साखर कारखान्यातून निघणाऱ्या मोलॅसिस (मळी)चा वापर पशुखाद्यासाठी कसा करता येईल यासाठी क्युबा देशाने शास्त्रज्ञ कामाला लावले. त्यांचे संशोधन होईपर्यंत जनावरांना थेट पशुखाद्य म्हणून मळीच खाऊ घालण्यास सुरुवात केली. या मळीत पोषणमूल्य अधिक आहे. दिवसाला १० किलो मळी पशुखाद्य म्हणून खाऊ घातली तरी जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यांनी उपलब्ध धान्य, शेतीतील टाकाऊ पदार्थ याचे मिश्रण करून जनावरांसाठी वापरले. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत मोलॅसिसचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. लातूर जिल्हय़ातील रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील रामभाऊ मारुतीराव हांडगे (६०) या शेतकऱ्याने यावर्षी हा प्रयोग पहिल्यांदाच केला.

आपल्याकडे दर तीन वर्षांनी दुष्काळाचे चक्र फिरत राहते, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न वारंवार भेडसावत राहतो. हे प्रश्न सोडवण्यासाठी पारंपरिक प्रयोग केले जातात व त्यातून प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी जे मूलभूत संशोधन करून काम करावे लागते ते मात्र होत नाही.
१९६०च्या दशकात अमेरिकेने क्युबा या देशाला सहकार्य करणे बंद केले. त्याच काळात रशियाचेही विघटन होत असल्यामुळे रशियाकडूनही फारशी मदत मिळत नव्हती. क्युबामध्ये मोठय़ा प्रमाणावर उसाचे उत्पादन होत होते, मात्र जनावरांना जगवणे हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एकाच वेळी अमेरिका व रशियाकडील रसद बंद झाल्यामुळे स्वत हातपाय हलवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. साखर कारखान्यातून निघणाऱ्या मोलॅसिस (मळी)चा वापर पशुखाद्यासाठी कसा करता येईल यासाठी त्यांनी शास्त्रज्ञ कामाला लावले. त्यांचे संशोधन होईपर्यंत जनावरांना थेट पशुखाद्य म्हणून मळीच खाऊ घालण्यास सुरुवात केली. या मळीत पोषणमूल्य अधिक आहे. दिवसाला १० किलो मळी पशुखाद्य म्हणून खाऊ घातली तरी जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही. त्यानंतर त्यांनी उपलब्ध धान्य, शेतीतील टाकाऊ पदार्थ याचे मिश्रण करून जनावरांसाठी वापरले. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत मोलॅसिसचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. त्यातून तेथील जनावरे कुपोषित राहात नाहीत. आपल्याकडे सर्व साधनसामग्री असतानाही याबाबतीत आनंदी आनंदच आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर मोलॅसिसचा वापर करून पशुखाद्य तयार करण्याचे प्रयोग आजवर कुठे झाले नाहीत. लातूर जिल्हय़ातील रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील रामभाऊ मारुतीराव हांडगे (६०) या शेतकऱ्याने यावर्षी हा प्रयोग पहिल्यांदाच केला. रामभाऊंकडे २० एकर जमीन आहे. २० ते २५ जनावरे आहेत. ज्याप्रमाणे साखर कारखाना चालवावा, त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून त्याचा गूळ तयार करून विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आलेल्या उसाला जे बांधणीसाठी पाचट वापरले जाते त्या हिरव्या पाचटाचा वापर जनावरांना पशुखाद्य म्हणून होत असे. त्यामुळे यावर्षीपर्यंत गेल्या ३० वर्षांत त्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कधी पडलाच नाही. यावर्षी पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन घटले. त्यामुळे गूळ तयार करण्याचा व्यवसाय बंद पडला व त्यातून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.
रामभाऊंनी गावातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव पाचेगावकर यांना अडचण सांगितली. शेतात कडब्याची पेंडी नाही व दावणीला २५ जनावरे आहेत. ते सांभाळायचे कसे? हा रामभाऊंच्या समोरील प्रश्न होता. डॉ. पाचेगावकरांनी रामभाऊंना शेतातील पाचट, गुळी यावर गुळाचे पाणी टाकून ते खाद्य जनावरांना खाऊ घातले तर कमी खर्चात पोषणमूल्य वाढवता येतील असे सांगितले. रामभाऊंकडे गूळ शिल्लक होता. रोज त्याचा वापर सुरू झाला. ३० रुपये किलोचा गूळ जनावरांना पशुखाद्यासाठी वापरला जात होता. मात्र गूळ संपल्यानंतर करायचे काय? असा प्रश्न निर्माण होणार हे लक्षात घेऊन मोलॅसिसचा वापर करून पशुखाद्य तयार करण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. आपल्या देशात मोलॅसिस खरेदी करायचे असेल तर त्याला परवाना घ्यावा लागतो. ९० टक्के मोलॅसिसचा वापर अल्कोहोलसाठी केला जातो. अबकारी कर लागत असल्यामुळे त्याचा परवाना घ्यावा लागतो, मात्र हा परवाना सहजासहजी शेतकऱ्यास मिळत नाही.

