रायगड जिल्ह्यात करोनाचा फैलाव वेगाने होत असून परिस्थिती आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल २४७ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ४ हजार ४४९ वर पोहोचली आहे. दिवसभरात १०९ जणांनी करोनावर मात केली आहे. तर गुरुवारी उपचारांदरम्यान सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात २४७ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील ११५, पनवेल ग्रामिणमधील ६७, उरणमधील ४, खालापूर १४, कर्जत ६, अलिबाग १२, रोहा १६ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा हद्दीतील २, तर पनवेल ग्रामिण, खालापूर, उरण, पेण येथे प्रत्येकी १ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात १०९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील १०,०२१ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ५,४२२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ४,४५९ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर १४० जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. २,५५७ जणांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ७६७ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ८५६, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४०५, उरणमधील ५९, खालापूर ८५, कर्जत ७०, पेण ७३, अलिबाग ६०, मुरुड ९, माणगाव ४०, तळा येथील ३, रोहा ७३, सुधागड ३, श्रीवर्धन १४, महाड ९, पोलादपूर मधील ३ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ८९ हजार ७५४ जणांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.