा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा तीन तासांची, ३०० गुणांची आणि तीन विभागांमध्ये विभाजित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची राहील.
नॅशनल इंस्टिटय़ूूट ऑफ डिझाइन
वेगवेगळ्या विषयांमध्ये डिझाइनचे अभ्यासक्रम चालविणारी ही आपल्या महत्वाची संस्था होय. संस्थेचे अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ डिझाइन)
या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमांचा कालावधी चार वष्रे. या अभ्यासक्रमांतर्गत पुढील शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येते -अॅनिमेशन फिल्म डिझाइन/ सेरॅमिक अॅण्ड ग्लॉस डिझाइन /एक्झिबिशन डिझाइन /फिल्म अँड व्हिडीओ कम्युनिकेशन /फíनचर डिझाइन / ग्राफिक डिझाइन /प्रॉडक्ट डिझाइन /टेक्स्टाइल डिझाइन,
या संस्थेच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देशातील अनेक केंद्रांसोबतच महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या केंद्रांवर घेतली जाते. पत्ता: एनआयडी, पालडी, अहमदाबाद ३८०००७ गुजराथ, दूरध्वनी ०७९-२६६२३६९२/२६६२३४६२, फॅक्स: २६६२११६७, संकेतस्थळ : www. nid. edu
इंटेरिअर डिझायिनग
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स
या संस्थेमध्ये बीएफए-इंटेरिअर डिझायिनग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम चालविला जातो. अर्हता- ४५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते.
पत्ता- कला संचालनालय, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, दूरध्वनी-०२२-२२६२०२३१, फॅक्स-२२६२०२३२, वेबसाइट-www. sirjjschoolofart. in, ईमेल- doamumbai@gmail. com
रचना संसद
या संस्थेत बी.एस्सी. -इंटेरिअर डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
पत्ता- २७८, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५, दूरध्वनी- ०२२-२४३०१०२४, ईमेल- contact@rachanasansad. edu. in, वेबसाइट- www. rachanasansad. edu. in
एसएनडीटी विद्यापीठ
या संस्थेत डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी- दोन वष्रे.
पत्ता- डिपार्टमेंट ऑफ कंटिन्युइंग अॅण्ड अॅडल्ड एज्युकेशन अॅण्ड एक्स्टेंशन वर्क, एसएनडीटी वुमेन्स युनिव्हर्सटिी, पहिला माळा, पाटकर हॉल बििल्डग, १, नाथीबाई ठाकरसी रोड, मुंबई-४०००२०, दूरध्वनी-०२०-२२०६६८९२, ईमेल- caee@sndt. ac. in, वेबसाइट- caee. sndt. ac. in
हॉटेल मॅनेजमेंट
भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कायर्रत असणारी नॅशनल कौंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटिरग टेक्नॉलॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (ओपन युनिव्हसिर्टी) मार्फत बॅचरल ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
या परीक्षेद्वारे तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश दिला जातो. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या २१ आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असलेल्या २१ संस्था १५ खाजगी संस्था आणि सात फूड क्रॉफ्ट इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश दिला जातो.
अर्हता: या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावीला इंग्रजी हा विषय घेतलेला असावा. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात.
स्पर्धा परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे.
पत्ता : नॅशनल कौंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट, हेड क्वार्टर- प्लॉट नंबर, ए-३४, सेक्टर-६२, नॉयडा, यूपी-२०१३०९, दूरध्वनी – ०१२०-२५९०६०४, वेबसाइट- http://www.nchm.nic.in
या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेिरग टेक्नॉलॉजी या शासकीय संस्थेत प्रवेश मिळू शकतो. पत्ता- वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८, दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१
चित्रपट आणि टीव्ही
चित्रपट, दूरचित्रवाणी, डिजिटल मीडिया आणि मुद्रित माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असे काही अभ्यासक्रम काही खाजगी संस्थांनी सुरू केले आहेत. या संस्था पुढीलप्रमाणे –
देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज
या संस्थेचे अभ्यासक्रम-
(१) मास्टर ऑफ आर्ट्स इन फिल्म, टेलिव्हिजन अॅण्ड न्यू मीडिया प्रॉडक्शन. कालावधी- दोन् वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. (२) बॅचलर ऑफ आर्ट्स इन फिल्म, टेलिव्हिजन अॅण्ड न्यू मीडिया प्रॉडक्शन.
कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. संस्थेचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम- (१) सर्टििफकेट इन सिनेमॅटोग्राफी (कालावधी- ६ महिने), (२) सर्टििफकेट इन साउंड इंजिनीअिरग (कालावधी- ९ महिने), (३) सर्टििफकेट इन डिजिटल फिल्म मेकिंग (कालावधी- ११ महिने)
संपर्क- देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज, एसव्ही रोड, मलाड-पश्चिम, मुंबई-४०००६४,
संकेतस्थळ- www.ggmcms.org.in
ईमेल- info@dgmcms.org.in
एम. जी. आर. गव्हर्नमेंट फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट-
संस्थेचे अभ्यासक्रम- (१) डिप्लोमा इन डायरेक्शन, स्क्रीनप्ले रायटिंग अॅण्ड टेलिव्हिजन प्रॉडक्शन/ कालावधी- ३ वष्रे/अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. (२) डिप्लोमा इन फिल्म टेक्नॉलॉजी अॅण्ड टेलिव्हिजन प्रॉडक्शन (साउंड रेकॉìडग अॅण्ड साउंड इंजिनीअिरग)/ कालावधी- ३ वष्रे/ अर्हता- भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अॅण्ड इलेक्ट्रिकल इजिंनीअिरग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग. संपर्क- सीआयटी कॅम्पस, थारामणी, चेन्नई- ६००११३, संकेतस्थळ- http://www. tn. gov. in/
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया-
संस्थेचे अभ्यासक्रम- (१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन डायरेक्शन अॅण्ड स्क्रीनप्ले रायटिंग/कालावधी-तीन वष्रे/अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम चित्रपट क्षेत्रासाठी तयार करण्यात आला आहे. (२) पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट कोर्स इन डायरेक्शन /कालावधी-एक वर्ष/ अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम टीव्ही माध्यमातील गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. दोन्ही अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. संपर्क- फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४, संकेतस्थळ- http://www. ftiindia. com/
व्हिसिलग वूड्स इंटरनॅशल
या संस्थेने पुढील पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
बॅचलर ऑफ सायन्स इन फिल्म मेकिंग या अभ्यासक्रमांतर्गत सिनेमॅटोग्राफी (चित्रपट-छायाचित्रणकला), डायरेक्शन (दिग्दर्शन), एडिटिंग (संपादन), प्रॉडक्शन (निर्मिती), साउंड रेकॉìडग अॅण्ड डिझाइन (ध्वनिमुद्रण आणि योजना) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
डिप्लोमा इन फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमांतर्गत सिनेमॅटोग्राफी (चित्रपट-छायाचित्रणकला), डायरेक्शन (दिग्दर्शन), एडिटिंग (संपादन), प्रॉडक्शन (निर्मिती), साउंड रेकॉìडग अॅण्ड डिझाइन (ध्वनिमुद्रण आणि योजना) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं.
पत्ता- व्हिसिलग वूड्स इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६५, दूरध्वनी-०२२-३०९१६१४६/ ३०९१६०००, ईमेल- counselor@ whistlingwoods.net वेबसाइट- www.whistlingwoods.net
एशियन अॅकेडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन
संस्थेचे अभ्यासक्रम – (१) डायरेक्शन (दिग्दर्शन), (२) पोस्ट प्रॉडक्शन (निर्मितीत्तोत्तर कार्य), (३) अॅिक्टग (अभिनय), (४) साउंड रेकॉिडग (ध्वनिमुद्रण) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या पदवी अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फिल्म प्रॉडक्शन हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सटिी ऑफ लँकेशायर ही पदवी प्रदान करते. आता या प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. (१) बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया अॅण्ड मल्टिमीडिया प्रॉडक्शन, (२) बॅचलर ऑफ सायन्स इन थ्रीडी अॅनिमेशन अॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे. अर्हता- बारावी उत्तीर्ण. या पदवीस विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.