about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation
MPSC मंत्र : कृषी घटकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Agricultural policy changes Increase in edible oil import duty Elections farmer print eco news
कृषिधोरण बदलांची क्षेपणास्त्रे ‘बूमरॅंग’ होणार?
loksatta kutuhal facial recognition with artificial intelligence
कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवणे १
The use of artificial intelligence AI technology is also starting in the construction sector Pune print news
‘एआय’ची अशीही कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला कळेल संभाव्य घर खरेदी करणारा ग्राहक
amazon employee cut off
‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?
OpenAI launch o1 and o1 mini
OpenAI कडून नवीन एआय मॉडेल्स लाँच; स्पर्धा परीक्षांसाठी ठरणार उपयुक्त; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Review of collaborative filtering technology
कुतूहल : आवडीतील साधर्म्यानुसार शिफारस

उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे रामभाऊंनी अर्ज केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रारंभी याकडे लक्ष दिले नाही. यावर्षीच्या जनावराच्या चारा छावणीसाठी मोलॅसिस आधारावर पशुखाद्य बनवून चारा छावणी चालवण्याची मागणी डॉ. पाचेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. एका कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुळापासून तयार केलेले पशुखाद्य ठेवण्यात आले. या पध्दतीने पशुखाद्य बनवले गेले तर चाऱ्याचा प्रश्न सुटेल, असे डॉ. पाचेगावकरांनी सांगितले व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मोलॅसिस खरेदीचा परवाना रामभाऊंना दिला. सबंध देशभरात मोलॅसिस खरेदीचा एखाद्या शेतकऱ्याला मिळालेला देशातील पहिला परवाना ठरला. हा परवाना घेऊन रामभाऊंनी रेणा साखर कारखान्याकडे एक टन मोलॅसिस खरेदीची मागणी केली. टनाला १ रुपया चलन भरावे लागते. ते बँकेत गेले असता एक रुपयाचे चलन भरले जात नाही, किमान ३०० रुपयांचे भरावे लागते, त्यामुळे त्यासाठी ३०१ रुपयांचे चलन त्यांनी भरले. परवाना फी १० रुपये होती. त्यासाठीदेखील ३१० रुपये त्यांना भरावे लागले. १ टन मोलॅसिचा भाव ६ हजार रुपये आहे. त्यावर ७७७.५० रुपये अबकारी कर लागला व त्या बेरजेवर २० टक्के व्हॅट आकारणी करण्यात आली. उत्तर प्रदेशात ही आकारणी साडेचार टक्के, महाराष्ट्रातही अल्कोहोलसाठी वापर करणाऱ्या कंपन्यांना साडेचार टक्के व्हॅट आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी तो २० टक्के आहे. तरीही रामभाऊंनी पसे भरून खरेदी करण्याचे ठरवले. आरटीओमार्फत परवाना घेतलेल्या वाहनातूनच मोलॅसिसची वाहतूक करता येते. पुन्हा त्यांनी पाठपुरावा करून त्यांच्या वाहनाचा परवाना मिळवला व हा द्राविडी प्राणायाम करून त्यांनी आपल्या शेतात पशुखाद्य तयार करणे सुरू केले आहे.
