द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती केली असली तरी केंद्रीय मंत्री ईएम सुदर्शन नटचियप्पन यांनी मोदी यांच्यावर टीका करून करुणानिधी यांच्या म्हणण्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी हे विनाशाचे प्रतीक असून ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत, असे नटचियप्पन यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष द्रमुक आणि डीएमडीकेशी युती करण्यास तयार आहे आणि द्रमुकचे नेते करुणानिधी हे निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत पक्षाच्या तत्त्वांनाच पहिली पसंती देतील, असा विश्वास नटचियप्पन यांनी व्यक्त केला आहे. भाजप हा त्सुनामी आणि त्यामुळे काँग्रेसचा नाश होईल, असे मोदी यांनी म्हटले आहे. त्सुनामी याचा अर्थच विनाश आहे आणि मोदी हे विनाशाचेच प्रतीक आहेत.  आघाडी करण्याबाबत द्रमुकी आपल्या तत्त्वांचे पालन करील  असे ते म्हणाले.