News Flash

“आपली ५० टक्के मतंही न राखू शकणाऱ्या…”; प्रवीण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका

धुळ्यात भाजपाच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

“आपली ५० टक्के मतंही न राखू शकणाऱ्या…”; प्रवीण दरेकरांची ठाकरे सरकारवर टीका
संग्रहीत

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. १ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीअंती भाजपाच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मात दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर खरमरीत टीका केली.

विधान परिषद पोटनिवडणुकीच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात विजयी झालेल्या अमरिश पटेल यांचं अभिनंदन करणारं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं. याच ट्विटमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मतं राखू शकलेली नाही. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे नक्की काय भविष्य असेल हे स्पष्ट होते”, असे टीका त्यांनी केली. तसेच, भाजपाचे उमेदवार अमरीश पटेल यांचे तसेच सर्व मतदारांचे त्यांनी अभिनंदन केले.

आणखी वाचा- विधान परिषद पोटनिवडणूक: काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरिश पटेलांची काँग्रेसवर मात

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात आलेले उमेदवार होते. तर अभिजीत पाटील भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत खूपच उत्सुकता होती. अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. कारण महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 1:41 pm

Web Title: bjp leader pravin darekar slam uddhav thackeray government after amrish patel wins vidhan parishad bypolls beating congress vjb 91
Next Stories
1 विधान परिषद पोटनिवडणूक: काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरिश पटेलांची काँग्रेसवर मात
2 सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का?; शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
3 सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला; तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X