रुचकर विशेष
अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com
श्रावण हा उपवासाचा, व्रतवैकल्याचा महिना. दरवेळी तेच ते उपवासाचे पदार्थ खायचा अनेकांना कंटाळा येतो आणि खरोखरीचा उपवास घडतो. असं होऊ नये म्हणून उपवासासाठी हटके पदार्थ.
खसखस-बदाम खीर
साहित्य :
खसखस – अर्धी वाटी (नीट भिजेल एवढे दूध घेऊन दोन ते तीन तास भिजवणे)
बदाम – आठ ते दहा गरम पाण्यात भिजवून साल काढून वाटून घ्या.
दूध – ६ कप ९ साखर – अर्धी वाटी आवडीप्रमाणे ९ वेलची पावडर – एक चमचा
कृती :
खसखस बारीक वाटून घ्या. त्यात वाटलेले बदाम घाला. दूध मोठय़ा भांडय़ात तापत ठेवा. उकळी आल्यावर त्यात खसखस-बदाम पेस्ट घाला. वेलची पावडर, साखर घाला आणि चांगले उकळून घ्या.
गरम किंवा गार सव्र्ह करा.
वरीच्या पिठाचे घावने
साहित्य :
वरी पीठ – अर्धी वाटी
साबुदाणा पीठ – अर्धी वाटी
राजगिरा पीठ – अर्धी वाटी
(वरील तीनही पीठं वेगवेगळी थोडीशी भाजून घ्या.)
हिरवी मिरची – ४ ते ५ क्रश करून
शेंगदाणा कूट – पाव वाटी
कोिथबीर – पाव वाटी बारीक चिरलेली
साजूक तूप किंवा तेल – गरजेपुरते
आंबट ताक – अर्धी वाटी
दही – सìव्हगसाठी
जिरे – अर्धा चमचा
मीठ – चवीप्रमाणे
कृती :
सर्व पिठं एकत्र करून त्यात हिरवी मिरची, मीठ, दाण्याचे कूट आणि ताक घाला. बाकी पाणी घालून घावन्याच्या पिठाप्रमाणे भिजवून त्याला एक चमचा तूप आणि जिऱ्याची फोडणी द्या. वरून कोिथबीर घाला. तवा गरम करून त्याला तूप लावून घावना घाला. एक बाजू नीट भाजून झाल्यावर वरून तूप घालून घावना उलटून दुसरी बाजू भाजून घ्या. बाजूने तूप सोडा. दही आणि चटणीबरोबर सव्र्ह करा.
बटाटय़ाचे गुलाब जाम
साहित्य :
उकडलेले बटाटे – ४ ते ५ चांगले कुस्करलेले
शिंगाडा पीठ – अर्धी वाटी ९ काजू – ७ ते ८ अध्रे केलेले
साखर – अडीच वाटय़ा ९ वेलची – दोन. फोडून दाणे काढा
साजूक तूप – तळण्यासाठी ९ खवा- पाव वाटी
लिंबाचा रस – अर्धा चमचा.
कृती :
साखरेचा एकतारी पाक बनवून त्यामध्ये वेलची दाणे घालून पाकाला उकळी आणा. िलबाचा रस घाला.
बटाटे चांगले कुस्करून त्यात खवा आणि िशगाडय़ाचे पीठ एकत्र करा. थोडासा तुपाचा हात लावून चांगले मळून घ्या. त्याचे लहान लहान गोळे बनवा. मध्ये काजूचा तुकडा घाला.
कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये थोडे थोडे गुलाबजाम घालून नीट ब्राऊन रंगावर तळून घ्या. गरम साखरेच्या पाकात घालून ठेवा आणि सव्र्ह करा.
बटाटय़ाची उपवासाची रुमाली वडी
साहित्य :
उकडलेले बटाटे – ५ ते ६
राजगिरा पीठ – अर्धी वाटी
वरी पीठ – अर्धी वाटी
मीठ – चवीप्रमाणे
वरी पीठ – १/४ वाटी (लाटण्यासाठी वेगळे)
साजूक तूप – १ चमचा
साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल – अर्धी वाटी (श्ॉलो फ्रायसाठी वेगळे)
सारण –
ओले खोबरे – १ वाटी. बारीक खवणलेले
हिरव्या मिरच्या – २ ते ३ क्रश केलेल्या
कोिथबीर – १ टेबल स्पून (ऐच्छिक)
मीठ – चवीप्रमाणे
साखर – अर्धा चमचा
लिंबाचा रस – १ चमचा
खसखस – अर्धा चमचा (भाजलेली)
कृती :
सारणाचे सर्व साहित्य नीट एकत्र करून ठेवा.
