मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७ हजार ९२४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत २ लाख २१ हजार ९४४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ५७.८४ टक्के इतका झाला आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३ हजार ७२३ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ९ लाख २२ हजार ६६७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, ४४ हजार १३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ४७ हजार ५९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

प्रमुख शहरं आणि त्यामधले अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई – २१ हजार ८१२
ठाणे-३४ हजार ४७१
पुणे -४८ हजार ६७२
कोल्हापूर-२ हजार ६४०
नाशिक- ५ हजार १५२
औरंगाबाद ४ हजार ९०६

गरज असेल तरच बाहेर पडा असं प्रशासनातर्फे आणि सरकारतर्फे सांगण्यात येतं आहे. एवढंच नाही तर बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरुन घरात आल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करावा तसेच साबणाने हात आणि पाय स्वच्छ धुवावेत असंही आवाहन वारंवार करण्यात येतं आहे.