देशात आणि परदेशातही जल्लोषात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. लक्ष्मीपूजन नंतर आता भाऊबीज आणि पाडवा साजरा करण्याची तयारी सुरू आहे. भावांना खुश करण्यासाठी त्यांचे आवडते पदार्थ बनवणे, सुंदर रांगोळीची सजावट करणे अशी बहिणींची तयारी सुरू असेल. भाऊबीजेला भाऊ आणि बहीण एकमेकांना गिफ्ट्स देतात, मुलींना देण्यासाठी गिफ्ट्सचे कितीतरी पर्याय उपलब्ध असतात, पण मुलांना गिफ्ट काय द्यायच हा प्रश्न नेहमीच पडतो. दरवर्षी भाऊबीजेआधी पडणाऱ्या या प्रश्नावर तुम्हाला पुढील काही पर्याय वाचून नक्की उत्तर मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भाऊबिजेला भावांसाठी या गिफ्ट्सच्या पर्यायांचा विचार करू शकता

  • स्मार्टवॉच – स्मार्टवॉच हे कोणालाही गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय आहे. आजकाल सर्वजण तब्येतीबाबत जास्त जागृक झाले आहेत. त्यामुळे आरोग्याबाबत अपडेट देणारे एखादे स्मार्टवॉच तुम्ही भावाला गिफ्ट देऊ शकता.
  • गॅजेट ऑरगनायजर – सध्या एका इलेक्ट्रॉनिक उपकरणासह त्याच्याबरोबर वापरले जाणाऱ्या इतर उपकरणांना देखील सतत आपल्यासोबत किंवा आजुबाजूला ठेवावे लागते. अशावेळी घरात पसारा होतो, यावर उपाय म्हणजे गॅजेट ऑरगनायजर. पेन ड्राईव्ह, हेड फोन, चार्जर, पॉवर बँक, हार्ड ड्राईव्ह अशा सगळ्या वस्तु ठेवण्यासाठी गॅजेट ऑरगनायजर मदत करते. हा गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
  • बूट : मुलांना किंवा पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारच्या बुटांचे कलेक्शन असावे वाटते, कारण बुटांवर त्यांचा विशेष जीव असतो. अशात तुम्ही भाऊबीजेनिमित्त त्यांना बूट दिले तर त्यांना हे गिफ्ट नक्की आवडेल.

Diwali 2022 : दिवाळीतील मिठाई खाताना मधुमेहाची चिंता सतावतेय? या टिप्स Blood Sugar नियंत्रित ठेवण्यास करतील मदत

  • गृमिंग किट : आजकाल सर्व पुरुष गृमिंग बाबत खूपच जागृक झाले आहेत. कपड्यांपेक्षाही जास्त लक्ष गृमिंगकडे दिले जाते त्यामुळे भाऊबीजेला तुम्ही त्यांना उपयोगी येईल असे ग्रुमिंग किट गिफ्ट देऊ शकता.
  • क्रिकेट किट : क्रिकेट हा सर्व भारतीय पुरुषांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कामात कितीही व्यस्त असले तरी अनेकजण वीकएन्डला किंवा इतर सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळण्यासाठी वेळ काढतातच. त्यामुळे त्यांना आवडेल आणि उपयोगी येईल असे क्रिकेट किट भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून देऊ शकता.
मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 five gift ideas to gift your brother on this bhai dooj pns
First published on: 25-10-2022 at 16:27 IST