शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसने आता आपला मोर्चा भाजपचे दुसरे मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवला आहे. ग्रामीण विकासमंत्री असणारे गोपीनाथ मुंडे यांनी १९७६ साली पदवीधर झाल्याचे नमूद केले आहे. मात्र ते ज्या महाविद्यालयात शिकले त्याची स्थापना १९७८ साली झाल्याबाबत काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सामाजिक संकेतस्थळांवर भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्याकडील खात्याबाबत मोठय़ा प्रमाणात चर्चा होताना दिसते. मुंडे यांनी १९७६ साली पदवी घेतल्याचे नमूद केले आहे. मात्र ते शिकत असलेल्या महाविद्यालयाची स्थापनाच १९७८ साली झाल्याबाबत काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला आहे. यासाठी अहमद यांनी मुंडे यांच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा दाखल दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसने आता भाजपच्या मंत्र्यांवर शिक्षणाच्या मुद्दय़ावरून टीकास्त्र सुरू केले आहे. सुरुवातीलाच मनुष्यबळ विकासमंत्री असणऱ्या स्मृती इराणी पदवीधर नसल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस अजय माखन यांनी टीकेची झोड उडवली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2014 रोजी प्रकाशित
महाविद्यालय सुरू होण्याआधीच पदवी
शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका करणाऱ्या काँग्रेसने आता आपला मोर्चा भाजपचे दुसरे मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवला आहे.

First published on: 01-06-2014 at 01:56 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After smriti congress targets gopinath munde