सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणं एका आंदोलनकर्त्याला महागात पडलं आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्याला अटक केली आहे. परभणीच्या पाथरीत हे आंदोलन सुरु होतं. याच आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींना शिवी देण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्षाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आंदोलनकर्त्याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्याचं नाव शेख गणी शेख रहमान असं आहे. परभरणीत पाथरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असताना रहमान यांनी जाणुनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. व्हिडीओचा आधार घेऊन भाजप शहराचे जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी पंतप्रधानांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तसंच अटकही केली.