04 March 2021

News Flash

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांमध्ये शिवसेना अग्रस्थानी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असणा-या खासदारांच्या पक्षनिहाय स्थितीवर नकाशाच्या दृश्यमाध्यमातून टाकलेली ही नजर

| March 10, 2014 08:25 am

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असणा-या खासदारांच्या पक्षनिहाय स्थितीवर नकाशाच्या दृश्यमाध्यमातून टाकलेली ही नजर
या नकाशाच्या उजवीकडील खालच्या कोप-यात नजर टाकल्यास लक्षात येईल की ज्या राज्यांमधून लोकसभेवर जास्त खासदार पाठविले जातात, त्याच राज्यांतील खासदारांवर जास्त गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांची नोंद आहे.

वरील कोष्टकावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, झारखंड राज्यातील ५० टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामागोमाग महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

देशातील काही प्रमुख पक्षांतील गुन्हेगारी आरोप असणा-या खासदारांची संख्या या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांमध्ये शिवसेना अग्रस्थानी
शिवसेना पक्षाने सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांमध्ये पहिला क्रमांक पटकावल्याचे दिसून येते. लोकसभेत १० सदस्यांचे संख्याबळ असणा-या शिवसेनेतील ८० टक्के खासदारांवर गुन्ह्याचे आरोप आहेत. तर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणा-या भाजपच्या ११२ पैकी ४१.०७ टक्के खासदारांवर गुन्हेगारी आरोप दाखल आहेत. याबाबतीत तिस-या क्रमांकावर असणा-या संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) १९ खासदारांपैकी ३६.४८ टक्के खासदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत.

झारखंड राज्यातील खासदार कामेश्वर भाटिया यांच्यावर गुन्ह्याचे तब्बल ४६ आरोप दाखल आहेत. तसेच भाटिया यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या आरोपांचीसुद्धा नोंद आहे. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे खासदार आर.बी. राजेश आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत भाऊराव खैरे यांच्याविरोधात प्रत्येकी १६ गुन्ह्यांची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 8:25 am

Web Title: the numbers story list of mps facing criminal charges
Next Stories
1 वाजपेयींच्या विरोधात पक्षाने मोदींना अभय दिले-नायडू
2 भाजपच्या माजी खासदाराला काँग्रेसची उमेदवारी
3 मनसे निर्णयाने काँग्रेसच्या आशा पल्लवीत
Just Now!
X