शेतात उपलब्ध असणारे पाचट, गहू, हरभरा, सोयाबीन याची गुळी, एरवी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या तुराटय़ा, कापसाच्या पलाटय़ा याचाही वापर ते बारीक करून पशुखाद्यासाठी करता येतो. एका जनावरासाठी सात किलो कुट्टी, दोन किलो मोलॅसिस व एक किलो भरडा (गहू, मका, हरभरा, ज्वारी यांचे भरड), १०० ग्रम शेंगदाण्याची पेंड व शंभर ग्रम मीठ याच्या मिश्रणावर पाणी टाकून ते १२ तास अमवायचे. सकाळी तयार केलेले मिश्रण संध्याकाळी, तर संध्याकाळी तयार केलेले मिश्रण सकाळी जनावरांना दिले तर ते एका जनावराला २४ तास पुरते. कुट्टीचा एकूण खर्च प्रतिकिलो २ रुपये, असे ७ किलोचे १४ रुपये, २ किलो मळीचे २० रुपये, १ किलो भरडय़ाचे १५ रुपये व मीठ, शेंगदाणा पेंडचे ५ रुपये असे एकूण ५५ रुपये खर्च येतो. या ५५ रुपयांत एका जनावराची २४ तासांची भूक भागवता येते व तेही एरवी उपलब्ध असणाऱ्या पशुखाद्याच्या चौपट पोषणमूल्याने.
रामभाऊंनी परिसरातील शेतीतील टाकाऊ पदार्थ खरेदी करून आपल्या शेतात ते एकत्रित केले आहे व एवढय़ा कमी किमतीत जनावरे जगवता येतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नव्याने पाच म्हशी खरेदी केल्या आहेत. दुधाचा व्यवसाय या स्थितीत चांगला करू शकतो याची त्यांना खात्री पटली आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारण गायी, म्हशी, बल, शेळय़ा, मेंढय़ा यांची संख्या २ कोटींच्या आसपास आहे, मात्र यांच्या पोषणाकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. कायमच कुपोषणाचा प्रश्न भेडसावत असतो. आपल्या देशातील मोलॅसिसचा वापर ५० टक्के जरी पशुखाद्यासाठी केला तरीही जनावरांचे कुपोषण संपेल. आज मराठवाडय़ातून शेतातील टाकाऊ पदार्थ गावोगावी इंधन म्हणून वापरले जाते. काही ठिकाणी हे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्याचा एक किलोचा गठ्ठा करून मुंबई, पुण्यातील उद्योगांसाठी इंधन म्हणून वापरण्यास पाठवले जाते. २ रुपयाने खरेदी करून ५ रुपये दराने ते विकले जाते, मात्र याचा वापर शेवटी इंधनासाठीच होतो. तो पशुखाद्यासाठी जर झाला तर जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. राज्य शासनामार्फत शेकडो चारा छावण्यांना निधी दिला जातो. प्रत्येक जनावरांच्या मागे ७० रुपये शासन देते, मात्र हे पसे जनावरांच्या चाऱ्यासाठी पुरेसे पडत नसल्याच्या छावणीचालकांच्या तक्रारी आहेत. रामभाऊ हांडगेंप्रमाणे पशुखाद्य तयार केले तर ते ५५ रुपये प्रति जनावराप्रमाणे तयार होईल व त्यातून बचत होईल व पोषणमूल्यही वाढेल.
शासनाने या प्रयोगाची दखल घेऊन त्याचे अनुकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गरज ही शोधाची जननी मानली जाते. रामभाऊ हांडगे यांनी आपली गरज भागवण्यासाठी अडचणी आहेत म्हणून रडत न बसता त्यावर मात केली. हीच जिद्द प्रत्येकाने बाळगण्याची तयारी दाखवण्याची आवश्यकता आहे.

पशुखाद्याची गरज महत्त्वाची की दारूनिर्मिती?

१ टन मोलॅसिसपासून कितीही प्रयत्न केला तरी २५० लिटर इतकेच अल्कोहोल तयार होते. १ लिटर अल्कोहोल तयार करण्यासाठी १२ लिटर पाणी वापरावे लागते. ही प्रक्रिया करत असताना यातून जे स्पेंटवॉश बाहेर पडते, त्यामुळे जमिनीची पोत खराब होतो. पाणीसाठे प्रदूषित होतात. स्पेंटवॉशचा दोष दूर करण्यासाठी प्रचंड मोठी भांडवली गुंतवणूक व ऊर्जा खर्च होते. याउलट मोलॅसिसचा वापर पशुखाद्यासाठी केला तर आज रात्री खाऊ घातले तर दुसऱ्या दिवशी सकाळी शेण मिळते व त्याचा वापर खतासाठी किंवा ऊर्जा म्हणूनही करता येतो.
प्रदीप नणंदकर pradeepnanandkar@gmail.com