scorecardresearch

एफडीए आयुक्त महेश झगडे यांची बदली

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर आणि केमिस्ट लॉबीवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांची राज्य सरकारने मंगळवारी बदली केली.

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर आणि केमिस्ट लॉबीवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांची राज्य सरकारने मंगळवारी बदली केली. केमिस्ट लॉबीच्या दबावापुढे मुख्यमंत्री अखेर झुकल्याची चर्चा मंत्रालयात होती. त्याचप्रमाणे जमीन खरेदीच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचीही बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी झगडे यांच्यासह आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नगरपालिका संचालनालयाचे संचालक पुरुषोत्तम भापकर यांची झगडे यांच्या जागी अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुणे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची पुणे विभागीय आयुक्तपदी, डी.एस राजूरकर यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी, पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव किरण कुमार गिते यांची अमरावती जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. सूर्यवंशी यांची नव्यानेच स्थापन झालेल्या पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर कोकण विभागीय जातपडताळणी समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांची सूर्यवंशी यांच्या जागी बदली करण्यात आली आहे.

राज्यात गेली दोन अडीच वर्षे केमिस्ट लॉबी आणि एफडीए आयुक्त महेश झगडे यांच्यात संघर्ष सुरू होता. औषध किंमती नियंत्रणात आणण्याबरोबरच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास मज्जाव, तसेच मेडिकल दुकानदारांच्या नफेखोरीलाही लगाम घातल्यामुळे झगडे यांना हटविण्यासाठी केमिस्ट असोसिएशनने तीन वेळा बंदही पुकारला होता. एवढय़ावरच न थांबता या लॉबीकडून मुख्यमंत्र्यांवर दबावही आणला जात होता.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-08-2014 at 12:02 IST

संबंधित बातम्या