लोकसत्ता प्रतिनिधी

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम व सावंगी येथील रूग्णालय अधिग्रहित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून यापुढे कोविड रूग्णांच्या उपचाराचे पैसे शासनाकडून या रूग्णालयांना प्रदान केले जातील.  सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालय व सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून पूर्वीच घोषित झाले आहे. मात्र ही खासगी रूग्णालये असल्याने येथील उपचारांचा खर्च रूग्णांकडून घेतला जात होता. रूग्णांना शासकीय मदत या ठिकाणी शक्य होत नव्हती.

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

रूग्णांसाठी ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना आहे. मात्र करोनाची सौम्य लक्षणे किंवा कोणतेही लक्षणे नसणाऱ्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा रूग्णांचा वैद्यकीय उपचारासाठी कमीतकमी खर्च व्हावा म्हणून सातशे रूपये प्रति दिवस खर्च ठरविण्यात आला होता. मात्र आता रूग्णालय अधिग्रहित करण्यात आल्याने शासकीय रूग्णालयाप्रमाणे सर्व खर्च शासनाकडून देण्यात येईल. रूग्णालयातील खासगी खोल्यांचे शुल्क रूग्णाला द्यावे लागेल, असे सावंगी रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी नमूद केले.

रूग्णालयात जेवण, तपासणी, औषधी, उपचार आदी सुविधांसाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल. ज्या बाधित रूग्णांना फुले योजनेअंतर्गत लाभ मिळू शकत नाही त्या रूग्णांसाठी शासकीय दरानुसार शासन खर्च देईल. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले की दोन्ही रूग्णालयांना उपचार, औषधी व तपासणीसाठी शुल्क आकारता येणार नाही. मात्र खासगी खोलीतील रूग्ण, वर्धा जिल्ह्याबाहेरील रूग्ण तसेच फुले योजनेतील पात्र रूग्णांसाठी सदर निधी मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात जिल्ह्यातील ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.