बटाटे चांगले कुस्करा, गुठळी राहू देऊ नका. त्यात मीठ, राजगिरा आणि वरी पीठ घाला, नीट एकत्र करून घ्या. तुपाचा किंवा तेलाचा हात लावून मळून घ्या. एक स्वच्छ रुमाल पोळपाटावर ठेवा, त्यावर वरी तांदळाचे पीठ सर्वत्र पसरवा. त्यावर बटाटय़ाचा मळलेला गोळा ठेवा. हलक्या हाताने थोडासा दाबा व वरती वरीचे पीठ पसरून हलक्या हाताने लाटा. त्यावर खोबऱ्याचे सारण हलक्या हाताने पसरून अलगद दाबा.
रुमालाची आपल्याकडील बाजूने रुमाल हळू हळू सोडवत गुंडाळी (रोल) करा. शेवटी रुमालाच्या साहाय्याने गुंडाळीला त्रिकोणी आकार द्या. रुमालासकट मोदकपात्र किंवा स्टीमरमधे ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. थंड करून त्याचे काप करा आणि श्ॉलो फ्राय करा.
टीप : रुमाली वडी वाफवताना रुमाल फक्त खालील बाजूसच ठेवा.
बटाटय़ाची आमटी
साहित्य :
बटाटे – २ बारीक चिरून ९ शेंगदाण्याचे कूट – अर्धी वाटी
आंबट ताक – १ वाटी ९ कोिथबीर – १ वाटी
मीठ – चवीप्रमाणे ९ साखर – १ चमचा
शेंगदाणा तेल – १ टेबलस्पून ९ जिरे – अर्धा चमचा
हिरवी मिरची – ४ ते ५ आवडीप्रमाणे
कृती :
एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. वर बटाटे घालून परता. मीठ आणि साखर घालून वर थोडं पाणी घालून शिजवून घ्या. शेंगदाणा कूट, हिरवी मिरची आणि कोिथबीर चांगले वाटून घ्या. पाणी घालून चांगली पेस्ट बनवा आणि शिजवलेल्या बटाटय़ावर घाला. पाणी घाला. उकळी आल्यावर त्यात ताक घाला आणि परत उकळी आणा.
वरीचा भात किंवा साबुदाणा खिचडी वागरे बरोबर सव्र्ह करा.
टीप : साध्या भाताबरोबरदेखील ही आमटी खूप छान लागते.
नारळाच्या दुधातील शेवया
साहित्य :
नारळाचे दूध – २ वाटय़ा
बारीक चिरलेला गूळ – ३/४ वाटी
वेलची पावडर – १ चमचा
वरी तांदळाचे पीठ – १ वाटी
साबुदाणा पीठ – अर्धी वाटी
पाणी – १ वाटी
साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल – २ चमचे
बदामाचे काप – आवडीप्रमाणे
केशर – ८ ते१० काडय़ा दुधात भिजवलेल्या
मीठ – चिमूटभर
कृती :
एका पातेल्यात पाणी, तेल आणि मीठ घालून उकळी आणा. गॅस मंद करून त्यामध्ये वरी तांदळाचे पीठ आणि साबुदाणा पीठ नीट एकत्र करून घाला. चांगले घोटून झाकण ठेवून गॅस बंद करा. थंड झाल्यावर पीठ चांगले मळून घ्या. मळलेल्या पिठाचे गोळे स्टिमरमध्ये ठेवून उकडून घ्या. पीठ गरम असताना शेवयांच्या साच्याने शेवया पाडून घ्याव्या. (पीठ थंड झाल्यावर शेवया पडत नाहीत.)
नारळाच्या दुधामध्ये गूळ विरघळवून त्यामध्ये वेलची पावडर घाला. बोलमध्ये शेवया घालून त्यावर नारळाचे दूध घालून बदामाचे काप व केशर घालून सव्र्ह करा.
