News Flash

पसरणी घाटात दोन बसच्या अपघातात १५ जखमी

पसरणी (पाचगणी) घाटात दोन एसटी बस एक दुसऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात

| January 19, 2015 02:30 am

पसरणी (पाचगणी) घाटात दोन एसटी बस एक दुसऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
रविवारी सकाळी अकरा-आडेअकराच्या सुमारास वाई-महाबळेश्वर जनता शटल बस पसरणी (पाचगणी) घाटातून महाबळेश्वरकडे जात असताना दत्तमंदिराजवळील अवघड वळणावर पाचगणीकडून आलेल्या दुचाकीस्वाराने हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना एसटी चालकाने ब्रेक लावल्याने वाई-महाबळेश्वर गाडी अचानक थांबली. पाचगणी घाट  चढत असलेली पाठीमागून आलेली वाई-महाड मुंबई ही एसटी बस त्यावर आदळून गाडीतील पंधरा प्रवासी जखमी झाले. यात चालकाचाही समावेश आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना वाई आगाराने पाचशे रुपये तातडीची मदत व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. नंतर काही जखमी प्रवाशांना घरी सोडण्यात आले. आगार प्रमुख वामन जाधव, सहायक शिरीष जाधव व श्री. गायकवाड यानी परिश्रम करून सर्व रुग्णांना मदत पोहोचविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2015 2:30 am

Web Title: accident in pasarni landing place
टॅग : Injured,Wai
Next Stories
1 उच्च न्यायालयाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे
2 भारतीय संस्कृती उत्सवाच्या शोभायात्रेत उत्साहाचे वातावरण
3 मध्य प्रदेशातील ऊसतोड मजुराच्या मुलीवर सामूहिक अत्याचार
Just Now!
X