News Flash

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पार, एकाच दिवशी वाढले १६५ पॉझिटिव्ह रुग्ण

लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबलेली नाही

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

बुधवारी महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले होते. शिवाय बुधवारी एकाच दिवशी २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. गुरुवारी त्यात आणखी १६५ जणांची भर पडली आहे.

धारावीत पुन्हा आढळले ११ करोनाग्रस्त
मुंबईत दाट लोकवस्ती असलेल्या धारावीतील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी भर पडली. ११ जणांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे धारावीतील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

देशातील १७० ‘हॉटस्पॉट’मध्ये मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे
देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे.

सोलापूरात एकाच दिवशी १० करोनाबाधित आढळले; नर्समुळे ९ जणांना लागण
सोलापुरात आज (गुरुवार) एकाच दिवशी करोनाचे दहा रूग्ण आढळले आहेत. ४२ संशयित रूग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात दहा जणांना करोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. तर अन्य ३२ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:41 pm

Web Title: coronavirusoutbreak total number of covid19 cases in maharashtra reached 3081 after 165 more individuals tested positive on thursday pkd 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: सोलापूरात एकाच दिवशी १० करोनाबाधित आढळले; नर्समुळे ९ जणांना लागण
2 करोना विरोधी लढाईचा गडचिरोली पॅटर्न!
3 पंढरपुरात विक्रेत्यांची थर्मल चाचणी; ग्राहकांना वृत्तपत्रांची मागणी सुरु ठेवण्याचे आवाहन
Just Now!
X