वरी तांदळाचे मोदक
साहित्य :
वरी तांदळाचे पीठ – दोन वाटय़ा (वरी तांदूळ स्वच्छ धुवून, वाळवून पीठ करावे आणि चाळून घ्यावे)
ओले खोबरे – दोन वाटय़ा (खवणलेले)
पिवळा गूळ – एक वाटी
वेलची पावडर – एक चमचा
साजुक तूप दोन चमचे ९ मीठ
कृती :
प्रथम खोबरं आणि गूळ एकत्र करून सारण करून घ्यावे. त्यात वेलची पावडर एकत्र करा.
पॅनमध्ये दोन वाटय़ा पाणी गरम करून त्यात मीठ व साजुक तूप घाला. उकळी आल्यावर त्यात वरीचे पीठ घालून चांगले ढवळा. चांगली दणदणीत वाफ आणा.
पीठ गरम असताना चांगले मळा. त्याची पारी करून त्यामध्ये सारण भरून मोदक बनवा. तांदळाच्या मोदकाप्रमाणेच परत एकदा वाफ आणून साजूक तुपाबरोबर गरमागरम सव्र्ह करा.
लाल भोपळ्याचे रायते
साहित्य :
लाल भोपळा – पाव किलो (साल आणि बिया काढून चौकोनी तुकडे करा)
साजूक तूप – एक टेबल स्पून ९ मीठ – चवीप्रमाणे
साखर – दोन चमचे (चवीप्रमाणे कमी जास्त चालेल)
हिरवी मिरची – तीन ते चार बारीक तुकडे केलेली.
घट्ट दही – दही वाटी ९ जिरे – अर्धा चमचा
ओले खोबरे – एक टेबल स्पून
कोिथबीर – एक चमचा बारीक चिरलेली
कृती :
पातेल्यामध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरे घाला. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये मिरचीचे तुकडे घाला. त्यावर लाल भोपळ्याचे तुकडे घालून नीट परतून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ – साखर घाला. थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या. थंड करून त्यामधे खोबरे घाला. घट्ट दही नीट फेटून घाला. वरून कोिथबीर घालून सव्र्ह करा.
राजगिऱ्याच्या पिठाचं निनावं
साहित्य :
राजगिरा पीठ – १ वाटी
साबुदाणा पीठ – पाव वाटी
नारळाचे दूध – ३ वाटय़ा
साजुक तूप – अर्धी वाटी पातळ केलेले
गूळ – १ वाटी बारीक चिरलेला
वेलची पावडर – १ चमचा
कृती :
नारळाचे दुध, गूळ, वेलची पावडर एकत्र करून त्यात गूळ विरघळवून घ्या.
राजगिरा पीठ व साबुदाणा पीठ एकत्र करून सपाट भांडय़ात घेऊन गॅसवर ठेवा. मध्यम गॅसवर पीठ गरम करायला ठेवा. सतत हलवत राहा. हळू हळू तूप घालत राहा. खमंग भाजून घ्या. पीठ थंड करा. पिठात हळू हळू नारळाचे दूध घालत राहा. गुठळी होऊ देऊ नका.
नंतर हे पातेलं गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. घट्ट झाल्यावर एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढा.
ओव्हनमधे २०० सेल्सियसला ब्राऊन होईपर्यंत ठेवा. थंड झाल्यावर वडय़ा पाडा आणि सव्र्ह करा.
उपवासाची सुरळीची वडी
साहित्य :
राजगिरा पीठ – १ वाटी
शिंगाडा पीठ – अर्धी वाटी
आंबट ताक – दीड वाटी
कोमट पाणी – २ वाटय़ा
मीठ – चवीप्रमाणे
सारण :
ओले खोबरे – अर्धी वाटी
कोिथबीर – एक टेबल स्पून
मीठ – चवीप्रमाणे
साखर – पाव चमचा
तुप – एक चमचा
जिरे – पाच ते सहा दाणे किंवा पाव चमचा (तूप आणि जिरे सोडून बाकी सर्व सारणाचे साहित्य नीट एकत्र करा)
कृती :
एका पातेल्यात राजगिऱ्याचे पीठ, िशगाडय़ाचे पीठ, ताक, पाणी आणि मीठ एकत्र करा. पातेले गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. गुठळी होऊ देऊ नका.
