News Flash

चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या ५२३, ३२२ रुग्ण बरे

जिल्हाधिकारी कार्यालयातील ७० कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी

प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन व जिल्हा परिषद मधील एक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५२३ लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून ३२२ बाधित बरे झाले आहेत. सध्या २०१ बाधितावर उपचार सुरू आहे. दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद परिसर सील केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल ४९५ असणारी रुग्णसंख्या आज सायंकाळपर्यंत ५२३ झाली आहे.एकाच दिवशी २८ बाधित जिल्हयातून पुढे आले आहेत.यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन लिपिकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील ७० कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले.

आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातून ३, चिंतल धाबा पोंभुर्णा या ठिकाणावरून २, पोंभुर्णा शहरातून एक, भद्रावती तालुक्यातून एकूण ४ नागरिक पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कुचना येथील २, एकता नगर येथील एक, भद्रावती शहरातील आणखी एक बाधिताचा समावेश आहे. गडचांदूर लक्ष्मी टॉकीज जवळ आणखी दोन रुग्ण पुढे आले आहेत. तर चंद्रपूर शहरातील शक्तिनगर व दुर्गापूर परिसरातून प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.

रात्री उशिरा आणखी पुढे आलेल्या बाधितामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन, नागभीड येथील औरंगाबाद वरून आलेले एकूण पाच, व अँन्टीजेन चाचणीमध्ये पुढे आलेले एकूण सहा अशा दिवसभरातील 28 बाधितांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तीन बाधित जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आले असल्याची पुष्टी केली असून नागरिकांनी गरज नसताना सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत असून सर्वांची आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 9:26 pm

Web Title: 523 corona patients in chandrpur till date 322 cure from corona scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात आढळले १० हजार ३२० रुग्ण, मृतसंख्या १४ हजार ९९४ वर
2 देवेंद्र फडणवीसांना कदाचित WHO तूनही मार्गदर्शनासाठी बोलावतील-उद्धव ठाकरे
3 आणीबाणी काळातील सन्मान योजना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देणार
Just Now!
X