02 June 2020

News Flash

औरंगाबाद : अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; उपचार न मिळाल्याने मृत्यू

चिमूकलीचे दुखत असल्याने दांम्पत्याने चार मुलांना घेवून औरंगाबादला मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाचे घर गाठले.

अवघ्या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह क्रांतीचौकात रस्त्यावर ठेवून गोधळ घालणाऱ्या मद्यपी पित्याला नागरिकांनी शुक्रवारी (दि.२७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. अतिशय गुंतागुतीच्या या प्रकरणात अडीच वर्षाच्या चिमूकलीवर अत्यंत निर्दयीपणे लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. लैंगिक अत्याचारानंतर चिमूकलीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे कुटुंबीय हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथील आहेत. वडील हॉटेलमध्ये कुक (स्वयंपाकी) म्हणून काम करतात. पाच ते सहा दिवसापुर्वी दांम्पत्य आपल्या मुलाबाळासह कामाच्या शोधासाठी इगतपुरीला गेले होते. परंतु तेथे काम न मिळाल्याने औरंगाबादला परत येत असतांना रेल्वेत पती-पत्नीची चुकामुक झाली होती. दरम्यान, मनमाड येथे पीडितेच्या वडिलांची ओळख परभणीत राहणाऱ्या एका सोबत झाली होती. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मुलांना खाऊ-पिऊ घातले होते. याकाळात पीडित मुलीच्या आईसोबत पुन्हा भेट झाली त्यावेळी अडीच वर्षाच्या मुलीने गुप्तांगात दुखत असल्याचे रडतच सांगितले.

चिमूकलीचे दुखत असल्याने दांम्पत्याने चार मुलांना घेवून औरंगाबादला मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाचे घर गाठले. त्यांच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या सल्यानुसार मुलीला घेऊन चिकलठाण्यातील एका बाबाकडे जात असतांना अर्ध्या रस्त्यातच मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह घेवून तिची आई औरंगाबाद रेल्वेस्टेशन येथे आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पीडितेचे वडील औरंगाबादला आले. त्यानंतर ते दोघे मुलीचा मृतदेह घेवून मुवुंâदवाडीकडे जात असतांना क्रांतीचौकात रिक्षात वाद झाला. त्यामुळे रिक्षाचालकाने दोघांना उतरवून दिले होते. त्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला. दरम्यान, चिमूकलीचे शवविच्छेदन केले असता प्राथमिक अहवालात तिच्यावर अत्यंत निर्दयीपणे लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2019 12:28 pm

Web Title: aurngabad crime two year girl raped police fir nck 90
Next Stories
1 एकतर्फी प्रेमातून औरंगाबादमध्ये तिहेरी हत्याकांड
2 चला, चला निवडणूक आली; सत्ताधाऱ्यांना पाण्याची आठवण झाली!
3 जायकवाडीचे दरवाजे उघडले
Just Now!
X