सूर्यफूल

  • पेरणी व मशागत – खाद्यतेलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सूर्यफूलाचे पीक घेतले जाते. सूर्यफूलाचे तेल सक्तदाबाचा विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. शिवाय या पिकाची काही खास वैशिष्टय़े आहेत. हे पीक कमी कालावधीत म्हणजेच ८० ते ९० दिवसांत तयार होते. खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामांत ते घेता येते. याची मुळे जमिनीत खोलवर जाणारी असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते. तसेच, रासायनिक खते व पाण्यास हे पीक चांगला प्रतिसाद देते.
  • जमीन – हे पीक हलक्या ते भारी जमिनीत येऊ शकते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हवी.
  • पूर्वमशागत – या पिकाची मुळे खोल जाणारी असल्यामुळे २०-२५ सें. मी. खोल नांगरट करतात. तसेच कुळवाच्या तीन-चार पाळ्या दिल्यानंतर धसकटे, कचरा वेचतात. हेक्टरी १५-२५ गाडय़ा शेणखत घातले जाते. वाळवी या किडीचा प्रादुर्भाव होत असल्यास हेक्टरी ६५ किलो बीएचसी (१० टक्के) पावडर पेरणीअगोदर जमिनीत मिसळणे फायद्याचे ठरते.
  • मॉर्डेन ही जात तयार होण्यासाठी ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. हेक्टरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटल मिळते. ही बुटकी जात असून तिन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे. इसी-६८४१४ या जातीची रोपे तयार होण्यास १०० ते ११० दिवसांचा कालावधी लागतो. उत्पन्न १५ ते १८ क्विंटल मिळते.