19 September 2020

News Flash

तणाव आणि गोंधळात ‘वालचंद’चा पदवीदान सोहळा

शनिवारी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला.

पदवीदान सोहळ्यावेळी सेल्फी घेत असताना विद्यार्थिनी. (छाया- उदय देवळेकर)

पदवी योग्य की अयोग्य यावरून संशयाचे वातावरण असतानाही शनिवारी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना आज पदवीच्या गुणपत्रिका प्रदान करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख, शासन नियुक्त संचालक मकरंद देशपांडे आणि नवनियुक्त संचालक तथा प्राचार्य डॉ. एम. जी. देवमाने उपस्थित होते.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयावर वर्चस्वावरून निर्माण झालेल्या वादामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या प्रवेशद्बारातच पोलीस तनात करण्यात आले होते. प्रारंभी प्रमुख अतिथीसह मान्यवरांना नवपदवीधारक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. यावर्षी महाविद्यालयातून सुमारे ४५० विद्यार्थी अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये पदवी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना स्पध्रेसाठी जगाचे आकाश खुले आहे. मात्र केवळ या स्पध्रेत यशस्वी होण्यासाठी केवळ व्यसनच तुमचा शत्रू ठरू शकते. सराट होऊन आपल्या ज्ञानाची उपयुक्तता समाजासाठी वापरली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पुस्तकी ज्ञान हाच केवळ यशस्वीतेचा मापक ठरू शकत नाही. प्रतिभा ही वेगळी बाब आहे. असेही जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:15 am

Web Title: convocation ceremony in walchand college of engineering
Next Stories
1 वालचंदचा ताबा घेण्याचा प्रयत्न बेकायदा
2 बालकांसाठी २५ टक्के प्रवेश
3 नगर-पुणे थेट रेल्वेमार्गासाठी २० कोटी मंजूर
Just Now!
X