पत्ता- एशियन अॅकेडमी ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन, मारवाह, स्टुडिओ कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स- १, नॉयडा- २०१३०१, दूरध्वनी-०१२०-४८३११००, फॅक्स-२५१५२४६, ई-मेल-help@aaft.com, वेबसाइट- www.aaft.com
शिष्यवृत्ती
देश-विदेशातील काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था या उच्च शिक्षणासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती/ अर्थसाहाय्य देत असते. अशा काही शिष्यवृत्तींचा हा आढावा-
१) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट
या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे शिष्यवृत्ती आणि इतर आíथक साहाय्य केले जाते :
- बी.मॅथ आणि बी.स्टॅट : दरमहा तीन हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी तीन हजार रुपये
- एम.मॅथ आणि एम.स्टॅट : दरमहा पाच हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपये.
- एम. टेक् : दरमहा आठ हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपये.
- ज्युनिअर रिसर्च फेलोशिप : दरमहा २५ हजार ते २८ हजार रुपये आणि नियमानुसार घरभाडे आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी २८ हजार रुपये.
- सीनिअर रिसर्च फेलोशिप : दरमहा २८ हजार ते ३२ हजार रुपये आणि नियमानुसार घरभाडे आणि दर वर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी २८ हजार रुपये.
२) इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट
या संस्थेत एमबीए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी विविध शिष्यवृत्ती आहेत. या शिष्यवृत्ती पर्यटन क्षेत्राशी निगडित कंपन्या व उद्योजकांनी प्रायोजित केल्या आहेत. साधारणत: १५० उमेदवारांना याचा लाभ मिळतो. प्रत्येक अभ्यासक्रमातील प्रत्येक सत्रात सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या महिला व एक पुरुष उमेदवारास संस्थेच्या नियमांतर्गत फी माफ केली जाते.
संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोिवदपुरी, ग्वालिअर-४७४०११, दूरध्वनी-०७५१-२४३७३००, फॅक्स-२३४४०५४,
ईमेल- csbarua0003@rediffmail.com
३) के. सी. मिहद्रा स्कॉलरशिप :
परदेशातील नामवंत विद्यापीठ वा शिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्जाऊ शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिष्यवृत्तीसाठी ५० उमेदवारांची निवड केली जाते.
अर्हता : पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळालेली असावी.
संपर्क : के. सी मिहद्रा एज्युकेशन ट्रस्ट, सेसिल कोर्ट, रिगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग-४००००१,
संकेतस्थळ : http://www.kcmet.org
ईमेल : rodrigues.kieran@mahindra.com
४) पाँडेचरी विद्यापीठ
पाँडेचरी विद्यापीठामध्ये विविध पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेले उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या फेलोशिप योजनेसाठी पात्र ठरतात. या अंतर्गत दर महा आठ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना पहिली चार सत्रे दरमहा चार हजार रुपये आणि त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी दरमहा आठ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एम.एस्सी. इन मरिन बायोलॉजी आणि एम.एस्सी. इन डिझास्टर मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते.
संपर्क संकेतस्थळ : http://www.pondiuni.edu.in
५) सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज, नॉटिकल अॅण्ड इंजिनीअिरग ट्रेिनग
भारत सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशिरिज, नॉटिकल अॅण्ड इंजिनीअिरग ट्रेिनग या संस्थेने व्हेसल नेव्हिगेटर आणि मरिन फिटर कोर्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महा दीड हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. कालावधी- दोन वष्रे. हे अभ्यासक्रम गणित आणि विज्ञान विषयांसह दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करता येतात. त्यासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट १८ जून २०१६ रोजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षेचे केंद्र रत्नागिरी.
संपर्क संकेतस्थळ : http://www.cifnet.gov.in
६) स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने मास्टर्स इन मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दर महा २५ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक असणारे अभियांत्रिकी कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी हा अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. याशिवाय मेडिकल इमॅजिन, इमेज अॅनॅलिसिस, मॉलेक्युलर इमेजिंग, बायोमटेरिअल्स अॅण्ड इम्पार्ट्स, बायोमेडिकल इन्स्ट्रमेंट्स, अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर आदी विषयांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. कालावधी- तीन वष्रे. प्रवेशासाठी बेंगळुरू, मुंबई, न्यू दिल्ली, कोलकाता आणि खरगपूर येथे २८ मे २०१६ रोजी घेतली जाणार आहे. अर्हता- एमबीबीएस.
संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी खरगपूर-७२१३०२.
