लोकांच्या शाहीचा गं बाई गोंधळ मांडलागोंधळ मांडिला न् द्येवा गोंधळाला यावंमंडळी, या.नवरात्रोत्सवाच्या या महन्मंगल पर्वामध्ये येथे लोकशाहीचा महागोंधळ मांडला आहे. युती, आघाडी आणि बाकीचे सगळे असे तिकाटणे उभे केले आहे. दिवटय़ा तर केव्हाच पेटविल्या आहेत. दिवटे मैदानात यायची वाट पाहात होतो! आता तेही आले आहेत! संबळ चढवला आहे. जागावाटपाचे, उमेदवारीचे तुणतुणे.. ते सुरूच आहे. आमच्या नेत्यांचे भगतगणही टाळ घेऊन सज्ज आहेत. तेव्हा चला मंडळी, (फाल्गुनीबाई (की भाई?), झालेच तर प्राची आणि प्रीतीताई यांचा रास जर्रा बाजूला ठेवून.. अवघड आहे. पण जमेल!) आपली आराध्य दैवते, ग्रामदैवते यांना साग्रसंगीत आवाहन करू या.. गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे.. मातोश्री गडा गोंधळा यावेदिल्लीच्या नमोपती गोंधळा यावेनागपूरच्या फडनिसा, कोंकणच्या ईनोदा, मुंबैच्या राऊता तुम्ही गोंधळा यावेगोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे बारामती शिद्धा गोंधळा यावेसांगलीच्या आबा गोंधळा यावेरायगडच्या निळोबा, ठाण्याच्या जितोबा, नाशिकच्या बाहुबळा गोंधळा यावेगोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे कराडच्या बाबा गोंधळा यावेशिंधुदुर्ग नारोबा गोंधळा यावेनागपुरी माणिका, सोनसळच्या पतंगा, बाळोबा, विखोबा तुम्ही गोंधळा यावेगोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावेआयाराम गयारामा गोंधळा यावेसंतप्त बंडोबा गोंधळा यावेरेल्वेच्या इंजिना, उगवत्या सूर्या, केरसुण्या,अपक्षा गोंधळा यावे-हायल्या सायल्या पक्षां तुम्ही गोंधळा यावेगोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावेजेनेटिक प्रॉब्लेम तरी गोंधळा यावेमला सर्कार हवे म्हणत गोंधळा यावेआरक्षण दिले आता गोंधळा यावेवारशाच्या हक्काने गोंधळा यावेसत्तेच्या सिंचनाला गोंधळा यावेगोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावेउदे उदे उदे उदे.लोकशाहीच्या नावानं गोंधुळमांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेअहो सेवेच्या नावानं गोंधुळ मांडिलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळा यावे आम्ही गोंधळी गोंधळीन् आम्ही सत्तेचे गोंधळीहोऊ दे सर्व दिनी मंगळवाजवतो ट्विटरी संबळफुगवतो दंडाची बेटकुळीआम्ही सत्तेचे गोंधळी.. उदे उदे उदे उदे.. सत्ते कारणं खुर्ची कारणं गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेलेका कारणं लेकी कारणं गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेकाका कारणं पुतण्या कारणं गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेसत्तास्वामिनी पूज्य देवता गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेजुडय़ाजुडय़ानं राज्य करावं गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेजागावाटपी तंटे करून गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेमित्रपक्षांना घंटा देऊन गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेचोळी पातळ भांडी वाटप गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेनिळ्या प्रतीचा स्वप्नास्वप्नांचा गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावेआश्वासनांच्या इंद्रधनुचा गोंधुळ मांडलागोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे आम्ही गोंधळी गोंधळीन् आम्ही सत्तेचे गोंधळी आम्ही करतो जिथे गोंधळ न् उडते लोकांच्या डोळी धूळउडते लोकांच्या डोळी धूळ न् विसरती प्रश्न समस्या मूळविसरती प्रश्न समस्या मूळ न् लागे सोशल मीडियाचे खूळलागे सोशल मीडियाचे खूळ न् होते तथ्यांची तारांबळहोते तथ्यांची तारांबळ न् येते आरोपांना बळयेते आरोपांना बळ न् जाते नासून सारीनीळजाते नासून सारी नीळ न् सारा पंचवार्षिक खेळसारा पंचवार्षिक खेळ न् हा निवडणूक गोंधळ हा गोंधळ मांडला न् द्येवा गोंधळाला यावे..उधं उधं उधं उधं.. प्रचारसभांचा.. उधंमीडियाकक्षांचा.. उधंविकावूवार्ताचा.. उधंनिवडणूक तंत्राचा.. उधंआश्वासन मंत्राचा.. उधंनोटांच्या गड्डय़ांचा.. उधंत्याला भुलणाऱ्या गध्ध्यांचा.. उधंउधं उधं उधं उधं..