नांदेड जिल्ह्यात आत्या-भाचीने जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मृत महिला या एकाच कुटुंबातील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. सीमा राठोड व निकिता राठोड अशी मृत महिलांची नावे आहेत. या नात्याने आत्या-भाची आहेत. या महिलांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र. घटना कोणाच्या हद्दीत घडली यावरून बाळापूर व मनाठा पोलिसांत बराच वेळ वाद झाला. त्यानंतर अखेर बाळापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. सहायक पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी ही माहिती दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2018 10:36 pm