05 March 2021

News Flash

निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव प्रकरण: महादेव जानकर दोषमुक्त

याबाबतची चित्रफीतही व्हायरल झाली होती.

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात गाजलेल्या देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना मंगळवारी देसाईगंज न्यायालयाने दिलासा दिला. न्यायालयाने सबळपुराव्या अभावी जानकर यांना दोषमुक्त केले आहे.

डिसेंबर २०१६ रोजी देसाईगंज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होती. तत्पूर्वी ५ डिसेंबर २०१६ रोजी मंत्री महादेव जानकर देसाईगंज येथे आले होते. त्यांनी प्रभाग क्रमांक ९ ब मधील काँग्रेसचे उमेदवार जेसा मोटवानी यांच्या पक्षातर्फे सादर केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेऊ द्यावे व त्यांना कपबशी हे निवडणूक चिन्ह द्यावे, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणला. याबाबतची चित्रफीतही व्हायरल झाली होती. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मंत्री महादेव जानकर व उमेदवार जेसा मोटवानी यांच्या विरुध्द लोकसेवकाला कायदेशीर कृत्य करताना दबाव आणल्याप्रकरणी देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १९ जानेवारीला झालेल्या सुनावणीत न्यायालयात चार जणांची साक्ष तपासण्यात आली होती. मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या निकालात जानकर यांना दोषमुक्त केले. सबळ पुराव्या अभावी त्यांची सुटका करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 4:07 pm

Web Title: desaiganj sessions court mahadev jankar acquitted from charges of threatening election officer in local body elections
Next Stories
1 कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरण: वीरेंद्र तावडेला न्यायालयाकडून जामीन मंजूर
2 पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
3 सांगलीत काँग्रेस व राष्ट्रवादी अद्याप ढिम्म
Just Now!
X