राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्यांबरोबरच करोना योद्ध्यांना देखील करोनाची बाधा होत असून, यामुळे त्यांचा मृत्यू देखील होत आहे. मागील चोवीस तासांत राज्यात आणखी ५३३ पोलीस करोनाबाधित असल्याचे आढळून आले व तिघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता १७ हजार ९७२ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले (अॅक्टिव्ह केस)३ हजार ५२३ जण, करोनामुक्त झालेले १४ हजार २६९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १८० पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.