करोनामुळे विद्यार्थी भयभीत आहेतच शिवाय नोकरी धंदा जाईल म्हणून पालकांचा जीवही धोक्यात आला आहे. त्यात सरकारचा “गोंधळात गोंधळ”. दुर्दैवाने विद्यार्थी तणावात आहेत. आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी “सरकारचे संकटमोचन” संजय राऊत तुम्हीच धावून या, असा उपाहसात्मक टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. चला तरुणांचे भविष्य वाचवू या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल, असेही शेलार म्हणाले आहेत.

भाजपा नेते आशिष शेलाप यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षावरून सुरू असलेल्या विद्यार्थांमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ट्विवट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “परमेश्वरानं इतकं निष्ठूर होऊ नये…”, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

मुख्यमंत्री म्हणतात, परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे पण शाळा कशा व कधी सुरु होणार? माहित नाही. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द, पण अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परिक्षांची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री परिक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परिक्षा घ्या म्हणून मा.राज्यपालांना जाऊन भेटतात…बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परिक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून मा.राज्यपालांना काहीच अवगत केले जात नाही. पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल 40% म्हणजे ATKT असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी नापास करण्याचे हे षडयंत्र? तरुणांची एक पिढी उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र? उच्च शिक्षणमंत्री म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ? अशी टीका शेलारांनी सरकारवर केली आहे.