05 June 2020

News Flash

नुसता ‘शिक्का’ पाहून महिलेवर बहिष्कार

सोलापूरमध्ये आशा स्वयंसेविकेला चार ठिकाणांहून हुसकावले 

संग्रहित छायाचित्र

वाडय़ावस्त्या व झोपडपट्टय़ांमध्ये जाऊ न सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या एका आशा स्वयंसेविकेला साध्या खोकल्यासाठी विलगीकरणाचा शिक्का मारल्यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून अमानवी वागणूक देत तिला व कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे. अखेर या स्वयंसेविकेला कुटुंबीयांसह प्रशासनाने एका तात्पुरत्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

चार ठिकाणांहून हुसकविल्यानंतर ही महिला पोलिसांकडे गेली. पोलिसांनीही तिला मदत न करता पुन्हा शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने शासकीय रुग्णालयात जाऊ न डॉक्टरांना अडचण सांगितली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने आशा स्वयंसेविका संघटनेच्या नेत्यांशी  संपर्क साधून मदत मागितली.

झाले काय?

शहरातील न्यू बुधवार पेठेत पती व दोन चिमुकल्यांसह राहणाऱ्या या महिलेला घशाचा संसर्ग झाला. यावर तिने शासकीय रुग्णालयात जात उपचार घेतले. खबरदारी म्हणून तिला १४ दिवस ‘होम क्वोरंटीन’ चा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या हातावर शिक्काही मारला.तिचा हा शिक्का शेजारच्या काही महिलांनी पाहिल्यावर  करोना झाल्याचा संशय घेत परिसरातील नागरिकांनी तिला दुसरीकडे  जाण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे वैतागून तिने कुटुंबासह माहेरी आसरा घेतला. परंतु तिथेही तिला विरोध झाला. यानंतर तिने तुळजापूर वेशीत   मावशीचे घर गाठले.तिथूनही तिला हुसकावले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:59 am

Web Title: exit on woman after seeing stamp only abn 97
Next Stories
1 गर्भवतीच्या मदतीला वर्दीतील माणुसकी
2 पेणमधील गणेशमूर्ती व्यवसाय ठप्प
3 जळगावात करोनामुळे पहिला मृत्यू
Just Now!
X