अदिती देवधर

‘‘निसर्गासाठी Do’s आणि Dont’s हीही फारच छान कल्पना आहे.’’ सर म्हणाले.
‘‘पण सर, ही माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवणार?’’ संपदासमोर मोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं.
‘‘आधी लोक म्हणजे काय हे नक्की करा. नक्की कोणापर्यंत ही माहिती जायला हवी असं तुम्हाला वाटतं?’’ यशच्या दादानं, केदारनं विचारलं.
‘‘मला असं वाटतं, तुमच्या वयाच्या मुलांनी तुमच्या वयाच्या मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे.’’ सर म्हणाले.
‘‘ही छान कल्पना आहे.’’ केदार ही कल्पना खूप आवडली.
‘‘तुमच्यासारखीच तुमच्या वयाची अन्य मुलंही उत्साही, चौकस असतील ना!’’ सर म्हणाले.
‘‘तक्ता करायचा?’’ गणेशनं विचारलं.
‘‘यादी करायची?’’ नेहा म्हणाली.
‘‘तक्ता, यादी असं तुम्हाला आवडतं का?’’
‘‘हॅ, जाम बोअर होतं.’’ गॅंगचं एकत्र उत्तर.
‘‘जे तुम्हाला आवडत नाही ते तुमच्या वयाच्या अन्य मुलांना आवडणार नाही.’’ केदार म्हणाला.
‘‘मग आम्ही गोळा केलेली माहिती पोहोचवणार कशी?’’यतीननं विचारलं.
‘‘तुम्हाला काय आवडतं.’’ सरांचा प्रश्न.


‘‘खेळ!!’’
‘‘गोष्ट!!’’
‘‘ऑनलाइन गेम!’’
‘‘बरोब्बर!! मग याच माध्यमांतून मुलांपर्यंत माहिती पोहोचवायची.’’ केदार म्हणाला.
‘‘पण आम्हाला गोष्ट नाही लिहिता येत.’’ संपदानं शंका उपस्थित केली.
‘‘हो ना. आम्ही गेम खेळतो; पण तो तयार कसा करायचा माहीत नाही.’’ यतीन म्हणाला.
‘‘आपण नेहमी सहकारी तत्त्वावर काम केलं पाहिजे. अनेक जण एकत्र येऊन काम करतात तेव्हा विविध कौशल्ये एकत्र येतात.’’ केदारला खूप कौतुक वाटलं.
‘‘लिहायची कला निर्माण होऊन पाच हजार वर्षे झाली. त्यामुळे आपल्या आधी लोकांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत.’’ डोळे मिचकावत सर म्हणाले. सरांच्या मिस्कील चेहऱ्याकडे बघताना मुलांना हसू आलं.
‘‘गोष्ट आणि ऑनलाइन गेम कसं होईल? कल्पना भारी आहे; पण होईल का तसं?’’ संगीता म्हणाली.
‘‘काही तरी वेगळंच वाटतंय खरं.’’ राजूनं दुजोरा दिला.
उत्तरादाखल सर आतून एक घडयाळ घेऊन आले. काही तरी वेगळं होतं ते. दिसत होतं आपल्या नेहमीच्या घडय़ाळासारखंच होतं; पण काही तरी वेगळं होतं.
‘‘त्याच्यावरचे आकडे उलटे आहेत.’’ निरखून बघत मीना म्हणाली.
‘‘हो. १२च्या उजवीकडे १, २ असे पाहिजेत तर ते १२च्या डावीकडे आहेत.’’ यतीन म्हणाला.
‘‘काटेही उलटे फिरत आहेत.’’ शैलेश म्हणाला.
‘‘खरंच की. अॅन्टी क्लॉकवाइज फिरताहेत काटे.’’ नेहा चित्कारली.


झालं, एकच हलकल्लोळ!!
‘‘बघू बघू’’ करत सगळी गॅंग भोवती जमली. गणेश आणि गॅंग तर कॉम्प्युटरमधून बाहेर यायची बाकी होती.
‘‘हे असं उलटं घडयाळ का केलं आहे?’’ गणेशनं विचारलं.
‘‘उलटं का? मला तर हे सुलटं वाटतंय.’’ सर म्हणाले.
‘‘असं कसं. सगळय़ा घडय़ाळय़ांचे काटे उजवीकडून डावीकडे फिरतात.’’ राजू म्हणाला.
‘‘असं का?’’ सरांनी विचारलं.
मुलांनी खांदे उडवले.
‘‘आत्ता किती वाजले आहेत सांगा बघू?’’ सर म्हणाले.
‘‘११ वाजून २० मिनिटे.’’ यश म्हणाला.
‘‘तुमच्या नेहमीच्या घडय़ाळात किती वाजले आहेत?’’ सरांनी प्रश्न विचारला.
‘‘तेवढेच!!’’ यश भिंतीवरच्या घडय़ाळाकडे नजर टाकत म्हणाला.
‘‘म्हणजे हे घडयाळ वेळ तर बरोबर दाखवतंय.’’ सरांनी आश्चर्यकारक चेहरा करत मुलांना सांगितलं.
‘‘हो.’’ गॅंगचा होकार आला.
‘‘घडय़ाळाचे काटे उजवीकडून डावीकडेच का फिरतात माहीत आहे? कारण जगातल्या पहिल्या घडय़ाळाचे काटे तसे फिरले म्हणून!! बाकी काही नाही.’’ सर म्हणाले.
‘‘म्हणजे?’’
‘‘जगातलं पहिलं घडयाळ असं तयार केलं म्हणून पुढची सगळी घडय़ाळं तशी तयार केली, बस्स!! काटे उलटे फिरणारं घडयाळही असू शकतं आणि बरोबर वेळ दाखवतं.’’ सर म्हणाले.


‘‘हू.’’ गॅंग विचारात पडली.
‘‘वेगळा विचार म्हणजे असा! प्रत्येक गोष्टीत हे असं का आणि तसं का नाही, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्यादृष्टीनं विचार व्हायला पाहिजे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी काही वेगळय़ा विचारांची गरज आहे हे आईनस्टाईन म्हणतात ते हेच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


aditideodhar2017@gmail.com