रेणू शर्मा आणि करूणा शर्मा या दोघी बहिणींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये वादात आणि अडचणीत सापडल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले. बीडच्या परळीमध्ये एका कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगांचं अप्रत्यक्ष वर्णन करताना राजा आणि प्रधानाची सांगितलेली गोष्ट सगळ्यांचीच दाद मिळवून गेली. धनंजय मुंडेंनी त्यांच्याच शैलीत लगावलेले हे फटकारे बीडकरांसाठी मात्र विशेष ठरला.

‘माझ्या आजीनं मला ही गोष्ट सांगितली होती…!’

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

यावेळी गोष्ट सांगताना धनंजय मुडे म्हणाले, ‘मला माझ्या आजीनं ही गोष्ट सांगितली होती. देव करतो ते भल्यासाठीच करतो. एक राजा असतो. दरबारात बसून तलवार पुसत असतो. राजाचा अंगठा तुटतो. ते बघताच प्रधान म्हणतात, राजे, देव करतो ते भल्यासाठी. राजाला राग आला. राजा प्रधानाला काळ्या कोठडीची शिक्षा ठोठावतो. त्यानंतर राजा शिकारीला निघतो. सोबत फौज होती. दाट जंगलात फौज मागे पडून राजा एकटाच पुढए गेला तेव्हा तिथल्या आदिमानवाने त्याला पकडलं. नरबळीसाठी राजाला नेण्यात आलं. पण एका वृद्धाला राजाला अंगठा नसल्याचं लक्षात आलं आणि तो म्हणाला की याला अंगठा नाही, त्यामुळे हा नरबळी चालणार नाही. राजाला सोडून देण्यात आलं. राजानं परत येऊन प्रधानाची सुटका केली. प्रधान राजाला म्हणतो, जे होतं ते भल्यासाठी होतं. जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं, तर तुमच्यासोबत मी असताना आदिमानवांनी माझा बळी दिला असता! म्हणून सांगतो संजय भाऊ (आमदार संजय दौंड), जे होतं, ते भल्यासाठी होतं.’

रेणू-करूणा शर्मा प्रकरणात मनस्ताप

धनंजय मुंडेंनी सांगितलेली ही कथा थेट रेणू शर्मा, करुणा शर्मा प्रकरणाशी जोडली जात आहे. रेणू शर्माने आधी केलेली तक्रार कालांतराने मागे घेतल्यानंतर पुन्हा तिचीच बहीण करुणा शर्माने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी स्वत: भलीमोठी फेसबुक पोस्ट टाकून त्यावर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर धनंजय मुंडेंना मोठा पाठिंबा मिळू लागला होता. त्यावेळी धनंजय मुंडंना प्रचंड मनस्ताप झाल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितलं जात होतं. तेव्हापासून धनंजय मुंडे फारसे जाहीर कार्यक्रमात देखील दिसले नव्हते.