बुलढाणा : ऐतिहासिक देऊळगाव राजा नजीकच्या गुगुळा देवीचे पुरातन मंदिर नवरात्र निमित्त नंदादीपांच्या झगमगाटाने उजळून निघाले आहे. गिरोली खुर्द जवळ गुगुळा देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले मंदिर कमीअधिक ३०० वर्ष जुने असल्याच्या खुणा दिसतात. बाजूलाच फुलविलेल्या सरस्वती उद्यानमधील सुगंधी फुलांचे ताटवे, धबधबा, लहान मुलांसाठी असलेली खेळणी यामुळे भक्तांसह लहान बालकांचेही हे आवडते ठिकाण आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख विरुद्ध पदाधिकाऱ्यांचे बंड!

हेही वाचा – नागपूर : दिवाळीत ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एसटी सज्ज, असे आहे नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजूबाजूला असलेल्या जंगलात गुगुळाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने हे मंदिर गुगुळा देवीच्याच नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात मागील १० वर्षांपासून एक वेगळा उपक्रम राबवला जात आहे. नवरात्रीत अष्टोप्रहर येथे नंदादीप तेवत ठेवण्यात येतात. पहिल्या वर्षी १०१ नंदादीप लावण्यात आले. यंदा त्याने ११०० चा आकडा गाठलाय! नंदादीप लावण्यासाठी घटस्थापनेपूर्वी भाविकांकडून आगाऊ आरक्षण करण्यात येते. गुगुळा देवीवर असलेल्या निस्सीम भक्तीमुळे काही दिवसांतच नंदादीप लावण्यासाठीचे ‘बुकिंग’ पूर्ण होते. जागेअभावी अनेक भक्तांची निराशा होते.