News Flash

हा गुरूजी गरळ ओकतो, संभाजी भिडेंवर अजित पवारांची आगपाखड

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांतून त्यांची मानसिकता दिसून येते, अशा मानसिकतेशी लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरु केली. मात्र त्याच भिडे आडनावाशी साधर्म्य असणारी एक व्यक्ती माझ्या बागेतील आंबे खाल्ल्यानं मुलगे होतात असं सांगतात.आपण जे बोललो त्याचा त्यांना खेदही नाही. पुन्हा एकदा महिलांना चूल आणि मूल यातच जुंपण्याचा डाव आहे की काय अशी शंका येते.अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडेच्या आंबा विधानाचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी अजित पवार म्हणाले की,संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ म्हटला जातो. समाजात काय पेरले जाते.याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून याला आपण एकजुटीने अशा मानसिकतेला विरोध करणे आवश्यक आहे. गुरुजींबदद्ल आम्हाला आदर असायचा. मात्र हा गुरुजी देशात गरळ ओकण्याचे काम करत आहे. अशा शब्दात संभाजी भिडेवर त्यांनी निशाणा साधला.

पुणे शहर राष्ट्रवादी पक्ष आणि चिंतामणी ज्ञानपीठ कडून यंदाच्या वर्षी सुचिता भिडे चाफेकर, विद्या बाळ,कीर्ती शिलेदार आणि प्रमिला संकला यांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी आमदार बापूसाहेब पठारे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,कार्यक्रमाचे संयोजक अप्पा रेणुसे, दत्तात्रय धनकवडे आणि विशाल तांबे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे दहा वर्षे उर्जा खाते होते.तेव्हा लाईनमन बाबत अनेक तक्रारी यायच्या.की ते काम करीत नाही.दुसऱ्या काम सांगतात.त्या मागच कारण होत ते म्हणजे त्यांचं पोट सुटलेले. मग ते काय खांबावर चढणार असा प्रश्न मला पडला.तेव्हा मी लाईन वुमनची भरती सुरु केली.त्यानंतर लाईटच्या बाबत तक्रारी कमी झाल्या आहेत.त्यामुळे महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक जबाबदारीनं काम करतात.हे यातून स्पष्ट होते.याच कामातून नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया चांगले काम करीत आहे.अशी भावना व्यक्त करीत ते पुढे म्हणाले की, ज्या देशांनी महिलांचा सन्मान केला.ते देश पुढे गेले असून ज्या देशांनी महिलांचा सन्मान केला नाही.ते मागे राहिल्याचे सांगत प्रत्येकाने महिलांचा सन्मान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की,आपण सोशल मीडियाच्या आहारी गेलो आहोत. ते अतिशय मारक आहे. त्यातून अप्रिय घटना घडतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडियाचा गरजेपुरताच वापर करायला पाहिजे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 11:48 am

Web Title: ajit pawar criticized sambhaji bhide on his mango statement
Next Stories
1 पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला, दीड कोटींचे हिरे चोरीला
2 पुणे स्टेशनच्या परिसरात दीड कोटींच्या दागिन्यांची लूट
3 तोतया नौसैनिकाला पकडले
Just Now!
X