विकोबा
धन्य आहे तुमची..
तुझा last mail वाचला आणि माझी first reaction हीच होती. तू प्रचारात वगैरै उतरलास हे समजण्यासारखं आहे. एखादा candidate चांगला वाटला असता तर मी पण तेच केलं असतं. पण ‘आप’चा प्रचार? तू ‘आप’चा प्रचार कसा काय करू शकतोस? ‘आप’? what is this? मला तर frustration च आलं बघ तू ‘आप’च्या बाजूने आहेस हे वाचून.
‘आप’चं character clean आहे वगैरै ठीक आहे. पण त्यांनी establishmentमध्ये राहून काम केलं आणि तरीही clean  राहिले तर मग समजण्यासारखं आहे. मुळात हे responsibility  पासून पळून जाणारे लोक. तसे आहेत की नाही हे तूच सांग. दिल्लीत त्यांनी काँग्रेस बीजेपीला option create केला. लोकांनी त्यांना accept  केलं. आणि हे लोक नीट काम करून दाखवण्याऐवजी सरळ resign करून मोकळे झाले? त्यांचा point  काय तर म्हणे जनलोकपाल.. आपल्या मताबद्दल आग्रही असणं समजण्यासारखं आहे, पण मी म्हणेन तेच झालं पाहिजे नाहीतर मी चाललो सोडून.. हे असं असतं का? This is ridicules. काय म्हणतात मराठीत.. हां पळपुटेपणा केला त्यांनी. see.. जे option avalable  आहेत ते वाईट आहेत, मी चांगला option देईन असं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण तुमच्यावर जेव्हा option द्यायची वेळ येते, तुम्हाला opportunity मिळते तेव्हा तुम्ही responsibility घ्यायची की सोडून निघून जायचं? तुम्हाला पटत नाही ती establishment सुधारून, बदलून दाखवा ना.. आणि हे सगळं तुम्हाला त्या system मध्ये राहून करून दाखवावं लागतं. आता तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांकडे मतं मागणार? आणि समज imagination  च्या पलीकडे जाऊन असं समजू की आत्ता सगळ्यांना सोडून ‘आप’लाच भरपूर जागा मिळाल्या आणि त्यांना government  करायची opportunity मिळाली तर पुन्हा एखाद्या फालतू मुद्दय़ावरून तुम्ही लोक पुन्हा पळून जाणार नाही कशावरून? मुळात power मिळवणं फार अवघड नाही, पण ती टिकवणं आणि rule करून दाखवणं हे  challenging आहे.
हे बाजूला ठेव.. दिल्लीत तुम्हीची establishment मध्ये असताना तुम्हीच कसं काय रस्त्यावर उतरून आंदोलन करता? हे किती चुकीचं आहे. मला तर वाटतं की आपल्या देशात ना काँग्रेस सोडून बाकी सगळे पक्ष कधीही ruller  च्या mentality  मध्ये शिरूच शकत नाहीत. आणि हे काँग्रेसवाले कधी opposit party च्या roll मध्ये शिरू शकत नाहीत. opposition मध्ये असतात तेव्हाही ते power मध्ये असल्यासारखे सुस्तच असतात आणि opposit party वाले power  मध्ये असतात तेव्हाही आंदोलन वगैरे करत बसतात.
तू या ‘आप’च्या लोकांमध्ये कुठे जाऊन बसलास विकी..?
मी तुझं हे सगळं पप्पांना सांगत होते, तर पप्पांनी मला दोन comedy reference  सांगितले. पप्पा म्हणाले की, इसवी सन पूर्व ३७० वर्षांपूर्वी चाणक्य होऊन गेला. त्याने ना असं म्हटलं आहे म्हणे की, पाण्यातला मासा पाणी कसा आणि कधी पितो ते कळत नाही. तसंच सरकारी माणूस कसा आणि कुठे पैसा खातो ते कळत नाही. मला ना विकी पहिल्यांदा समजलंच नाही. मग पप्पांनी explain  करून सांगितलं की, चाणक्याचा काळ कोणता तर वर्षांचं काऊंटिंग सुरू झालं त्याच्याआधीचा. म्हणजे इतक्या वर्षांपूर्वीदेखील currption  होतंच. मग आत्ताच ते आहे असं का समजलं जातंय?
दुसरा पण reference  असाच comedy आहे. कोणत्या तरी एका पेशव्यांच्या दरबारात ना एक clark  होता. कोणते पेशवे ते पप्पांनी सांगितलं पण आत्ता मला आठवत नाही. तर त्याच्याबद्दल ना खूप complaint  होत्या की, तो पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही. लोकांची अडवणूक करतो. खूप corrupt  आहे वगैरे. मग त्या complaint ना धरून त्याला दरबारात यायला मनाई केली गेली. मग त्याच्यापुढे प्रश्न पडला की आता काय करायचं. रोज दरबारात येऊन काम करायची सवय. घरी बसवेना. मग तो रोज यायचा आणि बाहेर बसून राहायचा. बाहेर खूप अडले नडलेले लोक भेटायचे. कुणाकुणाची काय काय कामं असायची. मग तो बाहेर बसूनच त्यांची कागदपत्रं बघायला लागला. लोकांना मार्गदर्शन करायला लागला. त्याचे हळूहळू पैसे घ्यायला लागला. सरकारी कागदपत्रांमध्ये एक्स्पर्ट असल्यामुळे तो सांगेल तशी कागदपत्रं दिली की आपलं काम होतं हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. मग ते त्याच्याकडे यायचे, पैसे देऊन आपली कागदपत्रं दाखवून कमी-जास्त असेल ते दुरुस्त करून घ्यायचे आणि मग आत जायचे. त्याने मग हळूहळू त्या कागदपत्रांवर आपला शिक्का मारायला सुरुवात केली. शिक्का काय होता माहितीये. तो राजवाडय़ाबाहेर जिथे बसायचा तिथे एक पितळी दरवाजा होता. म्हणून याचा शिक्का होता, गोमाजी गणेश पितळी दरवाजा. आतल्या लोकांनाही या गोष्टीची हळूहळू इतकी सवय झाली की गोमाजी गणेश पितळी दरवाजा असा शिक्का नसेल तर ते कागद आतले अधिकारीच unauthorised ठरवायला लागले.
आहे की नाही गम्मत?
याचा अर्थ please  प्लीज असा घेऊ नकोस की, I am praising  corruption. पण तुझ्या ‘आप’चा corruption  हा एक major point आहे. तर u have to go ahead of it and think.
तुझ्याबद्दलही आता असंच म्हणावं लागणार.. u r right person in the wrong party!
– किमी