भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शन वाहिनीवरील मुलाखतीने निर्माण झालेले वादंग थोपविण्यासाठी आता पक्ष सरसावला आह़े मोदी यांनी प्रियंका आपल्या मुलीसमान असल्याचे कधीही म्हटले नव्हत़े दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या ज्या मुलाखतीत मोदींचे हे वक्तव्य दाखविण्यात येत आहे, ती मुलाखत जाणीवपूर्वक विपर्यास्त करण्यात आलेली आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी दिले आह़े तसेच कोणाच्या दबावाखाली या मुलाखतीत फेरफार करण्यात आले याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी येथील पत्रकार परिषदेत केली़
गेली तब्बल १० वष्रे गुजरातमधील दूरदर्शनने मोदींना बहिष्कृत केले आह़े आणि आता त्यांच्या मुलाखतीतील मजकूर जाणीवपूर्वक विपर्यास्त करण्यात आला आहे, हे पाहून आम्हाला फारच दु:ख वाटत आह़े जर मोदी प्रियंका मुलीप्रमाणे असल्याचे म्हणालेच नाहीत, तर शुक्रवारी तशा बातम्या आल्याच कशा, असा प्रश्नही प्रसाद यांनी उपस्थित केला़
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
‘प्रियंका मुलीसमान असल्याचे मोदी म्हणालेच नाहीत’
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शन वाहिनीवरील मुलाखतीने निर्माण झालेले वादंग थोपविण्यासाठी आता पक्ष सरसावला आह़े

First published on: 03-05-2014 at 04:21 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiप्रियांका गांधी वाड्राPriyankaGandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi releases full dd interview says it had no priyanka daughter remark