चंद्रपूर जिल्ह्य़ात रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतांनाच चिमूर, अहेरी, विसापूर, राजुरा व गोंडपिंपरी येथे वीज कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला तर,१० जण गंभीर जखमी झाले.
गोंडपिंपरीत शेतात काम करणाऱ्या पारडी येथील लैलाबाई गेडाम (४५) व पोडसा येथील गौतम नारायण मानकर (२८) यांच्या अंगावर वीज पडून घटनास्थळीच मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातील म्हासली येथील इंद्रजित नामदेव नन्नावरे (३५) हे पावसापासून बचावासाठी मित्रासह झाडाखाली थांबले तेव्हा वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला, तर मित्र जखमी झाला. तसेच राजुरा तालुक्यात ३, विसापुरात एका महिलेचा आणि अहेरी तालुक्यातील असपल्लीत दोघांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी व कोरपना तालुक्यातील वनसडी येथे एका युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या युवकाचे नाव कळू शकले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2014 रोजी प्रकाशित
चंद्रपूर जिल्ह्य़ात वीज कोसळून १० जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्य़ात रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतांनाच चिमूर, अहेरी, विसापूर, राजुरा व गोंडपिंपरी येथे वीज कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला तर,१० जण गंभीर जखमी झाले.
First published on: 15-09-2014 at 02:16 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 killed in lightning strike in chandrapur