संकेतस्थळ : gate.iitkgp.ac.in/mmst
७) धीरूभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स
या संस्थेतून एम.टेक. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ९५०० रुपये आणि पीएच.डी. अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा २४ हजार रुपये शैक्षणिक पाठय़वृत्ती दिली जाते. एम.टेक. (इन्फॉम्रेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमास ग्रॅज्युएट अॅप्टिटय़ूूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स (GATE) या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. पीएच.डी.च्या प्रवेशासाठी संस्थेच्या चाळणी परीक्षेतील गुण किंवा गेट किंवा युनिव्हर्सटिी ग्रँट कमिशन-नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (UGC-NET) किंवा जॉइंट एन्ट्रन्स सिलेक्स टेस्ट (JEST) यापकी कोणत्याही एका परीक्षेतील सुयोग्य गुण आणि मुलाखत.
संपर्क : धीरूभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, इंद्रोदा सर्कल, गांधीनगर गुजरात-३८२००७
संकेतस्थळ : http://www.daiict.ac.in
८) फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी
या संस्थेमार्फत ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. ही भारत सरकारच्या अखत्यारीतील डिपार्टमेंट ऑफ स्पेसअंतर्गत कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आहे. याची स्थापना १९४७ साली डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्लॅनेटरी सायन्स, जिओसायन्स, थिअरॉटिकल फिजिक्स, अॅस्ट्रोकेमिस्ट्री, ऑप्टिकल फिजिक्स, अॅटोमिक अॅण्ड मॉलेक्युलर फिजिक्स, स्पेस अॅण्ड अॅटमोस्फेरिक सायन्सेस, सोलर फिजिक्स, अॅस्ट्रोफिजिक्स, अॅस्ट्रोनॉमी या विषयांमध्ये पीएच.डी. करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना अभ्यासक्रमाच्या कालावधीत दरमहा प्रारंभीचे दोन वष्रे २५ हजार रुपये आणि त्यानंतरची दोन वष्रे दरमहा २८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्हता- इच्छुक उमेदवारांनी ६० टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, जिऑलॉजी जिओफिजिक्स, ओशन सायन्स, अॅटमोस्फेरिक सायन्स, स्पेस सायन्स अणि एन्व्हायरॉन्मेंटल सायन्स या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट-ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (डिसेंबर २०१४/ जून २०१५/ डिसेंबर २०१५) किंवा गॅज्युएट अॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअिरग (२०१४/ २०१५/ २०१६) किंवा जॉइन्ट एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट २०१६ यापकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
संपर्क : फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी, नवरंगपुरा, अहमदाबाद-३८०००९
संकेतस्थळ : http://www.prl.res.in
९) इंडियन इन्स्टिटय़ूूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी या संस्थेत हवामान बदल आणि हवामानाशी संबंधित विविध पलूंचे संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. रिसर्च असोसिएट्सना दरमहा ३६ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो यांना दरमहा २५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. नियमानुसार घरभाडे दिले जाते.
संपर्क : डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे- ४११००८
संकेतस्थळ : http://www.tropmet.res.in/careers
१०) ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज सोसायटी ऑफ इंडिया
ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत इंग्लडमधील केंब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात पदवी/पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात अर्थसाहाय्य केले जाते. केंब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना चार लाख रुपये, केंब्रिज विद्यापीठाच्या इमॅन्युएल कॉलेजमध्ये आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सेंट हिल्डा कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
संपर्क : http://www.oxbridgeindia.com/scholarships, ईमेल : scholarship@ oxbridgeindia.com
११) शेफिल्ड हॅलॅम युनिव्हर्सटिी
इंग्लडमधील शेफिल्ड हॅलॅम युनिव्हर्सटिीमार्फत बायोसायन्स, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कन्स्ट्रक्शन, बििल्डग अॅण्ड सव्र्हइंग यांसारख्या विषयांत सप्टेंबर २०१६ मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीची रक्कम ५००० पौंड अशी आहे.
संपर्क- http://www.shu.ac.uk/international/ scholarships-bursaries
१२) कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलरशिप
इंग्लंडमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करू इच्छिणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठी ही शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण शिकवणी फीमधून सूट दिली जाते. दरमहा विद्यावेतन दिले जाते, तसेच जाण्यायेण्याचे विमानभाडे दिले जाते. निवासाचा खर्च दिला जातो.
संपर्क : http://cscuk.dfid.gov.uk
सुरेश वांदिले – response.lokprabha@expressindia.com