22 September 2020

News Flash

पत्नीची हत्या केल्यावर सैनिकाची आत्महत्या; वर्ध्यातील घटना

वर्ध्यात सैनिकाने पत्नीवर गोळीबार करत आत्महत्या केल्याने खळबळ

प्रतिकात्मक

वर्ध्यात पत्नीची हत्या केल्यानंतर सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या दारुगोळा भांडारातील अजयकुमार सिंह याने पत्नी प्रियंका कुमारी (२६) हिच्यावर गोळी झाडत हत्या केली. नंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

गुरुवारी पहाटे दोन वाजता ही खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सैनिक अजयकुमार सिंह भांडारात सेवेत असतानाच कोणालाही सूचित न करता पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आला. घरी पोहोचताच त्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याच्या आवाजाने शेजारी व काही कर्मचारी यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. अजयकुमारला तात्काळ सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी अजयकुमारचं लग्न झालं होतं. पत्नी गर्भवती असून दोघेही बिहारचे रहिवासी होते. भंडार परिसरात इतरांना प्रवेश करण्यास मनाई आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 11:00 am

Web Title: army jawan killed wife and commit suicide in wardha sgy 87
Next Stories
1 धक्कादायक आकडेवारी: महाराष्ट्रात महिनाभरात वाढले एक लाख करोनाबाधित रुग्ण
2 रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचा नवा उच्चांक
3 वनई टेकडी सपाटीकरण प्रकरणात दोन कोटींची दंडात्मक कारवाई
Just Now!
X