मिश्रण तकतकीत झाले की ताटलीत पसरून नीट पसरत का ते पाहा. मिश्रण शिजल्यावर गॅस बंद करून नंतर ताट उलटे करून त्यावर मिश्रणाचा एकदम पातळ थर पसरून घ्या. वर सारण पसरून उभं कापून घ्या आणि नंतर त्याची सुरळी करून सुरळीची वडी करून घ्या.
एका ताटामध्ये या वडय़ा ठेवून जिरे तुपाची फोडणी द्या. वरून थोडेसे खोबऱ्याचे सारण घाला आणि सव्र्ह करा.
वरी-साबुदाण्याचे पॅटिस
साहित्य :
साबुदाणा – दोन वाटय़ा (पाच ते सहा तास भिजवून घ्यावा)
वरी तांदूळ – अर्धी वाटी (साधा भात करून घेणे)
उकडलेले बटाटे – दोन कुस्करून घेणे
ओलं खोबरे – एक वाटी (खवणलेले)
हिरवी मिरची – आठ ते दहा वाटलेल्या
खसखस – एक चमचा भाजलेली
कोिथबीर – दोन चमचे बारीक चिरलेली
लिंबाचा रस – एक चमचा
मीठ – चवीप्रमाणे.
साखर – दोन चमचे
शेंगदाणा तेल – डीप फ्राय करण्यासाठी
कृती :
प्रथम खोबरं, खसखस, दोन मिरच्या क्रश, कोिथबीर, मीठ, साखर, िलबाचा रस, एकत्र करून सारण तयार करा.
परातीत भिजवलेला साबुदाणा, वरी भात, कुस्करलेला बटाटा, मीठ, साखर, पाच ते सहा मिरची क्रश, एकत्र करून मळून घ्या. त्याचे सारखे भाग करा. प्रत्येक भागाची वाटी बनवा, त्यात वरील सारण घाला. वाटी नीट बंद करून दोन्ही हातांनी दाबून पॅटिस तयार करून घ्या. फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून पॅटिस तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या. दहय़ाबरोबर गरम सव्र्ह करा.
वरी तांदळाचे अप्पे
साहित्य :
वरी तांदूळ – एक वाटी (साधा भात करून घेणे)
वरी पीठ – एक टेबल स्पून
मीठ – चवीप्रमाणे
हिरवी मिरची – चार ते पाच किंवा आवडीप्रमाणे.
दाण्याचे कूट – दोन टेबल स्पून (भरड)
साजूक तूप – पाव वाटी ९ जिरे – अर्धा चमचा
दही – अर्धी वाटी ९ हिरवी चटणी – सìव्हगसाठी
कृती :
वरीचा भात, हिरवी मिरची क्रश, मीठ, दाण्याचे कूट, दही, वरीचे पीठ आणि नीट एकत्र करून वर तूप जिऱ्याची फोडणी द्या.
अप्पे पात्र गरम करून त्याला तूप लावा. त्यात वरील मिश्रण घाला. झाकण ठेवा. खालची बाजू नीट ब्राऊन झाल्यावर सर्व अप्पे उलटे करा आणि दुसरी बाजू ब्राउन करून घ्या. हिरव्या चटणीबरोबर सव्र्ह करा.
हिरवी चटणी :
ओलं खोबरं, हिरवी मिरची, मीठ, साखर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि िलबाचा रस एकत्र करून वाटावा.
भेंडीची भाजी
साहित्य :
भेंडी – पाव किलो कोवळी बघून घ्या.
साजूक तूप – दोन टेबल स्पून
जिरे – एक चमचा
हिरवी मिरची -चार ते पाच आवडीप्रमाणे
आमसूल – तीन ते चार
दही – अर्धी वाटी सìव्हगसाठी
मीठ – चवीप्रमाणे
साखर – एक चमचा
ओलं खोबरं – १ टेबल स्पून खवणलेले
कृती :
भेंडी स्वच्छ धुऊन गोल काप करा. कढईत तूप गरम करून त्यामध्ये जिरे घाला. ते तडतडल्यावर मिरचीचे मोठे तुकडे करून घाला. त्यावर भेंडी घालून चांगली परता. नंतर आमसूल, मीठ आणि साखर घालून नीट शिजू द्या. वर खोबरं घाला. डिशमध्ये भाजी व त्याबरोबर दही सव्र्ह करा.
