अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केलं. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत म्हणाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

“हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर… ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय…,” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून राऊतांवर निशाणा साधला.

आणखी वाचा- “…तर केंद्र सरकार दाऊदलाही वाय कॅटेगरीची सुरक्षा देईल”

हरामखोर बाबत काय म्हणाले संजय राऊत?

एखाद्या विषयाचं राजकारण करायचं असेल तर कुठल्याही शब्दाचा कुठलाही अर्थ निघू शकतो. महाराष्ट्रात आम्ही जेव्हा हरामखोर असं म्हणतो तेव्हा आम्ही त्याचा अर्थ खट्याळ आणि बेईमान असा होता. जी व्यक्त मुंबईत राहतो त्याबद्दल कुणी काही बोललं तर लोक असं म्हणतात त्याचा फार वेगळा अर्थ काढायची गरज नाही. जर कंगना रणौत कोलकाता, अहमदाबाद किंवा इतर कोणत्याही शहराबाबत असं बोलली असती तर त्या शहरांमधले लोक त्यांच्या भाषेत कंगनाला बोललेच असते तसंच मी बोललो असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.