रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या गॅसच्या किमतीचा मुद्दा आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक वचननाम्यावरील प्रमुख मुद्दा असणार आह़े  येत्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेससारख्या मोठय़ा पक्षांवर शरसंधान करण्यासाठी आपकडून ‘गॅसबाणां’चा वापर करण्यात येणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळत आहेत़  
काँग्रेस खिळखिळीत झाल्यामुळे राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न ‘आप’ आणि भाजपकडून करण्यात येत आह़े  त्यामुळे काही काळापासून आपकडून नरेंद्र मोदी यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आह़े
आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल हे सातत्याने भाजप आणि काँग्रेसला लक्ष्य करीत आहेत़  गॅसच्या किमतींचा मुद्दा पक्षाकडून प्रमुख राजकीय मुद्दा ठरविण्यात येणार आह़े  कारण याचा मुद्दय़ावरून ‘आप’ला काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना
लक्ष्य करता येणार आह़े  हा मुद्दा पक्षाच्या वचननाम्यातही असेल, असे ‘आप’च्या एका नेत्याने सांगितल़े  
१ एप्रिलला नवे गॅसदर लागू झाल्यानंतर केजरीवाल आणि पक्ष हा मुद्दा कसा उचलून धरतील ते पाहाच़  हा देशभरातील लोकांना आकर्षित करणारा हा मुद्दा आह़े  त्यामुळे या मुद्दय़ावरूनच काँग्रेस-भाजपला त्राही भागवान करून सोडण्यात येणार आहे, ‘आप’च्या आणखी एका नेत्याने खासगीत सांगितल़े