राजगिरा भाकरीबरोबर ही भाजी छान लागते व उपवासाला पोटभर होते.
काजू -शेंगदाण्याचा मसूर
साहित्य :
शेंगदाणा कूट – एक वाटी ९ काजू पावडर – अर्धी वाटी जाडसर
साखर – एक वाटी ९ साजूक तूप – तीन वाटी
कृती :
काजू पावडर व शेंगदाण्याचे कूट नीट एकत्र करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून त्यामध्ये हे मिश्रण घालून नीट एकत्र करा. तूप चांगले कडकडीत गरम करा. वरील मिश्रण गॅसवर असतानाच त्यामध्ये पळीने थोडं थोडं तूप घालत राहा. सगळं तूप घाला. हळूहळू काजू दाण्याच्या कुटाला जाळी पडायला लागेल. जाळी पडायला लागल्याबरोबर हे मिश्रण एका थाळीत ओता. आपल्याला किती जाड मसूर हवा त्याप्रमाणे थळी वापरा. वडय़ा पाडून थाळी तिरपी करा, म्हणजे जास्तीचे तूप बाहेर पडेल.
टीप : थाळी दुसऱ्या एका मोठय़ा भांडय़ावर तिरपी करून ठेवा म्हणजे सर्व तूप त्यात पडेल.
भरली राजेळी केळी
साहित्य :
राजेळी केळी – पाच (केळी पिवळी असताना आणावी, घरी आणून कागदात गुंडाळून ठेवा चार ते पाच दिवसांत पूर्ण पिकून काळी होतील तेव्हा वापरा.)
नारळ – दोन बारीक खवणलेला
गूळ – दोन वाटय़ा बारीक चिरून
वेलची पावडर – दोन चमचे
नारळाचे दूध – एक वाटी
साजूक तूप – एक टेबल स्पून
कृती :
प्रथम खोबरं आणि गूळ एकत्र करून चव (सारण) करून घ्या. त्यात वेलची पावडर घालून बाजूला ठेवा.
काळी झालेली केळी स्वच्छ धुऊन घ्या. एका बाजूने सुरीने साल वरपासून खालपर्यंत कापून साल अखंड काढून घ्या. केळ्याचे साधारण तीन किंवा चार तुकडे करा. तुकडय़ांना उभी चीर द्या (आत चव भरण्यासाठी). एका सपाट भांडय़ात खाली थोडेसे तूप व नारळाचे दूध घाला. त्यावर केळीची साल सर्वत्र पसरवा.
चीर पाडलेल्या केळ्याच्या सर्व तुकडय़ांमध्ये चव नीट भरा. भांडय़ामध्ये केळीच्या सालांवर ही केळी नीट पसरून ठेवा. (एकच थर लावावा. एकावर एक ठेवू नयेत) भांडे गॅसवर ठेवून त्यावर नारळाचे दूध घाला आणि थोडेसे साजूक तूप सोडा. झाकण ठेवून मंद आचेवर केळी नीट शिजवून घ्या.
ही केळी अतिशय खमंग आणि चविष्ट असतात.
शेंगदाण्याची उसळ
साहित्य :
शेंगदाणे – १ वाटी रात्रभर भिजवून कुकरमधे १ ते २ शिट्टय़ा करा.
ओलं खोबरं – १ वाटी खवणलेले ९ हिरवी मिरची – ४ ते ५ क्रश करून
शेंगदाणा कूट – १ चमचा ९ मीठ – चवीप्रमाणे
साखर – १ चमचा ९ जिरे – अर्धा चमचा
शेंगदाणा तेल किंवा साजुक तूप -२ टेबल स्पून
कोथिंबीर – १ चमचा (चालत असल्यास)
उकडलेला बाटाटा – १ बारीक तुकडे केलेला
लिंबाचा रस – १ चमचा
कृती :
प्रथम एका कढईत तेल / तूप गरम करून त्यात जिरे घालावे. जिरे तडतडल्यावर त्यामधे भिजवलेले शेंगदाणे घालून परता. लगेच हिरवी मिरची घालून परता, नंतर बटाटय़ाचे तुकडे घालून परता, नंतर मीठ आणि साखर घालून थोडेसे पाणी िशपडा. झाकण ठेवून चांगली वाफ आणा. त्यावर ओलं खोबरं घालून चांगले एकत्र करून वरून िलबाचा रस घाला. शेवटी शेंगदाण्याचे कूट घालून एकत्र करा. वरून बारीक चिरलेली कोिथबीर घाला.
