01doka१. चिकूच्या दर दहा रुजत घातलेल्या बियांपैकी शेकडा ५० बियांची झाडे तयार होतात. जर १९०० बिया रुजत घातल्या असतील तर एकूण किती झाडे तयार होतील?

२. एका काटकोन त्रिकोणाची लांबी १२० आणि १६० सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती?

३. एका गावात साडेसहा हजार लोक राहतात. त्यापैकी १५ टक्के लोक साक्षर आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त १० टक्के लोकांचे दहावीपर्यंतचे आणि ५ टक्के लोकांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तर गावातील सुशिक्षित लोकांची संख्या किती?

४. एकदा एका रांगेतील ३० मुलांबाबत बोलताना सचिन म्हणाला की रांगेत राजीव उजवीकडून १३ वा आहे, अनिल डावीकडून १६ वा आहे. तर राजीव आणि अनिल यांच्यात किती जण उभे आहेत?

रजतने आपल्या मित्राकडून दसादशे १५ टक्के दराने ३० हजार रुपये उधार घेतले तर त्याचे सहा महिन्यांचे व्याज किती?

उत्तरे स्पष्टीकरणासहित :

१. उत्तर : ९५०; स्पष्टीकरण : रुजत घातलेल्या बियांच्या निम्मी झाडे रुजतात. म्हणजेच १९०० च्या निम्मी, म्हणजेच ९५० झाडे रुजतील.

२. उत्तर : २०० सेंटीमीटर; स्पष्टीकरण : पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणाच्या बाजू ३ : ४ : ५ या प्रमाणात असतात. या सिद्धांतानुसार दोन बाजूंना ३ व ४ ने भाग जात असता अखेरची बाजू ५ ने भाग जाणारी हवी.

३. उतर : १९५०; स्पष्टीकरण : गावातील एकूण लोकसंख्या ६५००. त्यापैकी साक्षर, दहावीपर्यंत अथवा पदवीपर्यंत शिकलेल्या लोकांची संख्या ३० टक्के. म्हणजेच ६५००x३०/१०० हे त्रराशिक सोडविल्यास १९५० हे उत्तर मिळेल.

४. उत्तर : १; स्पष्टीकरण : डावीकडून १६ अधिक उजवीकडून १३ म्हणजेच एकूण २९. व मध्ये उभा असलेला मुलगा ३० वा. म्हणून राजीव आणि अनिल या दोघांमध्ये १ मुलगा उभा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. उत्तर : २२५० रुपये; स्पष्टीकरण : सरळव्याजाचे सूत्र मुद्दल x व्याजाचा दर x कालावधी/१०० या सूत्राने हे उत्तर लगेच मिळेल. फक्त कालावधी हा वर्ष या एककात मोजला जातो त्यामुळे येथे कालावधी ०.५ अर्थात अर्ध वर्ष असे धरावे.