25 March 2018

News Flash

एकबोटेंना अटक केल्यानंतर पिंपरीत फटाके फोडून करण्यात आला जल्लोष

मिलिंद एकबोटेना अडीच महिन्यानंतर अटक झाली आहे

Updated: March 14, 2018 5:24 PM

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. याचा आनंदोत्सव पिंपरीच्या आंबेडकर चौकात भारिप बहुजन महासंघ या पक्षाकडून करण्यात आला.यावेळी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.नागरिकांना पेढे वाटण्यात आले.तर लवकरात लवकर संभाजी भिडे यांना अटक करावी अशी मागणी देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली होती. या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी फिडे यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्याविरोझात काळेवाडी येथील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पिंपरी पोलिस स्थानकात अॅट्रॉसिटी, जाळपोळ, दंगल भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो वर्ग करून शिक्रापूर येथे दाखल करण्यात आला होता. ज्या महिलेने फिर्याद दिली होती ती महिला भीमा कोरेगाव दंगल घडली त्या दिवशी हजर होती. त्यानुसार घडला प्रकार सांगत फिर्याद दाखल करण्यात आली होती. अडीच महिन्यानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली. याचा जल्लोष भारिप बहुजन महासंघाकडून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष देवेन्द्र तायडे यांनी संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे.

First Published on March 14, 2018 5:24 pm

Web Title: bharip bahujan mahasangh celebrates milind ekbotes arrest
  1. Suniti Agawekar
    Mar 14, 2018 at 7:57 pm
    आपण मराठी मध्ये फटाके फोडून म्हणत नाही तर फटाके लावून आनंद साजरा केला म्हणतो... लोकसत्ता याची दखल घेईल का? जर बातमीपत्रच अशी भाषा वापरू लागले तर बहुसंख्य किंवा सामान्य माणसाकडून काय अपेक्षा करणार??
    Reply