News Flash

प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती रद्द

नगरविकास विभागाने मंगळवारी तसा आदेश काढला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सरकारच्या काळातील विविध महमंडळांवरील राजकीय नियुक्त्या रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सिडकोच्या अध्यक्षपदावरील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. नगरविकास विभागाने मंगळवारी तसा आदेश काढला आहे.

राज्यात मागील पाच वर्षे भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. ज्या पक्षाचे सरकार असते, त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्त्यांची महामंडळांवर वर्णी लावली होती. मात्र तीन-साडेतीन वर्षे काहीच हालचाली न करता युती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमयरीत्या राजकीय सत्तांतर झाले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आधीच्या सरकारच्या काळातील महामंडळांवरील नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील सिडको हे महामंडळ आर्थिकदृष्टय़ा सक्षम मानले जाते. या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची ४ सप्टेंबर २०१८ राजी नियुक्ती करण्यात आली होती. नगरविकास विभागाच्या मंगळवारच्या आदेशाने ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 12:10 pm

Web Title: bjp prashant thakur removes as cidco chairman jud 87
Next Stories
1 ..तर आमच्या पदव्यांची चौकशी करा : उदय सामंत
2 सकाळी निरुत्साह, दुपारनंतर रांगा
3 २० वर्षांनंतर गावात उत्स्फूर्त मतदान
Just Now!
X