राजगिऱ्याच्या भाकरीबरोबर सव्र्ह करा.
रताळ्याचा किस
साहित्य :
रताळी – पाव किलो स्वच्छ धुऊन सालासकट बारीक किसलेली.
ओलं खोबरं – अर्धी वाटी (खवणलेले)
शेंगदाणा कूट – अर्धी वाटी (जाडसर कुटलेले)
हिरवी मिरची – चार ते पाच बारीक चिरून
शेंगदाणा तेल – अर्धी वाटी
जिरे – एक चमचा
मीठ – चवीप्रमाणे
साखर – एक ते दोन चमचे
कोिथबीर – आवडीप्रमाणे
कृती :
किसलेले रताळे साधारण अर्धा तास पाण्यात ठेवा. नंतर पाण्यातून काढून पिळून घ्या. पाणी बाजूला ठेवून द्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरे घाला. ते तडतडल्यावर बारीक चिरलेली मिरची घाला. वर रताळ्याचा किस घालून चांगले परतून घ्या. गॅस मंद करून वर झाकण ठेवून किसाला चांगली वाफ आणून शिजवून घ्या. नंतर त्यात मीठ- साखर घालून चांगले परता. त्यावर शेंगदाण्याचे कूट घालून नीट एकत्र करा. वरून ओले खोबरे व कोिथबीर घालून दहय़ाबरोबर सव्र्ह करा.
टीप : काढून ठेवलेले पाणी रताळ्याच्या सत्त्वासाठी वापरता येते.
वरी तांदळाचा गोडा शिरा
साहित्य :
वरी तांदूळ – १ वाटी धुऊन ठेवावेत
साखर – १ वाटी ९ वेलची पावडर – १/२ चमचा
बेदाणे – ७ ते ८ ९ काजू – ५ ते ६
साजुक तूप – पाव वाटी ९ वेलची – २
ओले खोबरे – पाव वाटी खवणलेले
बदाम – ३ ते ४ अध्रे केलेले
केशर – ८ ते १० काडय़ा गरम दुधात भिजवलेल्या
पाणी – गरम करून
कृती :
पॅनमधे तूप गरम करून काजू तळून बाजूला काढून ठेवा. नंतर तुपामधे वेलची फोडून टाका. त्यावर धुऊन ठेवलेले वरी तांदूळ घालून चांगले परतून घ्या. त्यावर खोबरं घालून परतून घ्या. पाणी घालून वरी तांदूळ नीट शिजवून घ्या.
नंतर काजू, साखर व बेदाणे घालून नीट एकत्र करा. नंतर वेलची पावडर आणि केशर घालून नीट एकत्र करा. परत एक चांगली वाफ आणा. वरून बदामाने गाíनश करून गरम सव्र्ह करा.
रताळ्याचे सत्त्व
साहित्य :
रताळ्याचे सत्त्व – अर्धी वाटी
दूध – दोन वाटय़ा ९ साखर – अर्धी वाटी
वेलची पावडर – अर्धा चमचा ९ बेदाणे – एक चमचा
पिस्ता – बदाम काप – एक टेबल स्पून
साजूक तूप – एक चमचा पातळ केलेले
कृती :
सत्त्व – पाव किलो रताळी घेऊन स्वच्छ धुऊन किसून पाण्यात ठेवा. एक तासाने किस नीट पिळून पाणी बाजूला ठेवून द्या, म्हणजे सत्त्व खाली बसेल. सत्त्व न हलवता वरील पाणी काढून टाका आणि फक्त सत्त्व घ्या.
एका जाड बुडाच्या भांडय़ामध्ये सर्व साहित्य एकत्र करून नीट साखर विरघळेपर्यंत ढवळा. गॅसवर भांडं ठेवून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट व तकतकीत दिसायला लागेल.
एका ताटलीला तुपाचा हात लावून त्यावर वरील मिश्रण ओता व सारखे पसरा. थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा पाडा किंवा एका बोलमध्ये सेट करून त्यावर बेदाणे, बदाम आणि पिस्त्याचे काप घालून गाíनश करा. हे सत्त्व अतिशय पौष्टिक असून अतिशय चविष्ट लागते.