भ्रष्टाचार, चुकीची आíथक धोरणे आणि अकार्यक्षम कारभारामुळे आवश्यक निर्णय घेतले न गेल्याने अर्थव्यवस्थेचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. चलनवाढ आणि कमी झालेला विकास दर, या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी परकीय गुंतवणुकीला व उद्योगांना चालना देण्यात येत आहे. लोकप्रियतेसाठी इंधन अनुदानाचे निर्णय घेतले गेले व श्रीमंतांनाही त्याचा लाभ होत आहे. काँग्रेसच्या कारकीर्दीतील हे चित्र बदलण्याचे व चुका सुधारण्याचे आव्हान असून अर्थव्यवस्थेला पुढील काही काळात खचितच गती दिली जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी केले.
मुंबई भाजपच्या वतीने एनसीपीए येथे अर्थमंत्री जेटली यांचे व्हिजन इंडिया-आव्हाने आणि साध्य विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर मार्मिक विवेचन केले. अर्थमंत्री जेटली म्हणाले, टू जी, कोळसा खाण गरव्यवहार अशा अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश दिले गेले. भ्रष्टाचारामुळे परकीय गुंतवणुकीला व उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला. राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य काही प्रकल्पांसाठी कंत्राटदार आज पुढे येत नाहीत. भूसंपादन करण्यासाठी अडथळे निर्माण केले आहेत. पी.व्ही. नरसिंहराव आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना काही चांगली पावले टाकली गेली. मात्र राजीव गांधीं आणि गेल्या सरकारच्या काळात काही आवश्यक निर्णय झाले नाहीत. लोकप्रिय ठरण्यासाठी इंधन अनुदानाचे निर्णय घेतले गेले. गरीबांसाठी त्याची आवश्यकता असताना इंधन अनुदानाचा लाभ श्रीमंतांनाही मिळत आहे. हे चिंताजनक आहे. मध्यमवर्गीयांवर करांचा बोजा टाकला जाणार नसून त्यांच्या हाती खर्च करण्यासाठी पसा राहिला, तर उत्पादन वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
आरोग्यविमा क्षेत्राला प्राधान्य दिले जाणार असून प्रत्येकाचे बँक खाते असले पाहिजे,यासाठी पावले टाकली जातील. परकीय गुंतवणुकाला आकर्षति करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. लवकरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा आशावाद जेटली यांनी व्यक्त केला. आशिष शेलार यांनी प्रास्तिवक केले, सुनील राणे यांनी सूत्रसंचालन केले, तर खासदार पूनम महाजन यांनी आभार मानले.