Diwali 2023 Date and Time : यंदाच्या दिवाळीला सुरुवात झाली आहे. बाजारात सर्वत्र दिवाळीची धामधून दिसून येत आहे. विविध प्रकारचे आकाशकंदील लोकांनी घरासमोर लावले आहेत, तर दिव्यांनी आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. फराळाचे पदार्थ आणि नवे कपडे घेण्यासाठी लोकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खरंतर दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून होते. त्यानंतर मग नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे दिवाळीतील महत्वाचे सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरे केले जातात. आपल्या देशात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शिवाय तो खूप दिवस सुरू असतो. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि दिव्यांचा सण असल्याचं मानलं जातं. यंदाची दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ती १५ नोव्हेंबरला भाऊबीज झाल्यानंतर समाप्त होणार आहे. दिवाळीतील इतर सणांपैकी एक असणारा दिवाळी पाडवा खूप महत्त्वाचा सण मानला जातो.

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे म्हणतात. यंदाचा दिवाळी पाडवा १४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून व्यापारी वर्षास सुरुवात होते, त्यामुळे या दिवशी लोकं वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळण्याची परंपरा आहे. या दिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धतदेखील आहे. याच सणानिमित्त तुमच्या प्रियजनांना आणि नातलगांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.

साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा.
या दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!

आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपणा सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे.

दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा!
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा

सगळा आनंद
सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
याच दिवाळी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा…

जुना कालचा काळोख,
नवा आजचा प्रकाश,
सारे रोजचे तरीही भासे नवा प्रेमळ सहवास,
सोन्यासारख्या नात्याचा हा पाडवा खास,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा, दीपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!!!